शेपू काकडी सॅलड

Submitted by गिरिश देशमुख on 25 November, 2010 - 13:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक कप बारीक चिरलेला शेपू,
एक कप किसलेली काकडी,
१/२ टी स्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची,
१ टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल, १/२ कप व्हाइट व्हिनेगार,
४/५ मीरे जाडसर भरडून,
साखर, मीठ.

क्रमवार पाककृती: 

१/२ टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात शेपू चांगला परतून घ्या,गार होउ द्या.
ग्लास बाउल मध्ये १/२ कप व्हाइट व्हिनेगार, १ टी. स्पू. पाणी घालून त्यात मीठ, साखर (चवीनूसार) विरघळवून घ्या. त्यात उरलेले ऑलिव्ह ऑइल घालून फोर्कने चांगले फेटून घ्या, मिरची आणि मीरे घाला.
हे मिश्रण (ड्रेसिंग), किसलेली काकडी व परतलेला शेपू छान मिक्स करुन घ्या. सॅलड तयार !

माहितीचा स्रोत: 
मीच! :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सॅलड ड्रेसिंग म्हणून पण छान लागते. तसेच यात दही घातले तर फलाफल पॅटीबरोबर रॅपमधे असते ते ड्रेसिंग तयार होते.

रेसिपी छान आणि व्हर्सटाईल.

Happy wiseman, मित्रा, ही रेसिपी खास शेपू प्रेमींसाठीच आहे, तुला शेपू आवडत नसेल तर Angry !
"शेपू फॅन क्लब" नावाच्या एका बी.बी. वर आधी मी ही रेसिपी पोस्ट केली होती, पण तिथल्या अ‍ॅड्मीन मॅडम नी हाकलून लावलं तिथून,:D मग तिच रेसिपी इकडे हलवली.

शेपू ( सोप्पू-सुप्प- सुप हर्ब /ब्रझिल)५ वर्षं हाइबरनेशनमध्ये होता.तिकडच्या सोवळ्या रेसपि इकडच्या कांदा ग्रेवि वाल्यांना पचनी पडणे कठीण।