कालच माझ्या मुलीच्या शाळेत स्नेहसंमेलन झाले. माझी मुलगी श्रावणी हिनेही भाग घेतला होता.
पहिला तिच नाव नव्हत. फक्त १० दिवसांपुर्वीपासुन त्यांची प्रॅक्टीस चालू झाली होती. आधी तिला मधल्या रो मध्ये ठेवले होत. पण जेंव्हा रंगित तालिम बघण्यासाठी शाळेच्या प्रिन्सीपल आल्या तेंव्हा त्यांनी तिचा डान्स पाहुन तिला पुढे घेतले. घरी रोज डान्स चालुच असतो. आणि ही प्रॅक्टीस चालु झाल्यापासुन तर सतत चालुच असायचा. पहिलांदा ती आम्हाला गाण बोलायला लावायची. मग तिच्या वडीलांना ते गाण मोबाईलमध्ये मिळाल. मग आम्हाला हायस वाटल. तिला मोबाईल चालु करुन दिला की झाल अस वाटत असेल पण नाही तिला घरातील सगळे प्रेक्षकही लागायचे. तेवढ्यावरच नाही भागायच तर हल्ली हल्ली साडी नेसवुन मेकअप करुन डान्स करायला लावायची. आमच्या जेवणाच्या वेळेचा काही दिवस बट्ट्याबोळ झाला होता. शिवाय तिच्या डान्स साठी लागणारी टोपली आणि मासेही करायचे होते. ती जबाबदारी तिच्या वडीलांनीच पार पाडली. बाकीच मेकअपच सामान अर्थातच मलाच आणायच होत. साडी तिच्या काकीनेच अगदी हौशिने दिली.
पण आम्हाला कोणालाच कोळी साडी नेसवता येत नव्हती मग लक्षात आल की आमची कामवाली कोळीच आहे. ती नेहमी त्याच पद्धतीची साडी नेसुन येते. मग तिला विचारल. तिही अगदी हौसेने तयार झाली नेसवुन द्यायला. आणि खुप छान साडी नेसवुन दिली काल. रेडीमेड मिळतात पण त्याला नेसवण्याची सर नसते.
४ वाजता शाळेत तयार होउन बोलावले होते. आम्ही शाळेत पोहोचलो पण प्रोग्रॅम चालु व्हायला ५.३० झाले. तोपर्यंत आम्ही त्यांच्या ड्रेसिंग रुम मध्ये होतो. तिथे खुप गंमत आली. सगळ्या मुले मुली कोळ्यांच्या ड्रेस मध्ये होती. मुलांन वल्हव आणायला सांगितले होते. पण त्या वल्हवाबरोबर मस्ती करता करता काहिंचे वल्हव तुटत होते. एका मुलाच्या वल्हवाच्या पाकळ्यांचे द्विभाजन झाले मी त्याला सेपटी पिन लावुन दिले. एक मुलगी मुलगा झाली होती. तिला वाईट वाटत होते. मि तिला विचारले तुझा नाव काय रे तर माझी मुलगी हसत मला सांगु लागली आई ती मुलगा आहे. मग ती रडकुंडी तोंड करुन बोलू लागली. मला बॉय केल. माझी नणंद माझ्या मुलीला मेक अप करत होती. ती म्हणाली मला पण पावडर लावा ना मला पण लिप्स्टीक लावा. नणंदेने तिचाही म्हणजे बॉय झालेल्या मुलीचा मेकअप केला. मला तिची एकदम दया आली. मग मी तिला समजावले. अग तू ना सगळ्यांपेक्षा वेगळी दिसतेस. गल काय सगळ्याच होतात पण तु गल असुन बॉय झालीस आणि खुप छान दिसतेस मी तुझा फोटो काढते.
मग ती खुप खुष झाली आणि मी तिचे फोटो काढायला लागले त्याबरोबर सर्व चिल्लर पिल्लर आली. माझा पण फोटो काढा माझा पण फोटो काढा. मग मॅडम ओरडायच्या आत मला जमतील तसे मी फोटो काढले.
माझ्या मुलीला जो पार्टनर होता तो सारखा माझ्या मुलीभोवती घुटमळत होता. मध्येच तिचा हात धरुन चल चल करायचा. बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते.
शेवटी ५.३० ला त्यांचा डान्स चालू झाला. डान्स शाळेतील मॅडमनीच बसवला होता. सगळ्यांना खुप आवडला. श्रावणी खुप छान नाचली. सगळ्यांनी कौतुक केल अगदी भरभरुन. तरी तिची हौस फिटली नव्हती. ती साडी तशीच ठेउन घरी जाउन तिने दोनदा डान्स केला. परत एकदा माझ्या माहेरी जाउन एकदा करुन दाखवला. आजीने तिची दृष्टच काढली.
शुटींग कशी लोड करायची?
शुटींग कशी लोड करायची?
क्युट आहे... आणि खूप गोड
क्युट आहे...
आणि खूप गोड दिसतिय
जागू सहीच दिस्त्येय ग लेक.
जागू सहीच दिस्त्येय ग लेक. फोटोही सुरेख आल्येत सगळे.
लेक कसली क्युट गोडुली दिसत
लेक कसली क्युट गोडुली दिसत आहे. ते टोपलीतले मासे खरे आहेत का?
गोड दिसतेय लेक सगळीच चिल्ली
गोड दिसतेय लेक सगळीच चिल्ली पिल्ली मस्त दिसतायत अगदी!
काय गोड दिसतेय लेक गं जागु..
काय गोड दिसतेय लेक गं जागु.. आणि साडीमुळे जरा भरलेलीही वाटतेय
बाकी कोळणीही एकदम ठसकेबाज. ती वेणी घातलेली कोळीणही मस्त.
माझ्या लेकीचे बालपणीचे दिवस आठवले. मला दांडीच मारावी लागायची तिच्या स्नेहसंमेलनादिवशी.
कसले मस्त फोटो.. मुलींना
कसले मस्त फोटो..
मुलींना किती नटवता येते ना.. मुलांना काहीच नसते
क्युट ! एकदम क्युट दिसतेय.
क्युट ! एकदम क्युट दिसतेय.
साधना अगदी अगदी. मला पण जुने
साधना अगदी अगदी. मला पण जुने दिवस आठविले गोड दिसतेय छोटी कोळीण. यू ट्यूब वर टाक ना नाच. आम्ही पण बघू.
<< मुलींना किती नटवता येते
<< मुलींना किती नटवता येते ना.. मुलांना काहीच नसते >>
वर्षे, मुल जात्याच सुंदर असतात, त्यांना मारुनमुटकून सुंदर 'बनवावे' लागत नाही
खुपच गोड दिसतेय लेक >>ते
खुपच गोड दिसतेय लेक
>>ते टोपलीतले मासे खरे आहेत का?>>
कांदापोहे खरे दिले असते तर
कांदापोहे खरे दिले असते तर मुलांच्या डान्सच्या स्टेप सगळ्या नाक दाबुन आल्या असत्या. वहीच्या पुठ्याचे आहेत ते आणि त्याला सिल्वर पेपर लावलाय.
सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद.
यु ट्युब वर कसे टाकायचे मला काहीच माहीत नाही. प्लिज सांगा. इथे लोड नाही का करता येणार ?
एकदम क्यूट दिसते
एकदम क्यूट दिसते आहे...
व्हिडीओ तूनळीवर अपलोड करायचा आणि इकडे त्याची लिंक द्यायची...
असुदे, ते पुढे दात विचकतोय्स
असुदे, ते पुढे दात विचकतोय्स त्यावरुनच कळतेय सगळे........
मुलगे असलेल्या सगळ्या आयांचे हेच रडगाणे असते. मुलीना अगदी बालपणीपासुन लग्नापर्यंत आणि त्यानंतरही सजवता येते मस्त. आणि त्यात सजवुन घ्यायची हौस असलेल्या मुली म्हणजे दुधात साखरच.. (माझे नशीब चांगले आहे, मुलीला सगळी हौस आहे )
बायांनो, माझ वाक्य नीट वाचा.
बायांनो, माझ वाक्य नीट वाचा. मी म्हणालोय, मुलं सुंदर "असतात". आता असतात आणि दिसतात यात फरक आहे ना ?
किती त्या मिरच्या....
किती गोड... खुप छान दिसतायत
किती गोड...:)
खुप छान दिसतायत सगळी मुलं..
इथे आयांच्या मताला किंमत आहे,
इथे आयांच्या मताला किंमत आहे, बाबांच्या नाही.
साधना, वाक्य चुकल. "इथे" च्या
साधना, वाक्य चुकल. "इथे" च्या ऐवजी "कुठेही, सगळीकडे, कधीही" असल काहितरी पाहिजे होतं
श्रावणी छानच दिसतेय. तिचा
श्रावणी छानच दिसतेय. तिचा पार्टनर पण सुंदर आहे बरं का....
सर्वच बाल कोळी-कोळीणींचे फोटो सुंदर आलेत. किती हौस असते या लहान मुलींना नटण्याची. साडी, दगिने, मेकप, कशाचेच त्यांना दडपण येत नाही. मस्त कार्यक्रम करतात.
खुप गोड दिसताहेत सगळीच मुलं.
खुप गोड दिसताहेत सगळीच मुलं. गाणं कुठलं होतं ?
आता जा.. मीच बरी भेटले तुला
आता जा.. मीच बरी भेटले तुला टिपी करायला....
शोभा अगदी बरोबर ग. दिनेशदा
शोभा अगदी बरोबर ग.
दिनेशदा मी हाय कोली गाण होत.
छान दिसतेय लेक जागू.. साडीचा
छान दिसतेय लेक जागू.. साडीचा हिरवा रंग मस्त आहे.
जागूले..श्रावणी एकदम गोडुली
जागूले..श्रावणी एकदम गोडुली दिस्त्ये
मस्त
लेक गोड दिसत्येय तुझी...
लेक गोड दिसत्येय तुझी...
मंजूडी, सुमेनिष, विनय धन्स.
मंजूडी, सुमेनिष, विनय धन्स.
लेक गोड दिसतेय. जावईही
लेक गोड दिसतेय. जावईही चुणचुणीत आहे
किती गोड दिसतेय हि चिमुरडी
किती गोड दिसतेय हि चिमुरडी कोळीन....
जागुताई कोळिण एकदम भन्नाट..
जागुताई कोळिण एकदम भन्नाट.. दृष्ट काढ गो..
जागुडे!! गोड कोळीण आहे तुझी!
जागुडे!! गोड कोळीण आहे तुझी! हातात टोपली घेतलेला फोटो लई भारी!!
Pages