स्नेह संमेलन चिमुकलीचे.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 December, 2010 - 04:23

कालच माझ्या मुलीच्या शाळेत स्नेहसंमेलन झाले. माझी मुलगी श्रावणी हिनेही भाग घेतला होता.
पहिला तिच नाव नव्हत. फक्त १० दिवसांपुर्वीपासुन त्यांची प्रॅक्टीस चालू झाली होती. आधी तिला मधल्या रो मध्ये ठेवले होत. पण जेंव्हा रंगित तालिम बघण्यासाठी शाळेच्या प्रिन्सीपल आल्या तेंव्हा त्यांनी तिचा डान्स पाहुन तिला पुढे घेतले. घरी रोज डान्स चालुच असतो. आणि ही प्रॅक्टीस चालु झाल्यापासुन तर सतत चालुच असायचा. पहिलांदा ती आम्हाला गाण बोलायला लावायची. मग तिच्या वडीलांना ते गाण मोबाईलमध्ये मिळाल. मग आम्हाला हायस वाटल. तिला मोबाईल चालु करुन दिला की झाल अस वाटत असेल पण नाही तिला घरातील सगळे प्रेक्षकही लागायचे. तेवढ्यावरच नाही भागायच तर हल्ली हल्ली साडी नेसवुन मेकअप करुन डान्स करायला लावायची. आमच्या जेवणाच्या वेळेचा काही दिवस बट्ट्याबोळ झाला होता. शिवाय तिच्या डान्स साठी लागणारी टोपली आणि मासेही करायचे होते. ती जबाबदारी तिच्या वडीलांनीच पार पाडली. बाकीच मेकअपच सामान अर्थातच मलाच आणायच होत. साडी तिच्या काकीनेच अगदी हौशिने दिली.

पण आम्हाला कोणालाच कोळी साडी नेसवता येत नव्हती मग लक्षात आल की आमची कामवाली कोळीच आहे. ती नेहमी त्याच पद्धतीची साडी नेसुन येते. मग तिला विचारल. तिही अगदी हौसेने तयार झाली नेसवुन द्यायला. आणि खुप छान साडी नेसवुन दिली काल. रेडीमेड मिळतात पण त्याला नेसवण्याची सर नसते.

४ वाजता शाळेत तयार होउन बोलावले होते. आम्ही शाळेत पोहोचलो पण प्रोग्रॅम चालु व्हायला ५.३० झाले. तोपर्यंत आम्ही त्यांच्या ड्रेसिंग रुम मध्ये होतो. तिथे खुप गंमत आली. सगळ्या मुले मुली कोळ्यांच्या ड्रेस मध्ये होती. मुलांन वल्हव आणायला सांगितले होते. पण त्या वल्हवाबरोबर मस्ती करता करता काहिंचे वल्हव तुटत होते. एका मुलाच्या वल्हवाच्या पाकळ्यांचे द्विभाजन झाले मी त्याला सेपटी पिन लावुन दिले. एक मुलगी मुलगा झाली होती. तिला वाईट वाटत होते. मि तिला विचारले तुझा नाव काय रे तर माझी मुलगी हसत मला सांगु लागली आई ती मुलगा आहे. मग ती रडकुंडी तोंड करुन बोलू लागली. मला बॉय केल. माझी नणंद माझ्या मुलीला मेक अप करत होती. ती म्हणाली मला पण पावडर लावा ना मला पण लिप्स्टीक लावा. नणंदेने तिचाही म्हणजे बॉय झालेल्या मुलीचा मेकअप केला. मला तिची एकदम दया आली. मग मी तिला समजावले. अग तू ना सगळ्यांपेक्षा वेगळी दिसतेस. गल काय सगळ्याच होतात पण तु गल असुन बॉय झालीस आणि खुप छान दिसतेस मी तुझा फोटो काढते.

मग ती खुप खुष झाली आणि मी तिचे फोटो काढायला लागले त्याबरोबर सर्व चिल्लर पिल्लर आली. माझा पण फोटो काढा माझा पण फोटो काढा. मग मॅडम ओरडायच्या आत मला जमतील तसे मी फोटो काढले.

माझ्या मुलीला जो पार्टनर होता तो सारखा माझ्या मुलीभोवती घुटमळत होता. मध्येच तिचा हात धरुन चल चल करायचा. बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते.

शेवटी ५.३० ला त्यांचा डान्स चालू झाला. डान्स शाळेतील मॅडमनीच बसवला होता. सगळ्यांना खुप आवडला. श्रावणी खुप छान नाचली. सगळ्यांनी कौतुक केल अगदी भरभरुन. तरी तिची हौस फिटली नव्हती. ती साडी तशीच ठेउन घरी जाउन तिने दोनदा डान्स केला. परत एकदा माझ्या माहेरी जाउन एकदा करुन दाखवला. आजीने तिची दृष्टच काढली.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खूप्पच गोडु दिसतेय कोळीण !
वर्षा,
<<मुलींना किती नटवता येते ना.. मुलांना काहीच नसते >>.........दुखती रग को छेडा तूने.
तुळशीबागेत चक्कर टाकताना दरवेळी ह्या वाक्याचा जप करत असते मी. Sad

जागू श्रावणी कित्ती गोड दिसतेय गं. नटली पण किती सुरेख आहे. एकदम भारी आहे कोळीण. दृष्ट काढायला विसरूनकोस हा.

कसली गोड दिसतेय तुझी लेक Happy साडि एकदम चापुनचोपुन नेसवली आहे ना, मस्त.
आणि बाकी तीचे मित्र मैत्रिणी पण एकदम गोड.

मला पण फोटो किंवा डान्स दिसत नाहिये Sad
फुला, तू आणि मी पापिणी आहोत बहुतेक Proud
जागू, अगं आम्हाला दाखव की फोटो.

Pages