पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही..वास नाही येत गव्हाला..मोड आणायला ठेवताना २-३ पाण्यात धुवुन घ्यायचे..पण मला तरी अजुन कधीही वास नाही आला..

रूनी पॉटर, बदल केलाय.. Happy

गहू कुरड्या करताना भिजत घालतात त्यावेळी त्याला वास येतो पण मोड काढण्यासाठी, पाणी निथळून घेतात, त्यामूळे वास येत नाही.
मोड काढलेला गव्हाची उसळ छान होते. असेच ज्वारीला पण मोड काढता येतात, त्याचीही छान उसळ होते.

विरी गेलेल्या बाजरीच्या पीठाच (जुन झालय) काय करता येइल ? खूप उरलय ,टाकून द्यायला जीवावर आलय Sad
भाकरी साठी आणल होत .......

तोषवी,

त्या पिठात पालक, हिरव्या मिरच्या आणि आले वाटून घालायचे, थोडासा मैदा टाकायचा आणि वडे किंवा पराठे करायचे. वर तीळ पेरले तर आणखी छान.
गूळाचे पाणी करुन त्यात ते पिठ भिजवायचे, त्यात थोडी कणीक मिसळायची. मग त्याचे दिवे करुन वाफवायचे आणि तूपासोबत खायचे.
उडदाचे पिठ वा मैदा मिसळूनही भाकर्‍या करता येतील.

माझ्याकडे Jenie O चे frozen turkee burgers मुलांना आवडले नाहीत म्हणून पडून आहेत. त्याचे काय करता येईल ?

Hi, Mazyakade Haldiram chya feni cha ek packet khup divsanpasun ahe. Tyat ajibat sakhar nahi..tyamule nuste khanyas upyogi nahi..krupaya tyache kahi banvata yeil ka te suchvave..Abhari ahe.

समोसा बनवताना त्यात बटाट्याऐवजी मका (वाफावलेला) घालून पहा. मस्त टेस्टी लागतो, पोटही गच्च होत नाही. हिरवा मटार आणि नावाला मसाला, कोबी घालूनही मस्त चव येते.

( समोसा मैद्याऐवजी बाजरी किंवा इतर कुठल्या पीठाचा नाही का बनवता येणार ? मैदा नकोच ..)

वा करुन बघीन. माझ्याकडे त्यारेडिमेड पट्ट्या आहेत. त्याचे स्प्रिंग रोल केल्ते पण अंमळ कड्क झाली पारी.
आपले घरच्या मैद्याच्या पोळीचे आवरण मऊ होते त्यामानाने.

अश्विनी, मैद्याची पारी करताना, मैद्यात थोडे लिंबू पिळले तर कव्हर कुरकुरीत होते.
आणि त्या रेडीमेड पेष्ट्री ला जरा वारा लागला, कि ती सुकते आणि मग चिवट लागते. तूमच्याकड्च्या कोरड्या हवेत तर ते जास्तच जाणवणार. ती वापरतना, ओला करुन घट्ट पिळलेल्या कपड्याने झाकून ठेवावी लागेल.

बरोबर. त्यांनी सूचना दिली आहे ते ओलसर करून घेण्याची. माझा आपला ट्रायल रन होता. आता गावाहून आल्यावर वरील प्रमाणे सामोसे करून बघते

बदामाचा शिरा कसा करायचा. दिवाळीत मिळालेले खुप बदाम शिल्लक आहेत. थंडीचे दिवस असल्याने शिरा केला तर आरोग्यास पण उत्तम.

कोकमाचे सार मी खाल्लेय ब-याच वेळा. (गुलाबी सोलकढी नाही)

अंदाजपंचे याची रेसीपी ओले खोबरे+कांदा भाजून वाटुन जिरे्+ हिंग+मोहोरी +लसुण फोडणीला टाकुन त्यावर वाटप घालुन मग उकळताना साताठ कोकमे ढकलावी असी असेल असे वाटते. कोणी ऑथेंटिक रेसिपी देईल काय?

हसरी, इथे वर हेडरमधे 'या ठिकाणी' 'आणि या ठिकाणी' अशा लिंका दिल्यात तिथे शोधा बरं... सापडेलच नक्की Happy

एक फर्माइश. उडिद डाळिचे घुटे कसे करावे? सुप प्रमाणे पिण्याकरता...दिनेशदा ....तुम्च्याकडे कोकणातलि क्रुति आहे का.

<डीलीट>

मला आज कवठ मिळालय. जे साधरणपणे महाशिवरात्रीच्या आसपास मिळत ते. आतुन गुलाबी आए आणि आंबट आहे . कदाचित मला घाई झाल्यामुळे मी घरी आल्या आल्या फोडलं ते कच्चच असाव Sad पण भाजीवालीतर पुर्ण पिकलय म्हणाली होती Angry
आता त्याची चटणी करायच्ये, पण कशी करतत माहीत नाही. [बहुतेक गुळ घालुन करतात] कोणाला माईत असेल या चटणीची कृती तर प्लिज मला सांगा. फार्फार गरज आहे.
त्याचं आणखीही काय काय करता येऊ शकेल मला? उदा. वाडीला बर्फी मिळते. पण कृतीही सांगा.

Pages