Submitted by वर्षा_म on 9 December, 2010 - 01:35
स्वप्नात काल माझ्या
रंगपेटी आली
सगळे रंग मला
देउन ती गेली
माझ्याकडे आहेत सारे
रंगीबेरंगी खडू
विचार करतोय आता
कसले चित्र काढु
एकएक रंग मग
मला सांगु लागला
उपयोग त्यांचा मी
कुठे करु चांगला
ऐटीत पुढे मग
आला रंग निळा
काढा आकाश
मस्त ढगांशी खेळा
हातात हात घालुन आले
पोपटी आणि हिरवा
झाडे काढु छोटी मोठी
हवेत राहील गारवा
हा बघा आला
लाल म्हणजे तांबडा
जास्वंदीचे फूल
आणि तुरेवाला कोंबडा
रंगांच्या मारामारीत
तयार झाला काळा
काव काव करणारा
जसा चतुर कावळा
शुद्धतेचे प्रतिक
पांढरा श्वेत
पोहताना बगळे
काढायचा बेत
सुर्यफुल आणि झेंडु
रंग त्यांचा पिवळा
छान छान काढु
देवबाप्पाला माळा
लाल आणि निळा
मिळुन केला जांभळा
रसरशीत जांभळे काढा
नाही येणार कंटाळा
गुलमोहर:
शेअर करा
बडबड गीत..... आवडले.
बडबड गीत..... आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्षे एकदम बालवाडीत जातानाचा
वर्षे एकदम बालवाडीत जातानाचा दिवस आठवला. काय कौतुक होत मला त्या नवीन रंगपेटी, चित्राच पुस्तक यांच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने सगळ्या बाल कवितांचा संग्रह काढ ना एक खुप छान, सोप्या भाषेतल्या आणि पिल्लाना समजणार्या आहेत. आणि पटणार्या सुद्धा
तु बालवाडीची मास्तरी का नाही
तु बालवाडीची मास्तरी का नाही होत
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्षा मस्त झालेय.
वर्षा मस्त झालेय.
(No subject)
सह्हीच!!! मस्त बालकविता काय
सह्हीच!!! मस्त बालकविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय कौतुक होत मला त्या नवीन रंगपेटी, चित्राच पुस्तक यांच.>>>शुकुला अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त "रंगबिरंगी" बालकविता.. !
मस्त "रंगबिरंगी" बालकविता.. !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्षा, सहीच. खूप सहज येतात
वर्षा, सहीच. खूप सहज येतात तुझ्या बालकविता.
लेकाला खूप आवडेल तुझी रंगपेटी !
वर्षा, लोभसवाणे रंग भरलेली
वर्षा,
लोभसवाणे रंग भरलेली कविता आहे. खूप छान.
वर्षे क्यूट आहे बडबडगीत
वर्षे क्यूट आहे बडबडगीत
मस्त मस्त.... मस्तच!!!!
मस्त मस्त.... मस्तच!!!!