रंगपेटी

Submitted by वर्षा_म on 9 December, 2010 - 01:35

Creyons.jpg

स्वप्नात काल माझ्या
रंगपेटी आली
सगळे रंग मला
देउन ती गेली

माझ्याकडे आहेत सारे
रंगीबेरंगी खडू
विचार करतोय आता
कसले चित्र काढु

एकएक रंग मग
मला सांगु लागला
उपयोग त्यांचा मी
कुठे करु चांगला

ऐटीत पुढे मग
आला रंग निळा
काढा आकाश
मस्त ढगांशी खेळा

हातात हात घालुन आले
पोपटी आणि हिरवा
झाडे काढु छोटी मोठी
हवेत राहील गारवा

हा बघा आला
लाल म्हणजे तांबडा
जास्वंदीचे फूल
आणि तुरेवाला कोंबडा

रंगांच्या मारामारीत
तयार झाला काळा
काव काव करणारा
जसा चतुर कावळा

शुद्धतेचे प्रतिक
पांढरा श्वेत
पोहताना बगळे
काढायचा बेत

सुर्यफुल आणि झेंडु
रंग त्यांचा पिवळा
छान छान काढु
देवबाप्पाला माळा

लाल आणि निळा
मिळुन केला जांभळा
रसरशीत जांभळे काढा
नाही येणार कंटाळा

गुलमोहर: 

वर्षे एकदम बालवाडीत जातानाचा दिवस आठवला. काय कौतुक होत मला त्या नवीन रंगपेटी, चित्राच पुस्तक यांच.
रच्याकने सगळ्या बाल कवितांचा संग्रह काढ ना एक खुप छान, सोप्या भाषेतल्या आणि पिल्लाना समजणार्या आहेत. आणि पटणार्‍या सुद्धा Happy

सह्हीच!!! मस्त बालकविता Happy

काय कौतुक होत मला त्या नवीन रंगपेटी, चित्राच पुस्तक यांच.>>>शुकुला अनुमोदन Happy