बाहुली म्हणे टोपी हवी
घालायला पण सोप्पी हवी
त्यावर माऊचे कान हवे
छोटे गोरेप्पान हवे
आणखी हवंय बदामी फूल
त्यावर सुंदर मोत्यांची झूल
रंगीत डोक्यावर चांदण्या फुले
टोपीच्या गोंड्यावर चांदोमामा डुले
टोपीच्या भवती सोनेरी नक्षी
इवल्याशा पंखांचा पिटुकला पक्षी
टोपी घालून भूर गेली
ढगांमधून दूर गेली
तिथे होत्या पऱ्याच पऱ्या
चॉकलेटचे डोंगर आणि आईसक्रीमच्या दऱ्या
मिठाईच्या जंगलात बर्फीचे रस्ते
झाडा-झाडांवर केशर-पिस्ते
बाहुलीच्या डोक्यावर माऊची टोपी
दिसायला सुंदर घालायला सोपी
पऱ्यांच्य़ा राज्यात एकच गडबड
टोपीसाठीच सगळी धडपड
पऱ्या म्हणाल्या बाहुलीला
"टोपी दे ना आम्हाला!
आमच्याकडे कमी नाही,
पण आमच्याकडे टोपीच नाही
आम्हाला घालावा लागतो मुकूट
त्यातून नाही कसलीच सूट
मागशील ते तुला देतो
जादूचा झूला देतो
झुल्यात बसून फ़िरता येईल
हवं तिथं जाता येईल"...
बाहुलीला पण टोपी प्यारी
पऱ्यांचाही हट्ट भारी
बाहुली म्हणे,"विचार करते,
आधी झुल्यात बसून तर बघते!"
झुल्यात बसून निघाली भूर
पऱ्यांच्या गावातून भलतीच दूर
वाटेत सुटला वारा मध्येच
उडाली टोपी लागली ठेच
बाहुली बिचारी हिरमुसली
टोपीसाठी आसुसली
शोधून शोधून दमून गेली
तळ्याकाठी निजून गेली
रात्री देवबाप्पा आला
हळूच टोपी ठेवून गेला
टोपी मिळताच खुदकन हसली
बाहुलीच्या टोपीची गोष्टच संपली
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2010/12/blog-post.html)
मस्तय बाहुली आणि तिची टोपी.
मस्तय बाहुली आणि तिची टोपी.
मस्त बालकविता!!!
मस्त बालकविता!!!
नचिकेत दा, सहज .. सुंदर.. अन
नचिकेत दा, सहज .. सुंदर.. अन क्युट टोपी.
बालवर्गात अशी गाणी अश्या कविता असायलाच हव्या
कित्ती गोड कविता
कित्ती गोड कविता
सहीच, एकदम गोड, मस्त कविता
सहीच, एकदम गोड, मस्त कविता
छानच आहे बाहुली. नक्की
छानच आहे बाहुली.
नक्की यातील कुठली :विचारात पडलेली बाहुली:
अगदी ग्ग्गोड...!!!
अगदी ग्ग्गोड...!!!:)
कस्सल गोड..
कस्सल गोड..
वर्षा, वा!! फोटोही शोधलात!!
वर्षा, वा!! फोटोही शोधलात!!

सर्वांचे आभार!
मस्त गोडुली ,सुंदर कविता..
मस्त गोडुली ,सुंदर कविता..
सुरवातीचे वर्णन वाचुन
सुरवातीचे वर्णन वाचुन डोळ्यांसमोर गोंडस टोपी उभी राहीली. छान.
मस्त!मस्त!मस्त! आवडली!
मस्त!मस्त!मस्त!
आवडली!
किती छान
किती छान
कॉपी करुन घेतेली असून माझ्या
कॉपी करुन घेतेली असून माझ्या मुलांना ऐकवायला वापरणेत येईल.

रॉयल्टी मिळणार नाही
सर्वांचे आभार... @मंदार, अजून
सर्वांचे आभार...
@मंदार, अजून टोप्या हव्या असल्यास कळवणे..
सुंदर आणि गोड कविता.
सुंदर आणि गोड कविता.
खूपच गोड :० फार फार आवडली..
खूपच गोड :०
फार फार आवडली..
प-यांनाही jealous feel करायला
प-यांनाही jealous feel करायला लावणारी ही बाहुली आवडली नच्च्या! गेल्या दहा हजार बालपणात इतकं गोड बालगीत वाचलं नसेल कुण्णी! हे गाणं म्हणून ऐकायला अजून आवडेल. जियो!
कर्णिकसाहेब, दक्षिणा, झाडा,
कर्णिकसाहेब, दक्षिणा, झाडा, धन्यवाद!
गेल्या दहा हजार बालपणात इतकं गोड बालगीत वाचलं नसेल कुण्णी! >>>

कसंच कसंच!!!!
नचिकेत उर्फ "बालकवी".....
नचिकेत उर्फ "बालकवी"..... मस्त बालकविता..... आवडली.
लै भारी.
लै भारी.
मस्तच... आम्हाला पण मिळतील
मस्तच...
आम्हाला पण मिळतील का टोप्या??
http://merakuchhsaman.blogspot.com/
खुप्प गोड
खुप्प गोड
भुंगा, रैना, मेरा कुछ
भुंगा, रैना, मेरा कुछ सामान,(id ने तुम्हाला संबोधणे अवघड आहे..
आणि नावही माहित नाही. क्षमस्व! ), कविता
thanks!!
अतिशय गोंडस कविता आहे
अतिशय गोंडस कविता आहे ही....
मुलांचं विश्व समजून घेऊन ते शब्दांत पकडणं अतिशय अवघड असतं असं नेहमीच वाटतं!
ही गोडच झालीये कविता
धन्स!
मी प्रिंट करून घेतली असून माझ्या शानूल्या पुतण्याला ऐकवणार आहे!
खुप क्युट. मी प्रिन्टली आहे.
खुप क्युट.
मी प्रिन्टली आहे. माझ्या लेकीला ऐकवायला.
आनंद, कित्ती गोड कविता आहे.
आनंद, कित्ती गोड कविता आहे. सुपर्ब ! काय काय येतं रे तुला.... तु ट्रेकिंगवाला टफ, तु गझलेत गुंग, तु कवितेत कल्पक आणि आता बडबडगीत पण? एकदम All rounder हां!
तिथे होत्या पऱ्याच
तिथे होत्या पऱ्याच पऱ्या
लव्ककर !! अरेन्ज कर प्लीज ! 
चॉकलेटचे डोंगर आणि आईसक्रीमच्या दऱ्या
मिठाईच्या जंगलात बर्फीचे रस्ते
झाडा-झाडांवर केशर-पिस्ते >>> सानिका बरोबर मला या ट्रेकला यायला नकीच आवडेल !
छान.... गोड आहे कविता
छान.... गोड आहे कविता
अरेच्चा! बरीच जुनी कविता वर
अरेच्चा! बरीच जुनी कविता वर आली!
बागेश्री, पेशल ठांकू!
धन्स दोस्तहो!
मनिमाऊ, :लाजलेला बाहुला:
विश्वेश, नक्कीइइइइइइइइइ!!

एक पाऊस होऊन जाऊदे! मग सह्याद्रीत कवितेमधलं पर्यांचंच राज्य येतं!
Pages