८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन)
बेसन २ वाट्या
अर्धा वाटी तांदळाचे पिठ
चिंचेचा कोळ
गुळ
मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या)
मिठ
आल लसुण पेस्ट
कांदा चिरुन भाजुन
सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन
१ चमचा तिळ
अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला
तळ्यासाठी तेल
वरील जिन्नसातील अळूची पाने आणि तेल वगळून सगळे बेसनमध्ये सगळे मिसळून घट्ट मिश्रण करावे.नंतर पाट किंवा मोठे ताट घेउन त्यावर अळूचे पान उलटे ठेउन त्यावर पिठाचे मिश्रण सारवायचे. मग दुसरे पान उलटेच पण विरुद्ध दिशेन लावायचे आणि त्यावर मिश्रण सारवायचे. (अगदी शेण सारवतात तसेच :हाहा:) मग अशीच उलटी पाने एकमेकांच्या विरुद्ध लावायची एका लोड साठी मोठी असतील तर ५-६ आणि छोटी असतील तर ७-८ पाने लावायची. मग लावलेल्या चारी पानांच्या कडेची बाजु थोडी आत मोडून त्याचे लोड करायचे (चटई गुंडाळतात तशी :स्मित:) आता उकडीच्या भांड्यात वाफेवर हे लोड ठेउन २० ते ३० मिनीटे हे लोड वाफवुन घ्यावेत. थोडा धिर धरा मग थंड झाल्यावर लोडच्या सुरीने वड्या पाडा (हे तुम्ही सुचवा कश्यासारख्या ते). तवा चांगला तापवुन त्यावर थोडे तेल पसरवुन त्यात अळूवड्या मंद गॅसवर खरपुस तळा. तो.पा.सु. टाईपतानाच.
आल लसुण पेस्ट तसेच कांदा खोबर न टाकताही प्लेन करता येतात. पण ह्यातील खोबर खाताना खुसखुशीत लागत. करुन बघाच.
कांदा खोबर्याची पेस्ट आजिबात करु नका चांगली नाही लागत तसाच चिरलेला तळून कांदा आणि किसुन भाजलेले खोबरे थोडे कुस्करुन टाका.
तळताना आवडत असल्याच मोहरीची फोडणी आणि वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकु शकता.
गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही थोडा थोडा टाकला तरी चांगला लागतो.
अशीच अळूवडी अळूची पाने चिरुनही करता येते. ज्यांना पाने लावण्याचे काम कटकटीचे वाटते त्यांने पाने चिरुन मिश्रणात मिसळुन लोड करुन वाफवायचे. कोथिंबीर किंवा कोबीच्या वड्यांप्रमाणे. पण इसमे मजा नही.
अगदी सेम रेसिपी.. पण खोबरे
अगदी सेम रेसिपी.. पण खोबरे टाकले नाही कधी
ही आहेत अळूची ताजी ताजी
ही आहेत अळूची ताजी ताजी पाने
हे आहे पाठचे देठ
असे कापुन घ्यायचे म्हणजे वडी चांगली बसते. पोकळ राहात नाही.
मी थाळ्यावर पान ठेउन पिठ लावते. म्हणजे पानांचा आकार पुरतो बरोबर
अशी एकमेकांच्या विरुद्ध लावायची (३६ चा आकडा)
माझी श्रावणी माझा भार हलका करताना
अशा प्रकारे गुंडाळायची. मी ह्यात कडा मोडल्या नाहीत. पुर्ण झाल्यावर टोके आत टाकली आहेत.
अशा प्रकारे लोड तयार करुन वाफवुन घ्यायचे.
वाफवलेले लोड. (लांबी भांड्यात पुरत नसल्याने आधीच मधुन कापुन ठेवले होते)
तव्यात शॅलोफ्राय करण्या साठी टाकलेल्या वड्या.
झाल्या एकदाच्या (यम्मी)
जागुताई, खोबरे, कांदा, लसुणा
जागुताई, खोबरे, कांदा, लसुणा विरहीत बाकी सगळे सेम.. कदाचित देवाला नैवैद्याला ठेवतात म्हणुन..
जागु मस्तच , फोटो टाक लवकर.
जागु मस्तच , फोटो टाक लवकर. जागु तुझ्याकडून मला पुरणपोळीची रेसिपी हवी आहे. मागे मी मिसळपाव वर वाचलेली पण आता लक्षात नाही आहे , तर वेळ मिळाल्यास मायबोलीवर टाक ना , धन्यवाद .
जागुटले, ऐकल की तू लगेच माझं
जागुटले, ऐकल की तू लगेच माझं
तोंपासु मी करणार या शनिवारी, कांदा खोबर कधी टाकल नव्हत आता टाकुन बघते.
जागू, याच्या बेसनात करंदी
जागू, याच्या बेसनात करंदी घालतात. तसेच एखादे शिराळे पण किसून घालतात. (हि टिप खास कुणासाठी बरं ?)
नारळाच्या दूधात या वड्या शिजवून पण छान लागतात. दूध पूर्ण आटेपर्यंत शिजवायचे.
ही कांदा खोबर्याची आयडीया
ही कांदा खोबर्याची आयडीया माझीच आहे. काही जण वाटण करुन घालतात. पण मला त्या आजीबात आवडत नाहीत. पण तेच आख्खे ठेउन खुसखुशीत होतात वड्या.
उंडे शिजायच्या आधीच कापले ?
उंडे शिजायच्या आधीच कापले ? बेसन बाहेर नाही का आले ?
हो रुपाली श्रावणात म्हणून
हो रुपाली श्रावणात म्हणून प्लेनच करतात अळूवड्या.
नुतन कालच माझ्या मनात आल की एखाद्या गुरुवारी पुरण पोळ्या करायच्या. मैने तेरे मन की बात जान ली.
शुभांगी नक्की टाकुन बघ.
दिनेशदा तुमच्याकडून नेहमीच वेगळी माहीती मिळते. दुध चिंचेमुळे फाटन नाही ना ? तो करंदीचा प्रकार मी, साधना, भ्रमर, नुतन आणि आमच्या सारख्या मासेप्रेमिंसाच असेल. एकदा नक्की करुन बघेन. पण बाकी मिश्रण तेच टाकायचे का ?
जागूतै आता अळूची पानं शोधावी
जागूतै आता अळूची पानं शोधावी लागतिल.
हो जागू बाकि तोच मसाला. (काहि
हो जागू बाकि तोच मसाला. (काहि लोक तर खिमा पण घालतात.)
आणि दूध नारळाचे , त्यामूळे नाही फाटत.
अल्पना दिनेशदा खिमा मस्तच
अल्पना
दिनेशदा खिमा मस्तच लागत असेल. मी एकदा नक्की करुन बघेन.
जागूतै आता अळूची पानं शोधावी
जागूतै आता अळूची पानं शोधावी लागतिल >>> अल्पना अगं अरवी मिळते ना तुमच्याकडे ? लाउन टाक घरच्या बागेतल्या कुंडीत दोन तिन अळकुड्या. दोन आठवड्यात मस्त १२-१५ पानं मिळतिल तुला ताजी ताजी.
डॅफोडील्स अळकुड्यांची पाने
डॅफोडील्स अळकुड्यांची पाने अळूवडीसाठी नाही वापरत. अळकुड्यांना हिरवीगार पाने येतात. वडीचा अळू वेगळा असतो. वर पाने दिली आहेत. त्यांची देठे काळी असतात.
आणि दोन तिन अळकुडीत १२-१५ पान आठवड्यात नाही मिळ्णार महिन्यानी ४-५ पान मिळतील. त्यातल पण कापताना मधल पान ठेवायच असत.
अगं डॅफो इथे पानं पण मिळतात,
अगं डॅफो इथे पानं पण मिळतात, पण खाजरी असतात बहूदा. आठवड्याच्या बाजारात मिळतात कधी कधी.
आता चक्कर मारावीच लागेल.
jaagu धन्स ग
jaagu धन्स ग
हो जागु हिरवी पानं खाजरीच
हो जागु हिरवी पानं खाजरीच असतात. काळ्या देठांची अळूच चांगली असते.
इथे बंगलोर मध्ये अळूवड्यासाठी पानं कधीच दिसली नाहीत मग मी अरवी लाउन बघितली. दोन तिन आठवड्यात आली चांगली पानं.
आत्ता पर्यंत तिन चार वेळा वड्या केल्या.
ते मधलंपान ठेवायचं मला माहित नव्ह्तं.
अल्पना पाने खाजरी असतातच
अल्पना पाने खाजरी असतातच तशीही पण जास्त खाजरी असली तर चिंच थोडी जास्त लावायची.
नुतन
डॅफोडील्स मधले पान ठेवले म्हणजे झाडाला चांगला जोम मिळतो. नविन पानाला पोषण जास्त मिळत असते झाडाचे त्याच्या वाढीसाठी.
दिनेशदा चांगली धारदार सुरी आणि आपल्या हातातली कसब असली की नाही बाहेरजात मिश्रण उंडा मधुन कापताना.
मस्त रेसिपी. वड्या एकदम जबरी
मस्त रेसिपी. वड्या एकदम जबरी दिसता आहेत.
ह्यावेळी इंग्रोमध्ये मस्त आळूची पानं मिळाली आहेत. विकएंडला आळूवड्या करीन. रेसिपी शेअर केल्याबद्दल खुप खुप आभार!
तुझ्या रेसिपी फोटो बघुन लगेच
तुझ्या रेसिपी फोटो बघुन लगेच कराव्याश्या वाटतात.
तोंपासु... इथे आळू दिसलाच
तोंपासु...
इथे आळू दिसलाच नाही
जागू, मस्तच तोंपासु रेसिपी
जागू, मस्तच तोंपासु रेसिपी
मी कांदा नाही टाकत कधी, पुढच्या वेळी टाकुन बघेन.
आता पुरणपोळीची रेसिपी येऊ देत लवकर
जागूची कृती आणि यात चक्क मासे
जागूची कृती आणि यात चक्क मासे नाहीत.
आमच्या सारख्या शाकाहारी लोकांची दया आलेली दिसतेय.
जागू मी सगळ्या कृती वाचत असते बर का प्रतिसाद देत नसले तरी.
अळूवडी मी आताच करुन पाहिली
अळूवडी मी आताच करुन पाहिली .... मस्त झाली एकदम... धन्यवाद जागू.
अगदी किलर आळूवड्या आहेत जागू.
अगदी किलर आळूवड्या आहेत जागू. कांदा खोबरं घालून नाही कधी ट्राय केल्या पण मस्तच लागत असतील. फोटो पाहून अगदी आईच्या हातच्या अळूवडया आठवल्या.
वॉव. काय मस्त दिसताहेत.
वॉव. काय मस्त दिसताहेत.
मी कांदा खोबरे नाही घालत. पण
मी कांदा खोबरे नाही घालत. पण कैच्याकै आवडते. दोन अव आणि दहिभात स्वर्गच. जागुतै शाकाहारी झाल्या जणू
मस्त रेसिपी आणि
मस्त रेसिपी आणि फोटो.
>>आमच्या सारख्या शाकाहारी लोकांची दया आलेली दिसतेय>>
जागु मस्तच गा. तू दिलेल्या
जागु मस्तच गा.
तू दिलेल्या आळुला आता सहा सात पान आल्येत आणि या शनिवार रविवार करुयात हा विचारच करत होते इतक्यात तुझीच रेसिपी आली.
मी कांदा, खोबर ,आलं, लसुण नाही घालत पण या वेळी घालुन पाहीन.
बाकी वड्या झक्कासच दिसतायत. एकदम तोंपासु.
झक्कास दिसताहेत वड्या. कांदा
झक्कास दिसताहेत वड्या. कांदा खोबरं सोडलं तर सेम रेसिपी. लाळेरं बांधायला हवं होतं.
Pages