मित्रांनो : शुभप्रभात !
माझ्या पहील्या वहील्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आज कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते व ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक श्री राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. "मनमोर"च्या जडणघडणीत मायबोली अन इथल्या सगळ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे अन त्या ऋणात मी सदैव राहीनच !!!
प्रकाशन स्थळ :
साऊथ हॉल , मेफेअर बॅंक्वेटस,
डॉ. अॅनी बेसंट रोड
वरळी ,मुंबई
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे !!!
सस्नेह
गिरीश कुलकर्णी
दिनांक : ४/१२/२०१०
काही क्षणचित्रे :
प्रकाशन स्थळ :मेफेअर - साऊथ हॉल , वरळी , मुंबई
सन्माननीय पाहुणे : श्री मंगेश पाडगावकर , श्री राजदत्त , श्री बाजपेयी ( निवृत्त चेअरमन सेबी व एलआयसी) , श्री भीमराव पांचाळे व श्री अरुण म्हात्रे
प्रकाशन समारंभाला जमलेली मित्रमंडळी व आमंत्रित श्रोतेगण :
"मनमोर" प्रकाशित करतांना श्री मंगेश पाडगावकर व इतर मान्यवर
धन्यवाद !
सस्नेह
गिरीश
दिनांक २२ डिसेंबर २०१०
पुस्तक प्रकाशन सोहोळ्याची बातमी ई-टीव्हीने उत्तमरीत्या कव्हर केलीय त्याची चित्रफीत नुकतीच युट्युबवर अपलोड केलीय त्याची लिंक इथे देतोय. धन्यवाद !
http://www.youtube.com/watch?v=oAzYItGNaBw
चिअर्स !!!
गिरीश कुलकर्णी
अभिनंदन आणि शुभेच्छा गिरिष
अभिनंदन आणि शुभेच्छा गिरिष
अरे वा छानच ! अभिनंदन !
अरे वा छानच ! अभिनंदन !
अभिनंदन आणि पुढच्या
अभिनंदन आणि पुढच्या वाटचालींसाठी मनापासून शुभेच्छा...:स्मित:
"आणि जेधवा उजळित जीवन,
"आणि जेधवा उजळित जीवन, प्रीतिरवी हृदयात उदेला,
सल्लजतेने तुलाच तेव्हा, हृदयीचा उन्माद कथियला..... !"
कै. शांताबाईंच्या या कवितेतील ओळीप्रमाणेंच गिरीशजींची अवस्था असावी. आपल्या कार्पोरेट विश्वातील प्रचंड व्यस्त असलेल्या वेळापत्रकालाही अगदी व्यवस्थितपणे पद्धतशीर छेद देवुन ते आपल्या या सखीलाही पुर्ण न्याय देताहेत. कालचा कार्यक्रम अनुभवेपर्यंत गिरीश कुलकर्णी हे कार्पोरेट विश्वातील केवढं मोठं आणि बिझी प्रस्थ आहे याची कल्पनाच नव्हती. माझ्यासाठी तरी गिरीशदा म्हणजे....
"झंझावाताचे इशारे देवुन तुला पेटवणार्या...
त्या तुझ्या म्होरक्या मशालींना जरा विचार...
तुरुंग बदलल्याने क्रांती होत असते का म्हणून?"
असे पोटतिडकीने विचारणारा एक अस्वस्थ, थोडासा बंडखोरपणाकडे झुकणारा माणुस होता. कुठल्याही फसव्या संकल्पनांच्या मागे न दडता बिनधास्तपणे आपली व्यथा मांडणारा प्रसंगी तेवढ्याच स्पष्टपणे आपली क्षुब्धता व्यक्त करणारा एक बंडखोर होता. तर कधी....
अक्षरांचा संग........ अक्षरांचे रंग
कधी स्तब्ध तरंग...कधी मुक्त पतंग
कधी लुब्ध मारवा...कधी तप्त मृदंग
कधी आसक्त कविता..कधी तृप्त अभंग !!!!
असं काहीतरी वेड लावणारं लिहून जाणारा एक अक्षरवेडा, तृप्त कवि होता.
काल त्यांच्या कवितेबद्दल बोलताना जेव्हा पाडगावकर म्हणाले की कुठल्याही सांकेतिक इझममध्ये न अडकता आपल्या कवितेला वास्तवाचे एक नवे परिमाण देणारा हा कवि आहे, तेव्हा प्रथमच जाणवलं...
"अरे, हा गिरीश, आपल्याला कितीतरी नवीन आहे. प्रत्येक क्षणी नवा-नवा तरी हवा हवासा वाटणारा आहे."
पाडगावकरांनी आपल्या मिश्किल आवाजात सांगितलं की "एका कविने दुसर्या कविच्या कवितेला चांगलं म्हणणे, त्यांचं मनापासुन कौतुक करणे हा प्रकार मराठी साहित्यिकांच्या वर्तुळात तसा विरळाच. पण श्री. गिरीश कुलकर्णी यांच्या 'मनमोर' या काव्यसंग्रहातील कविता या खरोखरच इतक्या चांगल्या आहेत की त्या अतिशय चांगल्या आहेत हे सगळ्यांसमोर आनंदाने जाहीर करण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा इलाजच उरलेला नाही." तेव्हा जाणवलं की गिरीशजींच्या मैत्रीतुन आपण काय कमावलंय ते!
अवघ्या आठवड्याभरापुर्वी गिरीशजींशी ओळख झालेले मा. अरुण म्हात्रे ज्या पद्धतीने गिरीशना गेली कित्येक वर्षे ओळखत असल्याच्या आत्मीयतेने, प्रेमाने त्यांच्या कवितेबद्दल अगदी भरभरुन बोलले, तेव्हा जाणवले 'गिरीश' नावाच्या या माणसात किंबहुना त्याच्या कवितेत केवढी प्रचंड जादु, ताकद आहे ते. मा. राजदत्तजी, गझलनवाझ भीमराव पांचाळेंसारखी माणसे एका आमंत्रणावर जेव्हा एका नवख्या, नवोदित कविच्या कवितेच्या ओढीने धावत येतात तेव्हा ते केवळ त्या कविचे भाग्य नक्कीच नसते. तर ती कविच्या जाणिवांची, त्याच्या कवितेची शक्ती असते.
गिरीशजी तुमच्याशी असलेला हा स्नेह असाच वृद्धींगत होत राहो आणि पुढील आयुष्यात सौमित्र, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, संदीप खरे, गुरु ठाकुर या नावांच्या बरोबरीने 'गिरीश कुलकर्णी' हे नावही ऐकायची सवय आम्हाला लागो हिच इश्वरचरणी प्रार्थना !
या नितांतसुंदर आणि अविस्मरणीय अशा प्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी मला दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार !
खुप खुप शुभेच्छा!!
खुप खुप शुभेच्छा!!
अभिनंदन गिरीशजी आणि शुभेच्छा
अभिनंदन गिरीशजी आणि शुभेच्छा
वरील सर्व फोटोमधील चेहरे खूप
वरील सर्व फोटोमधील चेहरे खूप निर्खून पाहिलेत.
पण स्वतः गिरीशजी,कौतूकजी आणि विशालजी काही केल्या ओळखायला येत नाहीत.
प्लिज कोणीतरी मदत करील काय?
वरच्या छायाचित्रांतून दिसणारा
वरच्या छायाचित्रांतून दिसणारा कार्यक्रम बघून गिरीश कुलकर्णी हे नाव गुगलावेसे वाटले. विशाल कुलकर्णी यांचा प्रतिसाद वाचून ते केलेही.
आकडे, रुपये डॉलर आणि दिनार , रिस्क -रिटर्न, मेगा डील्स अशा जंजाळात या अत्यंत सुसंस्कृत व्यक्तीने स्वत:ची संवेदनशीलता आणि सामाजिक भान जपून ठेवलेले दिसते.
आपल्याला यांच्या कविता वाचायला मिळतात, आपले प्रतिसाद ते वाचतात आणि आपल्या कविता वाचून त्यावर प्रतिसाद देतात, यासाठी हळूच कॉलर टाइट करून घेतली.
दुसर्या छायाचित्रात बसलेल्यांमध्ये अगदी डावीकडे श्री बाजपेयींपलीकडे गिरीश दडलेले दिसताहेत. तर शेवटच्या छायाचित्रात पाडगावकर आणि राजदत्त यांच्या मध्ये उभे असावेत.
दुसर्या छायाचित्रात
दुसर्या छायाचित्रात बसलेल्यांमध्ये अगदी डावीकडे श्री बाजपेयींपलीकडे गिरीश दडलेले दिसताहेत. तर शेवटच्या छायाचित्रात पाडगावकर आणि राजदत्त यांच्या मध्ये उभे असावेत.
अरेव्वा. माझा अंदाज खरा निघाला तर...!
आता एक टप्पा आटोपला पण दोन टप्पे बाकीच आहेत.
गिरीश कुलकर्णी आपले मनोगत आणि
गिरीश कुलकर्णी आपले मनोगत आणि कवितेचा प्रवास व्यक्त करताना...
धन्स विशाल्,आता तुझा आणि
धन्स विशाल्,आता तुझा आणि कौतुक्,देवनिनादचा फोटो टाक बरं.....
गिरिश, मनःपुर्वक अभिनंदन.
गिरिश, मनःपुर्वक अभिनंदन. मायबोलीवरील कवी अशा तर्हेने प्रगती करत आहेत ही बातमी वाचून खूपच आनंद झाला. तुझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा.
गिरीश कुलकर्णी,आपले हार्दिक
गिरीश कुलकर्णी,आपले हार्दिक अभिनंदन व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.
आपले हार्दीक अभिनंदन गिरीश
आपले हार्दीक अभिनंदन गिरीश जी!!!!!!
अनेक शुभेच्छा! अभिनंदन!
अनेक शुभेच्छा! अभिनंदन!
गिरीश, सर्वप्रथम तुझे
गिरीश, सर्वप्रथम तुझे अभिनंदन. खरचं कार्पोरेट पसारा .. ते मनमोर पिसारा हा तूझा प्रवास खरचं (विशाल) आणि)(कौतूका)स्पद आहे.
कविता संग्रहाचं प्रकाशन म्हटलं की साधासा हॉल, चार जवळचे मित्र, नातेवाईक एवढाच सोहळा नजरेसमोर येतो. तूझं आयोजन खरचं व्यावसायिक दर्जाचं होतं, पण तितकचं कौटूंबिक वातावरण जपणारं.
अरूण म्हात्रे ज्याप्रमाणे म्हणाले कविता संग्रहासाठी हॉल तो ही झुंबर असणारा, हे खरचं लक्षवेधी होतं.
बाकी विशालने, एकूणच सोहळ्याबाबत अगदी मोजक्या शब्दात छानचं टिपलयं.
या सोहळ्यानिमित्ताने आपली ही पहिलीच भेट, ती ही इतकी अविस्मरणीय झाली ह्याचा मनापासून आनंद आहे मित्रा !!
मनमोर प्रकाशित झालचं आहे ... या कवितासंग्रहास इतकं यश मिळो की वाचक सतत म्हणत राहोत गिरीश ... वनमोर, वनमोर .... वनमोर.
असो, पुढील प्रत्येक लिखाणास भरपूर शुभेच्छा !!
सस्नेह !!
देवनिनाद
विशाल..........फार सुरेख
विशाल..........फार सुरेख वर्णन केलं आहेस........ कौतुकही किती भरभरुन !! इथे मला तुझंही कौतुक करावंसं वाटतंय..... फार मोठ्या मनाचा आहेस तू !!
गिरीश..... मिलना पडेगा बॉस
"एका कविने दुसर्या कविच्या
"एका कविने दुसर्या कविच्या कवितेला चांगलं म्हणणे, त्यांचं मनापासुन कौतुक करणे हा प्रकार मराठी साहित्यिकांच्या वर्तुळात तसा विरळाच". - पाडगावकर
आंतरजालाने या पद्धतीला फाटा देवून नवे युग सुरू केल्याबद्दल आंतरजालाचे लाखलाख धन्यवाद.
डॉक.... तुमच्यासाठी.....
डॉक.... तुमच्यासाठी.....
धन्स विशाल...... देवनिनादचा
धन्स विशाल...... देवनिनादचा फोटोही दिसला यानिमित्ताने.....:)
मुटेजी.... आता ओळखा???
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
गिरिश तुमचे अभिनंदन आणि पुढील
गिरिश तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालिला शुभेच्छा.
डॉक्टर साहेब, हे हुई ना
डॉक्टर साहेब, हे हुई ना बात?
फिक्कट गुलाबी ज्यांसी शर्ट, त्यात लपले असणार प्रेम हर्ट
कविता-लेख लिहण्यात एक्स्फर्ट, विशाल लेखणी तयाची......!!
वाकुन बघतोय कसा हा गडी, हाफ कुर्ता पायाची घडी
पाहत असावा फू बाई फुगडी, कौतुकाने.... !!
काय अर्थ घालणे वाद? नाही कळले देव वा निनाद
पण अंदाज देते थोडी साद, असावा का तो देवनिनाद?
धन्स विशाल. तू, कौतूक, आणि
धन्स विशाल. तू, कौतूक, आणि शेजारचा देव का? जयूताई, यू आर राईट! विशाल खरंच 'विशाल' आहे!
अरे वा गिरीशजी...खुप खुप
अरे वा गिरीशजी...खुप खुप अभिनंदन..मला माहितच नव्हतं या सोहळ्या बद्दल तब्येत ठिक नसल्यामुळे...नाहीतर नक्की आले असते. तुम्हाला खुप शुभेच्छा!!
कौतुके पाहती सुहृदाची
कौतुके पाहती सुहृदाची श्रेष्ठी स्वये.., भार्ये सवे
निनाद करती सखे सवंगडी अन विशालासवे...!
सगळ्या मित्रांचे आभार !!!
सगळ्या मित्रांचे आभार !!!
कार्यक्रम कहरच उत्तम पार पडला. मला स्वतःला एक निस्सीम आनंद देऊन गेला. इथे रहात नसल्याने खुप प्रयत्न करुन मला हे पुस्तक अन हा कार्यक्रम पार पाडता आला. शेवटपर्यंत पळापळ होती. यात अनेक मैत्रांच मोलाच सहकार्य मिळाल.
इथे विशाल-निनादनं खरच मोठ्या मनान सगळ लिहीलय त्यावर काय लिहायच ते सुचत नाहीय.
भरत : इटस अ ह्म्बलींग एक्सपेरीअन्स !!!
बाकी निवांत सगळ्यांना वेगळ लिहीनच !
सस्नेह
गिरीश कुलकर्णी
मित्रहो : पुस्तक प्रकाशन
मित्रहो :
पुस्तक प्रकाशन सोहोळ्याची बातमी ई-टीव्हीने उत्तमरीत्या कव्हर केलीय त्याची चित्रफीत नुकतीच युट्युबवर अपलोड केलीय त्याची लिंक इथे देतोय. धन्यवाद !
http://www.youtube.com/watch?v=oAzYItGNaBw
चिअर्स !!!
गिरीश कुलकर्णी
मनापासून शुभेच्छा आणि
मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन...
शुभेच्छा
शुभेच्छा
Pages