Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 2 December, 2010 - 09:34
काहीतरी खुपतंय, सलतंय आत
कुठंतरी खोलवर दुखतंय आज
उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
जयश्री अंबासकर
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच!!! सयींचं व्याकुळ, आठव
मस्तच!!!
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज>>>>>सुरेख
किती सुंदर लिहिलं आहेस गं.
किती सुंदर लिहिलं आहेस गं. प्रत्येकाने अनुभवली असेल नाही अशी वेळ? एकदम आवडलं आणि पटलंपण.
सु रे ख !! प्रत्येकाने
सु रे ख !!
प्रत्येकाने अनुभवली असेल नाही अशी वेळ? >> अगदी अगदी आर्च..
रडवेली होते देहाची बोली कबुली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज>>>
फारच सुंदर ओळी जयश्री!
-'बेफिकीर'!
पापण्यांची होते झालर
पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
वा... फार छान.
सुंदर !..शेवटच्या चार ओळी तर
सुंदर !..शेवटच्या चार ओळी तर खासच!:)
फारच सुंदर,कवितेच्या नाव पण
फारच सुंदर,कवितेच्या नाव पण सुंदर.,शेवटचे कडवे लाजवाब.
छान! पापण्यांची होते झालर
छान!
पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज...
मस्त!
अ फा ट
अ फा ट !!!!!
खोल खोल ...घुसली कविता
जयुताई, खूप सुंदर कविता.
जयुताई, खूप सुंदर कविता.
सुंदर ह्याला चाल लावली आहे
सुंदर

ह्याला चाल लावली आहे का ? गाण्यात खूप छान वाटेल असं वाटलं
आवडली
आवडली
अगो, अनुमोदन. जयुताई कधी अन
अगो, अनुमोदन. जयुताई कधी अन कोण ऐकवेल हि कविता? सुबोध कि?
सुंदर ! -हरीश
सुंदर !
-हरीश
पापण्यांची होते झालर
पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
मस्त !!
सुंदर
सुंदर
खूप छान!!!
खूप छान!!!
ग्रेट ! मस्त आहे कविता !
ग्रेट ! मस्त आहे कविता !
सुरेख
सुरेख
आठव मोहळ >>> विशेष आवडलं.
आठव मोहळ >>> विशेष आवडलं. नेहमीप्रमाणे मस्त!!
शुक्रिया यारो......... खूप
शुक्रिया यारो.........

खूप छान वाटलं तुमचे अभिप्राय वाचून
कोरडा श्रावण भिजवे आज... वा!!
कोरडा श्रावण भिजवे आज...
वा!!
जयवी सुंदर कविता
जयवी
सुंदर कविता
भावनांच्या पार आतपर्यंत
भावनांच्या पार आतपर्यंत केलेली सुंदर कलाकुसर!
सुरेख! खरीखुरी!
सुरेख! खरीखुरी!
फारच सुंदर.
फारच सुंदर.
छान!!!
छान!!!
"उरात कल्लोळ, मौनाचं
"उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज"
...... छान
मनापासून धन्यवाद लोक्स
मनापासून धन्यवाद लोक्स
किती व्या़कूळ भावना आहेत या
किती व्या़कूळ भावना आहेत या कवितेत ! छान आवड् ली
Pages