तू
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
15
आपल्या धर्माप्रमाणे वाग तू
जीवना नाहीस पाणी! आग तू
उसळण्याचे विसरलेल्या सागरा
वादळे माझ्या जवळची माग तू
भेटण्याचे वचन जे होते दिले
येउनी स्वप्नात त्याला जाग तू
सारखा बाजार उसळे वर तरी
घसरणारा खालती समभाग तू
पाखरे निजती तुझ्या खांद्यावरी
स्वप्नं त्यांची फुलविणारी बाग तू
नाव जर भवसागरी तारायची
दु:ख ने! ओझे सुखाचे त्याग तू
शोध स्वत्वाचा तुला जर घ्यायचा
काढ माझ्या पावलांचा माग तू
विषय:
प्रकार:
शेअर करा
वा मिल्या
वा मिल्या दादा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरेच दिवसांनी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेहेमी सारखीच छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप
खूप धन्यवाद केदार..
तू एकटाच दिसतोस ज्याला ही गझल आवडली.. बाकी कुणीच काही प्रतिसाद दिला नाही कारण
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
visit http://milindchhatre.blogspot.com
अस नाही रे
अस नाही रे मिल्या दादा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कदाचित कोणी वाचली नसेल. वाचतील बघ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच आहे
छानच आहे गजल. त्या समभागाच्या ओळी बाकीच्या 'थीम' शी विसंगत वाटतात. शिवाय सगळ्यांना सहज कळेल असं रूपक आहे का ते? ( एक अल्पमति प्रश्न)
मिल्या ..
मिल्या .. खूप दिवसांनी दिसतोयस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गजल छान आहे पण शोनूला अनुमोदन.
(सारखा बाजार उसळे वर तरी
घसरणारा खालती समभाग त) ह्या ओळी बाकी सगळ्यांत फिट्ट बसत नाहीयेत यार !
बाकी सगळी गजल आवडली -- विशेषतः पाखरांच्या ओळी खूपच छान.
>>सारखा
>>सारखा बाजार उसळे वर तरी
घसरणारा खालती समभाग तू
अगदी अगदी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदार :
केदार : प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. आले बघ अजून तीन प्रतिसाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शोनू , संदीप : खूप धन्यवाद.. समभाग शेर जरा विचित्र वाटणे साहजिक आहे... पण एक वेगळा काफिया म्हणून तो प्रयत्न केला होता... तसेही ह्या गजलेले थीम अशी नाही आहेच म्हणून एक प्रयोग केला वेगळा काफिया घेण्याचा..
शोनू : समभाग शब्द आता बर्यापेकी परिचित झाला आहे.
चिन्नू : जरा सविस्तर मत दे की तुझे... मागच्यासारखे... शिकायला मदत होइल नक्कीच
visit http://milindchhatre.blogspot.com
मिल्या, ही
मिल्या, ही गझल खूप सफाईदार जमली आहे मागच्यापेक्षा. आता तुम्हीच परवानगी दिलीत. (भोगा मग :))
आपल्या धर्माप्रमाणे वाग तू
जीवना नाहीस पाणी! आग तू
पाण्यासारख्या संथ जीवनाला खडबडून जागे करणारा मतला आवडला.
उसळण्याचे विसरलेल्या सागरा
वादळे माझ्या जवळची माग तू
वरचा शेर मस्तच. जे कुणी स्वतःच्या ताकदीला ओळखत नाही, त्यांना प्रेरणादायक असा शेर वाटला.
भेटण्याचे वचन जे होते दिले
येउनी स्वप्नात त्याला जाग तू
हा ठीक ठीक. जाणकारांच्या भाषेत भरीचा वाटला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाखरे निजती तुझ्या खांद्यावरी
स्वप्नं त्यांची फुलविणारी बाग तू
नाव जर भवसागरी तारायची
दु:ख ने! ओझे सुखाचे त्याग तू
शोध स्वत्वाचा तुला जर घ्यायचा
काढ माझ्या पावलांचा माग तू
हे तीनही शेर छान. स्वतःला जबाबदारीची आणि ताकदीची जाणीव करून देणारी ही एक सुंदर आत्मचिंतनपर गजल.
सारखा बाजार उसळे वर तरी
घसरणारा खालती समभाग तू
हा प्रवाहात बसत नाहीये. कदाचित तुमचे म्हणणे असे असावे:- जरी उसळणार्या बाजारात तू घसरणारा समभाग असलास तरीही तू जाग. सुखाचा त्याग कर. जबाबदारीची जाणीव करून घे आणि स्वतःची ताकद ओळख.
शेर मध्ये हवा असलेला विरोधाभास जरी साधला असला (उसळणे-घसरणे), हा शेर अपूर्ण वाटतो.
तरी नेहमीच्या कोपरखळ्या किंवा प्रियाचे आराधन नसलेली साधी सहज आत्मचिंतनपर वेगळी गजल लिहील्याबद्दल तुमचे अभिनंदन!
- आ. चिन्नु
मस्त रे
मस्त रे मिल्या
वा मिल्या,
वा मिल्या, मस्तच ....
मिल्या
मिल्या मतला सुरेख. दुसरा शेरही चांगला जमलाय. आवडला.
'तू' प्रत्येक शेरात वेगवेगळा असल्याने मला काही वेळा वाचताना गडबडल्यासारखं झालं खरं. म्हणजे पहील्या शेरात ही गडबड होत नाही कारण तो 'जीवना'ला उद्देशुन आहे हे स्पष्ट होतय. दुसर्या शेरातला 'तू' सागर (इथे सागर हा शब्द जीवनासाठी वापरला आहे असाही एक अर्थ काढता येईल) आहे. मग पुढच्या सगळ्या शेरात हा 'तू' कोण ते विचार करुन ठरवावं लागतंय. पण तो मा. बु. दो. स.
मला वाटतं
मला वाटतं समभाग, पाखरे, स्वत्वाचा शोध हे शेर काढून वाचली तर जास्त चांगली वाटेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स
धन्स चिन्नू, मीनु आणि आरती
चिन्नू : आभार सविस्तर प्रतीक्रियेबद्दल.
'भेटण्याचे वचन' शेर भरीचा का वाटला? भेटण्याच्या वचनाला निदान स्वप्नात येउन तरी 'जाग' अशी कल्पना होती...
समभाग शेर प्रवाहात बसत नाहीये म्हणजे काय?
तसेच तुम्ही म्हणताय तसा अर्थ नाहीये...
अगदी सार्यांचा फायदा होत असला तरी तुला मात्र दुनियेच्या बाजारात फायदा करुन घेता आला नाही. वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायलाही तूला जमले नाही... असा अर्थ आहे...
मला वाटतं समभाग, पाखरे, स्वत्वाचा शोध हे शेर काढून वाचली तर जास्त चांगली वाटेल. >>> काय गं मीनू 'तू' तर आख्खेच्या आख्खे शेरच वगळायला सांगत आहेस![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
visit http://milindchhatre.blogspot.com
अय्या आभार
अय्या आभार प्रदर्शन कशाला रे! मला वाटले ते मी लिहुन काढलेच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
समभाग शेर तू सांगितल्यावर कळला. जरा उशिरा दिवे लागलेत आमच्याकडे
तुलापण थँक्स बर्का!
छान गझल
छान गझल मिल्या..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
समभागाचा शेर.. मला वाटतं हा "शेयरोशायरी" चा उपलब्ध साहित्यामधला पहिला प्रयत्न असावा..