Submitted by राफा on 1 December, 2010 - 05:45
‘पुणेरी पाट्या’ संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?
- आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
- ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)
- दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
- कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.
- टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
- टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
- कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)
- गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
- पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
- कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
- विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.
- शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
- दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
- उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
- हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)
- आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
- कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
- शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
- राफा
गुलमोहर:
शेअर करा
चोखनळीने विचित्र आवाज करत बसू
चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
>>>
12.शीतपेयाच्या ग्लासच्या
12.शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी. >>>
18.शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये. >>
3.दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल. >>
राफा.. पून्हा एकदा .. छा गये भिडू.
रॉक्डी......
रॉक्डी......
चला रे सुचेल तशी यादी वाढवा
चला रे सुचेल तशी यादी वाढवा
खूप मस्त. लगेच प्रताधिकार
खूप मस्त. लगेच प्रताधिकार सुरक्षित करा नाहीतर इमेल मधून इकडे तिकडे जाईल.
अरे देवा, हसून हसून मेले
अरे देवा, हसून हसून मेले मी.....
१. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
>>> अगदि, अगदि.
18. शीतपेय संपल्यावर ग्लास
18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
===
माझी पाटी: "आमच्या बर्गरची
माझी पाटी:
"आमच्या बर्गरची मूळ कल्पना शामकाकांची आहे. जोशी वडापाववाले यांची नाही याची कृपया नोंद घ्यावी"
चोखनळीला शोषनळी म्हनता येईल
चोखनळीला शोषनळी म्हनता येईल का? ए.पु.प्र.
1] पेपर नॅपकीन तोंड पुसायला
1] पेपर नॅपकीन तोंड पुसायला आहे पर्समधे कोंबु नये.
२] जवळ वेटर असताना लांबच्या वेट्रेसल बोलवु नये.
३] नीट इंग्रजी येत नसेल तर कृपया मराठी / हिंदीत बोला.
प्रत्येक वाक्याला फारच
प्रत्येक वाक्याला
फारच कल्पक..
कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या
कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत. >>>
दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल. >>
<<टिव्ही चालू ठेवायचा किंवा
<<टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत. <<
आणि इतर सगळेच अफलातुन
राफा बॅक!!!
(No subject)
अशक्य हसलोय, हसतोय
अशक्य हसलोय, हसतोय
अरे देवा! अशक्य आहे! मामी
अरे देवा! अशक्य आहे!
मामी इस म्हणिंग राईट. हवंतर सरळ स्क्रीनशॉट घेउन चित्र म्हणुन टाका वॉटरमार्कसहित..नाहीतर चोरीस जाण्याची शक्यता आहे!
राफा झकास.. दिवस सार्थकी
राफा झकास.. दिवस सार्थकी लागला रे
राहुल, . जबरी.
राहुल, :हाहा:. जबरी.
अशक्य..राफा..मस्त्..अजुन
अशक्य..राफा..मस्त्..अजुन हसतेय ..:D
राफा धम्माल!
राफा धम्माल!
टोमॅटो वा बटाट्यामधे आळ्या
टोमॅटो वा बटाट्यामधे आळ्या आढळल्यास (खरच आढळल्या होत्या) त्याची तक्रार शेतकर्याकडे करावी. शेतकर्याचा पत्ता हवा असल्यास वेगळा चार्ज पडेल. फोन लागला नाही तर व्यवस्थापन जबाबदार नाही.
अ श क्य
अ श क्य
मस्तच!
मस्तच!
* इथे गोमांस वापरले जात नाही,
* इथे गोमांस वापरले जात नाही, कृपया काचा तोडू नयेत.
*फ्राईजची लांबी कमीजास्त होऊ शकते, कृपया मोजत बसू नये, सरासरी लांबी काढून बघू नये.
*सॉसच्या यंत्राचा दट्ट्या फार वर खाली करु नये.
* कोडी सोडवायला पेन्सिल मिळणार नाही, आपली आपण आणावी.
*चित्रात दाखवलेय, त्यापेक्षा तयार पदार्थ वेगळा दिसू शकतो.
* इथे ज्या कंपनीचे शीतपेय मिळते, तेच मागावे.
(No subject)
जबरदस्त
जबरदस्त
कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या
कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत. >>
शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
>>
(No subject)
8.गि-हाईकांचा संतोष हेच आमचे
8.गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
9.पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
>>>>>
एकदम खास्सच
मस्त आहे.
मस्त आहे.
Pages