पाकीस्तानची रडीची खेळी
२६-११ नंतर पाकीस्तानने लगेच इतर प्रगत देशांना (पक्षी अमेरिका) फोन करुन कळविले की, "२८ तारखेला भारताचे पंतप्रधान माननिय मनमोहन सिंगांनी पाकच्या पंतप्रधानांना (झरदारी) फोन करुन भारत तूमच्यावर कारवाई करेन अशी धमकी दिली."
त्या अनुषंगाने पाकने लगेच आपल्या मिल्ट्रीची कारवाई सुरु करुन सिमा रेषेवर जवान पाठवले. २९-३० ता पेपर्स मध्ये त्या बातम्या वाचता येतील.
प्रगत राष्ट्रांनी भारताला विचारल्यावर मनमोहन सिंग म्हणाले की जर कोणाच्याही फालतू कॉल ला माझा कॉल समजून ते जर काही करत असतील तर त्यांचा क्रेडीबिलीटी वर आम्हाला शंका आहे".
पाकने रडीचा डाव खेळून पाहीला. ह्या वेळेस यश आले नाही. पाक नेहमीच रडीचे डाव खेळत असतो, ते आपल्याच भारतीयांना कळत नाही वा कळले तरी वळत नाही.
त्या रडीवर पंतप्रधानांचे उत्तर.
I have seen several misleading stories about a hoax telephone call from me to President Zardari of Pakistan. The facts are as follows.
We were informed by friends from third countries that Pakistan President Zardari believed that he had received a threatening telephone call from me on 28 November, after the attack on Mumbai. We immediately clarified to those friends, and we also made it clear to the Pakistan authorities, that I had made no such telephone call. My last and only conversation with President Zardari was in Islamabad during my May 2008 visit to Pakistan. The only telephone conversation that I have had with a Pakistani leader since the attack on Mumbai was on the evening of November 28 when I spoke to the Pakistan Foreign Minister Shah Mahmood Qureshi who was then in New Delhi.
It is, however, worrying that a neighbouring state might even consider acting on the basis of such a hoax call, try to give it credibility with other states, and confuse the public by releasing the story in part. I can only ascribe this series of events to those in Pakistan, who wish to divert attention from the fact that a terrorist group operating from the Pakistani territory, planned and launched a ghastly attack on Mumbai.
New Delhi
December 7, 2008
मी येत्या अनेक पोस्ट्स मधून दहशतवाद विरोधी व पर्यायाने पाकचे डाव उघडे करनारे पोस्ट करनार आहे. सध्यातरी तोच एककलमी कार्यक्रम आहे. त्यात कूठल्याही प्रकारची भडक भाषा मी वापरनार नाही. वाचकांनीही ती वापरू नये ही विनंती.
<<पाकीस्थान
<<पाकीस्थानची रडीची खेळी >>
'पाकीस्तान' च्या ऐवजी 'पाकीस्थान' लिहिण्यामागे काही विशेष कारण आहे का?
नाही काहीच
नाही काहीच नाही. स्थान जास्त मराठी वाटते. दुरुस्त करतो.
परराष्ट्र
परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी ह्या नावाने फोन केला गेला अशी बातमी वाचली सकाळमधे ..
केदार,
केदार, पाकच्या म्हणण्याप्रमाणे मुखर्जींचा (परराष्ट्र मंत्रालयातून) 'धमकीचा' फोन होता. पंतप्रधान सिंग यांचा फोन वादाच्या भोवर्यात नाही आहे. ती बोलणी सौहार्द पुर्ण झाली होती. एव्हढ्या मोठ्या स्ततावरचा (पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री) फोन येण्याच्या आधी तशी त्याची 'पुर्व-सुचना' दिली गेलेली असते. आता जरी असा फोन कुठलिही पुर्व सुचना न देता झाला असेल तरी,
(अ) भारताचे परराष्ट्रमंत्री पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन करतील, ते पाकच्या अध्यक्षांना फोन करणे हे राजनैतीक संकेतातच बसत नाही.
(ब) एव्हढी महत्वाची बातमी असेल तर शहानिशा नको का करायला.
उद्या अनवधानाने किती गंभीर चुक होण्याचा धोका आहे याची झलक मिळते. अणूची वस्त्रे किती सुरक्षीत हाती आहे हे कळते. ही लबाडी काही चालली नाही आणि पाकला अफगाण सिमेवरनं सैन्य कमी करायला कारण अपुरे पडले. राईस/ म्युलन यांनी धोका नको म्हणुन धावत्या भेटी झाल्या.
सुरवातीचे
सुरवातीचे काही दिवस भारताने पुरावे नाही दिल्याचा सतत घोषा लावलेल्या पाकने आता भारताने पुरावे (फोन संभाषण, फोन वर दिले गेलेले आदेश, अपराध्याची मुलाखत) हातात दिल्यावर 'हे पुरावे अपुरे आहे'. तिकडे जन्मदात्याने कसाब हा त्याचा मुलगा आहे हे सांगितले तरी तो केवळ म्हणतो हा पुरावा होत नाही, मग संपुर्ण गांवाची नाके बंदी कशाला ? DNA परि़क्षा घेतली तरी ते पाकच्या कळसुत्री सरकारला मान्य होणार नाही.
दहशतवादाशी लढण्यात सुरवाती पासुनच कमालिची उदासिनता पाक सरकार/ लष्करात दिसुन येते. हाच उत्साह असेल तर भारताने कोणाशी आणि काय चर्चा करायची?
भारतावर अजुन एक हल्ला झाला तर भारत खपवून घेणार नाही असे नव्या गृहमंत्र्यांनी सांगितले (धमकावले!). आता हा अजुन एक हल्ला म्हणजे काय?