किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका
कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय
किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? ...!!
जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी
गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी
दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही
आनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही
चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय ...!!
राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली
भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली
कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!!
शंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायक दिसत नाही
’ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच लायक भासत नाही
असेच आमचे गणराज्य, अशीच आमची लोकशाही
भगत-बापूंना माहीत नव्हते, अर्थ निघणार असाही
मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलईसाय ...!!
गंगाधर मुटे
......*.......*......*......*......*......*.......*......*......*......
इसम = व्यक्ती
जन्म गेला पूर्वजांचा, करता
जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी
तेही नाचलेच होते, चप्पल घेऊन डोक्यावरी
आनुवंशिकतेचे जनुकं, काही केल्या मरत नाही
उलटून गेल्या पिढ्या तरी, लाळघोटणे सरत नाही
लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!!
हे एकदम खरे .छान .एकदम भिडले.
मस्त जमलाय तडका!!
मस्त जमलाय तडका!!
राजेशाहीची भलावण, रक्तामासात
राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली
भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली
कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय
फार छान...
वाह अगदी झणझणीत तडका !
वाह अगदी झणझणीत तडका !
गंगाधर जी , जबरदस्त .. ह्या
गंगाधर जी , जबरदस्त .. ह्या विषयावर कविता लिहिली गेली हेच चांगलं आहे.. !
झणझणीत कविता
झणझणीत कविता
छान आहे. चपखल
छान आहे. चपखल
घराणेशाही बद्दलची तिडिक
घराणेशाही बद्दलची तिडिक कवितेतून स्पष्ट होत आहे.
“शंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायक दिसत नाही”
दुर्दैवाने हे सत्य आहे असं म्हणावं लागतं.
प्रतिसादाबद्दल सर्वांचा
प्रतिसादाबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे.
मुटेजी, तुमच्या कवितेमधला
मुटेजी,
तुमच्या कवितेमधला 'असंतोष' सडेतोड वाटला !
शंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायक दिसत नाही
’ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच लायक भासत नाही
असा दुसरा कुणीही राष्ट्रनायक निर्माण होऊ शकला नाही हे ही एक दुर्दैव मानायचं का ?
चुरचुरणारा तडका!
चुरचुरणारा तडका!
सर्वच कविता
सर्वच कविता अप्रति................म.
शंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायक दिसत नाही
’ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच लायक भासत नाही
असेच आमचे गणराज्य, अशीच आमची लोकशाही
भगत-बापूंना माहीत नव्हते, अर्थ निघणार असाही
मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलईसाय
हे लइ भारी...............
अनिलजी,अरुंधतीजी,शोभाजी आभारी
अनिलजी,अरुंधतीजी,शोभाजी
आभारी आहे.
अनिलजी,
या कवितेचा नायक असलेला भारतपुत्र स्वत:चा असा समज करून घेतो की, या देशातल्या शंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायकपदासाठी कोणीही पात्र नाही. केवळ एकच घराणे त्याला लायकीचे दिसते. ’ते’ घराणे सोडून अन्य, कुणी लायक आहे हेच त्याला मान्य नाही. कदाचित हेच घराणे सत्तेत असले की त्याला मलई-साय खायच्या भरपूर संध्या उपलब्ध होत असाव्या. म्हणून तर तो एवढा उदोउदो करतो. असा अर्थ मला अपेक्षित आहे.
पण या अर्थाऐवजी वाचकाला "असा दुसरा कुणीही राष्ट्रनायक निर्माण होऊ शकला नाही" असा अर्थ ध्वनित होत असेल तर माझ्या शब्दांच्या मांडणीत काहीतरी गडबड झाली असावी, असे वाटते. बदल करण्याचा प्रयत्न करतोय.
असा दुसरा कुणीही राष्ट्रनायक निर्माण होऊ शकला नाही, हे वाक्य अत्यंत चुकिचे असून या देशाच्या राष्ट्रनायकपदासाठी या देशातले किमान काही लक्ष लोक "त्या" घराण्याएवढेच किंवा त्यापेक्षाही जास्त अधिक पात्रतेचे आहेत, हे माझे ठाम मत आहे. शिवाय ज्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल त्यांनी तरी हीच धारणा बाळगायला हवी.
मुटेसाहेब झिंदाबाद तुमच्या
मुटेसाहेब झिंदाबाद
तुमच्या भारत चाट हाऊस मधे धावत पळत आलो...!!!
नागपुरी तडका लैच झणझणीत बरं का...
खुपच सुंदर नागपुरी तड्का
खुपच सुंदर
नागपुरी तड्का जोरात दिलाय.
एकदम मस्त...
एकदम मस्त...
’ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच
’ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच लायक भासत नाही
हे प्रतीकात्मक असेल तर ठीक आहे. अन्यथा अत्यंत एकांगी आहे.
शंभर कोटी भारतीयांना चाटण्यासाठी पायांची बरीच व्हरायटी उपलब्ध आहे.
दक्षिणेकडून सुरुवात केली तर जयललिता अम्माच्या पायांवर लोटंगण घ्यायला रांग लागते. त्या रांगेत नसलेले करुणानिधी आणि त्यांच्या राजपुत्र, राजकन्यांच्या पायाशी. मग त्यात त्यांचा भाचाही आला बरं.
देवेगौडा पण आपले व आपल्या मुलाचे पाय धुऊन तयार आहेत, कोणी चाटणारे मिळतेय का ते बघत.
उत्तरेत सगळ्यांची जाग मायावतींच्या चरणाशीच असते. लोहियांचा वारसा सांगणार्या मुलायमसिंगांना पण आपल्यानंतर आपल्या मुलाचे , भावाचे व सुनेचे पायच सुंदर वाटले
कम्युनिस्टांचा पाया याबाबतीत मात्र कच्चा आहे.
आता महाराष्ट्राकडे वळूया. एका सम्राटाचे पाय खूप चाटले गेल्याने झिजले,( तेच ते सम्राट ज्यांच्या सम्राज्ञी मॉसाहेब आहेत) तेव्हा त्यांनी आपल्या सुपुत्राचे पाय रिप्लेसमेंटमध्ये दिले. ते पाय लोकांना पसंत पडत नाहीत अशी शंका येताच नवा सूर्यही उगवला आपले पाय घेऊन. गडबड अशी झाली, की त्यांनी आपल्या नात्यातल्या एकाला माझ्यानंतर तुझेच पाय असे बाळकडू पाजले होते, त्याला अगदी मोक्याच्या क्षणी तू पाय चाटून नाही घ्यायचे तर चाटायचे असे सांगितले.
महाराष्टातल्या जिल्हयाजिल्ह्यात असे चव्हाण देशमुख नाईक शिंदे गायकवाड पाटील इ. पाय सजलेले आहेत.
फार कशाला चिखलात उगवणार्या कमळालाही अशा पिढीजात पायांचा मोह सुटला नाही. त्यांचा एक शिलेदार दगाबाजीस बळी पडल्यावर त्याच्या पत्नीस किंवा सद्गुणी राजपुत्रास सिंहासन द्यावे अशी मागणी पुढे आली. यांचे पाय चटण्यासारखे नाहीत असे सांगितले गेल्यावर त्यांच्या अर्धशिक्षित तरीही कोट्याधीश कन्येचे पाय पुढे आले. बरोबरच त्यांच्या नात्यातल्या ३-४ जोड्याही विटेवर उभ्या राहिल्या.
तात्पर्य चाटण्यासाठी पाय बरेच आहेत. ज्याला जे हवे ते घ्यावेत.
<< हे प्रतीकात्मक असेल तर ठीक
<< हे प्रतीकात्मक असेल तर ठीक आहे. अन्यथा अत्यंत एकांगी आहे. >>
एकांगी अजिबात नाही, कारण..
कवितेचा रोख घराणे,राहुल व सोनिया यांचेवर नसून त्यांना एकदम कृष्ण/भारतमातेचे स्वरूप देऊन पराकोटीचा चाटूकपणा करणार्या प्रवृत्ती विरुद्ध आहे.
आणि
'ते' घराणे हे घराणेशाहीचे प्रतिक आहेच. त्यामुळे कवितेचा रोखही समस्त घराणेशाहीवर आपोआपच जातो.
............
तुम्ही सुद्धा कवितेचीच री ओढली आहे. पण
मी थेट वाघावरच हल्ला केल्यानंतर तुम्ही छाव्यावर/पिलावळीवर हल्ला करण्यापेक्षा
वाघापेक्षा बलाढ्य किंवा सिंहा-हत्तीवर तरी हल्ला करायला हवा होता, असे वाटते.
कारण,
राजकीय संस्कारांची गंगा दिल्लीवरून गल्लीकडे वाहत असते. उगमाचा प्रवाहच दुषित, दिल्लीच दुषित असेल तर गल्लीत शुद्धता शोधणे, फारसे उपयोगाचे नाही.
लै भारी.. मित्रा तोडलस. टांगा
लै भारी.. मित्रा तोडलस.
टांगा पलटी घोडं फरार
भारतीयांना पाठीशी मणका नावाचा अवयव नाही ही खरी शोकांतिका
आठवा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी एअरपोर्ट वर इ़ंदिरा गांधीच्या चपला उचलल्या होत्या.
असा दुसरा कुणीही राष्ट्रनायक
असा दुसरा कुणीही राष्ट्रनायक निर्माण होऊ शकला नाही, हे वाक्य अत्यंत चुकिचे असून या देशाच्या राष्ट्रनायकपदासाठी या देशातले किमान काही लक्ष लोक "त्या" घराण्याएवढेच किंवा त्यापेक्षाही जास्त अधिक पात्रतेचे आहेत, हे माझे ठाम मत आहे. शिवाय ज्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल त्यांनी तरी हीच धारणा बाळगायला हवी.
मुटेजी,
अनुमोदन !
असा दुसरा कुणीही राष्ट्रनायक निर्माण होऊ शकला नाही,
तुमच्या कवितेतुन असा अर्थ निघत आहे,अस मला नक्कीच म्हणायचं नव्हतं, माझा प्रश्न थोडा या विषयाशी संबधित पण वेगळा, थोडा चुकीचाच होता..
राष्ट्रनायक पदासाठी अनेक लोक आहेत पण त्यांची घराणेशाही कमी पडत असेल,त्यांना प्रसिद्धी मिळत नाही,सत्तेची साथ मिळत नसेल,पैसाही एक मुद्दा असेल अशा काही कारणांमुळे त्यांना अडथळे येत असतील असे वाटते..
शेतकर्याचा मुलगा शेतकरी होऊ
शेतकर्याचा मुलगा शेतकरी होऊ शकतो... फुडार्याचं पोरगं फुडारी झालं तर बिगडलं कुटं ? शिवाय फुडारी होणं, अध्यक्षपदी जाणं हे सगळं सगळ्याच पक्षात लोकशाही पद्धतीनं होतं... मग एका पक्षातल्या एका व्यक्तीवर टीका कशाला? बरं, त्यानी फुडारीपणा सोडायचा तर मग त्यानी करायचं तरी काय? ते काय आय सी आय सी आय ब्यांकेत क्लार्क म्हणून थोडेच बसू शकणार आहेत?
डॉक्टरसाहेब......
डॉक्टरसाहेब......
शेतकर्याचा मुलगा शेतकरी होऊ शकतो... फुडार्याचं पोरगं फुडारी झालं तर बिगडलं कुटं ?
अज्याबात काहीबी बिगडत नाय हो... म्हंजे समजा असं की...
फुडार्याचं बिगडत नाय........(फायदाच व्हतो)
देशाचंबि बिगडत नाय..........( देशाले आदत पडलिया)
ज्यनत्येचं तर अज्याबातच बिगडत नाय. ........(थ्ये चाटूकतेले हरखूनच हाय)
पण....
'लोकशाही' या शब्दाचे धिंडवडे निघत्यात ना......!!
कणा आणि मणकाही,
कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
ग्रेट.. सर..!!!
कानफाडात ठेउन दिल्यासारखे
कानफाडात ठेउन दिल्यासारखे वाटले.
-हरीश
गंगाधरराव, चाबूक !!!
गंगाधरराव, चाबूक !!!
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
भगत-बापूंना माहीत नव्हते,
भगत-बापूंना माहीत नव्हते, अर्थ निघणार असाही
मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलईसाय ...!!
खुपच दुर्दैवी परीस्थीती.....................
नागपुरी तडका लैच झणझणीत.
नागपुरी तडका लैच झणझणीत.
'लोकशाही' या शब्दाचे धिंडवडे
'लोकशाही' या शब्दाचे धिंडवडे निघत्यात ना......!!
असे कसे धिंडवडे निघतील? उलट अमूक एक मुलगा हा अमूक याचा मुलगा आहे, म्हणून त्याला संधी नाकारणं... यात लोकशाहीचे धिम्डवडे निघतात... समान संधी सर्वानाच उपलब्ध असते.... आता एकाच घरातले लोक राजकारणात पुढे जातात, त्याला कोण काय करणार?
( बाय द वे, हे लोक राजकारणातच रहाणे योग्य... नाहीतर तेही लोक नोकर्या करायला आप्ल्या कॉम्पिटिशनमध्ये येतील... त्यापेक्षा ते तिथं बसून खाऊ देत,, आपण हितं बसुन आपली भाजी भाकर खाउ..... )
मुटेजी..... झणझणीत.....!!!!!
मुटेजी..... झणझणीत.....!!!!!
Pages