माबो गटग - निळू दामल्यांशी 'लवासा' बद्दल चर्चा

Submitted by शैलजा on 19 November, 2010 - 08:26

लवासा पुस्तकावरुन जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये, एक मायबोलीकर परेश लिमये, ह्यांनी खुद्द निळू दामल्यांशी लवासासंबंधित चर्चा आयोजित करण्याची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली होती. त्याप्रमाणे २८ नोव्हेंबर २०१० ह्या दिवशी, निळू दामल्यांशी ह्या विषयासंबंधित चर्चेची संधी आपल्याला मिळत आहे. वेळ साधारण सकाळी ११:०० ते २:३० दुपार.

निळू दामले ह्यांच्याबरोबर ग्रंथालीचे धनंजय गांगल व मौजेचे संजय भागवत हे देखील उपस्थित असतील.

ज्या मायबोलीकरांना ह्या गटगला जमायची इच्छा आहे, त्यांनी ह्या बाफवर बुधवार, २४ नोव्हेंबर २०१० पर्यंत कळवावे. हे गटग पुण्यात होईल. सभासद संख्या अपुरी असल्यास गटग रद्द करण्यात येईल.

माणशी रुपये २००/- खर्च - सभागृहाचे भाडे व जेवण ह्यासकट -अपेक्षित आहे, असे परेश लिमये ह्यांनी कळवले आहे.

गटगचे ठिकाण : 'बैठक' बॅंक्वेट हॉल, हॉटेल रणजित, भांडारकर रोड. हे हॉटेल भांडारकर रस्त्यावर कॉसमॉस बॅंक आहे त्याजवळ आहे.
गटगची तारीख व वेळ: २८ नोव्हेंबर २०१०, सकाळी ११:०० ते २:३० दुपार.
सकाळी ११ पर्यंत सगळ्यांनी उपस्थित रहावे ही विनंती. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतापर्यंत ज्यांनी गटगसाठी नावनोंदणी केली आहे, व येणार आहेत ते -

शैलजा
परेश
मेधा२००२
सूर्यकिरण
भुंगा
साजिरा
विवेक देसाई
अरभाट
चिनूक्स
श्रावण मोडक
श्रोता (श्रावण मोडक ह्यांचे १ मित्र)

कोणाचे नाव राहिले आहे का?

रैना, सूर्यकिरण तुम्हाला लेखाची कॉपी हवी होती ती पाठवलेली आहे.

http://www.punemirror.in/article/62/2010112420101124225334299bbdb193b/Ar...

आणखी एक "लव्हासा लाईक सिटी" प्रकल्पाला मंजूरी मिळते आहे. निळू दामल्यांना पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत ह्याबद्दलही लिहावं लागणार बहूतेक. "मुळशी" जगाच्या नकाशातलं एक well known hill station होणार हे नक्की. Happy

शैलजा,
लवासा वरील तुमच्या रंगीबेरंगी पानावार आता प्रतिक्रीया ची सोय बंद असल्याने ईथेच लिहीतो.
भारतवारीत खटाटोप करून पुस्तक मिळवले अन आता कामाच्या व्यापात वेळ मिळेल तेव्हा वाचून काढले. तत्पूर्वी पर्यावरण विषयाशी संबंधीत ईतर मान्यवरांची पुस्तके अन माहिती (दिलीप कुलकर्णी, दाभोळकर, अभिजीत घोरपडे ई.) "लवासा" पुस्तक वाचण्या आधीच मुद्दामून वाचून काढली.
थोडक्यात "लवासा" पुस्तक वाचण्या पूर्वी वरील माहिती च्या आधारे अन त्या संबंधीत कामाचा फिल्ड मधिल वैयक्तीक अनुभव (जगातील चार आंतरराष्ट्रीय विमानतळे प्रकल्प, दोन मोठे ५० किमी चे टोल रोड बांधणी हे करताना पर्यावरणाच्या अनुशंगाने आलेले अनुभव, केलेला अभ्यास, केलेलं काम ई.) या अनुशंगाने माझा दृष्टीकोन होताच. जो नि:पक्षपाती आहे असे मी निश्चीत म्हणू शकतो. "लवासा" वाचल्यावरही माझा दृष्टीकोन बदललेला नाही हेही नमूद करू ईच्छीतो. वरील सर्व पार्श्वभूमी अन वाचनाच्या आधारे "लवासा" या पुस्तकातील एकंदर लिखाणाबद्दल आणि हो लेखकाबद्दलही काय वाटलं अन त्यातून नेमके काय प्रश्ण आणि मुद्दे ऊपस्थित होतात हे मी वेगळं लिहीणार आहे. "लवासा" वाचताना एकंदर ७४ मुद्द्यांची नोंद केली आहे ज्या आधारावर हे प्रश्ण आणि पुस्तकाबद्दल थोडक्यात विश्लेषण माझ्या रंगीबेरंगी पानावर लिहीन असा विचार आहे. जमलच तर २८ च्या आधी. त्या लिखाणाची प्रत तुम्ही निळुभाऊ दामले यांच्या स्वाधीन केलीत तर फार ऊत्तम कारण मी थेट भेटू शकत नाही. २८ च्या आधी लेख लिहायला नाही जमलं तर प्रश्ण नक्की पाठवेन- पण त्या प्रश्णा मागची माझी भूमिका, अभ्यास, अनुभव लक्षात घेतला जावा अन तो दामले यांच्या निदर्शनास आणून दिला जावा अशी माझी विनंती आहे.

तत्पूर्वी मी एक मोठा गाढवपणा केला असे खेदाने म्हणावे लागेल- तो हा की तुम्ही लिहीलेला लेख वाचून, बाकी ईतर बाजू किंव्वा "लवासा" पुस्तक न वाचता मी त्यावर मते नोंदविली. आता तुमचा लेख पुन्हा परत वाचल्यावर खालील गोष्टी नमूद करू ईच्छीतो:
१. >>आणि पवारांनी इंग्लंडमधल्या लेक डिस्ट्रिक्टवरुन तलावाकाठी हिल सिटी बांधण्याची केवळ कल्पना सुचवली होती, ह्याचाही उल्लेख करायला दामले विसरलेले नाहीत. लवासा स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करत असूनही स्थानिक लवासावाल्यांना लहान सहान बाबींवरुन त्रास देताना आपण पाहिल्याचं दामले नोंदवतात. पर्यावरणवालेही पर्यावरणाचा र्‍हास झाल्याची उगाचच आरडाओरड करत आहेत, कारण लवासा पर्यावरणाची काळजी घेते आहे, हे उदाहरणं देऊन दामल्यांमधला पत्रकार पटवू पाहतो.

मला नही वाटत दामले काही पटवू पहात आहेत- निदान पुस्तक वाचल्यावर तरी माझा तसा समज होत नाही.
२. >>एकूणातच मीडीया सांगोवांगीच्या गोष्टी सांगत, काहीही अभ्यास न करता लवासाविरोधी बातम्या पसरवण्यातच कशी धन्यता मानत होती/ आहे, हे दामल्यांचं प्रतिपादन.

असं नाहीये.. दामले यांनी मिडीया देखिल निश्चीत जबाबदार धरलेले आहे. किंबहुना आजचा मिडीया हा निव्वळ सवंग अन पॉप्युलर बातम्या देण्यात गर्क आहे- जनजागृतीचे विशेष त्याला काही पडलेले नाही हे स्वतः व्यवसायाने पत्रकार असलेले दामले लिहीतात तेव्हा त्याचे कौतूक व्हायला हवेच.

३. >>पण प्रश्न हा आहे, की एखादा नांदता वृक्ष जरी दुसरीकडे जगला तरी मूळ जागी जिथे तो वाढत, जगत होता, तिथे त्याच्या आडोशाने जगणारी पक्षीसृष्टी, त्याच्या सावलीत वाढणारी इतर झाडं झुडपं, अनेक वर्षांनी वाढू लागलेल्या वेली, त्यावर येणारे कीटक आदी सगळी इकोसृष्टीच हादरून जाते. एकेका वृक्षाबरोबर हे सारं गोकुळ उभं राहतं, म्हणून तर तो नांदता वृक्ष. नुसता वृक्ष स्थलांतरीत केला म्हणजे संपले, इतके पर्यावरण सोपे आहे की काय, हा प्रश्न मनात उभा राहतो, निदान रहावा. ह्याबाबतीत दामल्यांनी काहीच भाष्य का केलेले नाही, कोणास ठाऊक!

पुन्हा एकदा पुस्तकात अनेक पाने हे लिहीण्यात खर्ची पडली आहेत की लवासा मध्ये अनेक पर्यावरण तज्ञ व ईतर मंडळींन्ना सल्ला मसलत करून शास्त्रीय दृष्ट्या झाडे replantation साठी मोठी खटपट केली आहे. याखेरीज hydro mulching, hydro seeding, geo matting, slope protection, ईत्यादी अनेक गोष्टी लवासा ने केल्याचे पुस्तकात लिहीले आहे (खरे खोटे हे फिल्ड वर गेल्याशिवाय आपण ठरवू शकणार नाही)

४.>>दासवेत उभं राहिलेल्या लवासाची अप्रत्य्क्षरीत्या भलावण करताना हा पत्रकार सांगतो की,

१. दासवेत ३५,००० लोक राहतील आणि दोनेक लाख ये जा करतील
२. विकासामुळे दर एकरी उलाढाल काही कोटींची होईल आणि महाराष्ट्र सरकारच्या उत्पन्नात काही अब्जांची वाढ होईल.
३. दासवे हा केवळ टप्पा. एकूण लवासा कितीतरीपट मोठं असेल आणि एकूण रोजगार निर्मिती दासवेपेक्षा खूप अधिक.

पुन्हा एकदा, संपूर्ण पुस्तक योग्य context मधून वाचल्यावर असे वाटत नाही की दामले हे लवासाची अप्रत्यक्षरीत्या भलावण करत आहेत, किंबहुना बर्‍याच ठिकाणि त्यांनी लवासा चे थेट कौतूक केले आहे- तेही त्यामगील पार्श्वभूमी विषद करत..

आणि शेवटी सर्वात मोठा भावनिक मुद्दा जो तुम्ही लिहीला आहेतः
>>पुस्तकात एके ठिकाणी दामले लवासाची उभारणी आणि आजच्या नोकरशाही आणि राजकीय पक्षांबद्दल भाष्य करताना म्हणतात की, "आगरकर किंवा टिळक आजच्या जमान्यात असते तर त्यांना मुंबई - दिल्ली इथले पुढारी आणि नोकरशहा यांना लाच दिल्याशिवाय शाळा काढता, चालवता आली नसती. हे वास्तव आहे."

एका पत्रकाराने लवासाची आणि अनुषंगाने घडलेल्या व्यवहारांची भलावण करण्यापायी असे उद्गार काढावेत, ह्यापेक्षा पत्रकारितेची अधिक शोकांतिका ती काय असेल?

माफ करा- या विधानाशी पुस्तक वाचल्यावर मी सहमत नाही. किंबहुना ते विधान तुम्ही तुमच्या लेखात थोडे out of context वापरले आहेत. "लवासा" मधिल पान क्र. १५२-१५५ मधील लेखन लेखकाने "लवासाकडे मी कसे पहातो" या अनुशंगाने लिहीले आहे. लेखक म्हणतो आज आपल्या देशातले वास्तव्य हे आहे की देशात कुणालाही रोजगार निर्माण करायचा असेल, ऊद्योग करायचा असेल, काहीही करायचे असेल तर भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप, सामान्यांना नाडणारी व्य्वस्था याचा सामना करावाच लागतो. आणि याच वास्तवात राहून वाटचाल करावी लागते. सत्य, कायदा, निती, सदाचार वगैरे कल्पनांना चिकटून या देशात काहीही करता येत नाही. हे वास्त्व ईतके दाहक आणि भयंकर आहे की तय संबंधात लेख आगरकर किंवा टिळक यांचे ऊ.दा. देतो. यात मला तरी कुठे लेखकाने आडून लवासा ची केलेली भलावण किंवा जस्टीफिकेशन दिसत नाही.

असो. थोडक्यात माझी वरील वरील पार्श्वभूमी, अन आता वाचलेले "लवासा" अन कालनिर्णय मधिल तुम्ही आवर्जून पाठवलेला लेख वाचून त्या आधारावर माझे विश्लेषण आणि प्रश्णमालिका मी तयार करीन.
-----------------------------------------------------------------------------------
अर्थात एव्हडा सर्व खटाटोप करण्यामागचं कारण निव्वळ "लवासा" नसून ईतर दुसरी ऊदिष्टे अन ध्येये आहेत जे कालाच्या ओघात ईथे मी व दुसरी एक मायबोलीकर नमूद करू शकू असे वाटते. त्या प्रकल्पाच्या अनुशंगाने ईथली चर्चा आणि तुम्ही ऊपलब्ध करून दिलेली "लवासा" संधी याबद्दल पुन्हा आभार.
योग

योग तुम्ही २८ च्या आधी लेख लिहिलात तर तुमच्या ह्या -"पण त्या प्रश्णा मागची माझी भूमिका, अभ्यास, अनुभव लक्षात घेतला जावा अन तो दामले यांच्या निदर्शनास आणून दिला जावा" विनंतीसकट मी तो दामल्यांकडे सुपूर्त करेनच.

तुमचा प्रतिसाद वाचून मला निळू दामलेंमधला लेखक किती प्रभावी आहे ह्याची कल्पना मात्र आली. Happy

>>तुमचा प्रतिसाद वाचून मला निळू दामलेंमधला लेखक किती प्रभावी आहे ह्याची कल्पना मात्र आली.

शैलजा,
कृ. असे विधान करू नये कारण it means u are dis-crediting all my research, reading and experience. शिवाय लवासा हे मी आजवर वाचलेले पहिलेच पुस्तक नव्हे Happy

मी असे विधान करत नाहीये की तुम्ही लिहीलेला लेख दिशाभूल करणारा आहे मी एव्हडच म्हणतोय की तुमचा लेख वाचून माझा पूर्वग्रहदूषित द्रुष्टीकोन झाला असण्याची शक्यता आहे. भावनिक मुद्द्यांवर वाद घालायला विशेष अभ्यास लागत नाही हे मान्य केले तर नेमका तोच गाढवपणा मी बहुदा केला असावा. असो.
मला देखिल तुमच्या सारखेच काही प्रश्ण पडले आहेत पण ते प्रश्ण आणि वैयक्तीक दामले किंव्वा त्यांची भूमिका यांचा थेट संबंध मी जोडणार नाही. आणि चर्चा वस्तूनिष्ट हवी असेल तर तर तसा संबंध जोडणे धोकादायक ठरेल असे माझे मत. दामलेंनी लिहीलेले सर्व बरोबर किंव्वा तुम्ही लिहीलेले चूक असे मी म्हणत नाहीये.. फक्त पुस्तक पुन्हा वाचल्यावर ज्या गोष्टी जाणवल्या त्या ईथे लिहील्या.
माझे प्रश्ण वाचल्यावर कदाचित तुमचा दृष्टीकोनही वेगळा होवू शकतो अशी शक्यता असायला वाव आहे?

असो. पुन्हा एकदा तुम्ही जी तसदी घेत आहात त्याबद्दल आभारी. आता विश्लेषण लेख-प्रश्ण यावर पुढील वेळ घालवतो Happy

छे, छे तुमच्या ज्ञानाबद्दल काहीच म्हणायचे नाही, आणि माझे बरोबर वा चूक म्हणालात म्हणून मला दु:ख, राग वगैरे तत्सम काहीही वाटलेले नाही, कारण पुस्तकाबद्दल लिहितानाच एक सामान्य वाचकाच्या भूमिकेतून मी मला पडलेले प्रश्न मांडलेले आहेत, कुठेही तज्ज्ञाची वा तुम्हाला वाटते तशी भावनिक भूमिकाही घेतलेली नाही. तुमची मते मांडायला तुम्ही मुखत्यार आहातच ना? Happy

असो. तुमच्या लेखाची वाट पाहते.

गटगची तारीख व वेळ: २८ नोव्हेंबर २०१०, सकाळी ११:०० ते २:३० दुपार.
गटगचे ठिकाण : हॉटेल रणजित, भांडारकर रोड. हे हॉटेल भांडारकर रस्त्यावर कॉसमॉस बॅंक आहे त्याजवळ आहे.

योग, तू लवासा चा प्रत्यक्ष प्रकल्प आणि तिथे गेल्यावर दिसणारा सह्याद्रीचा केलेला विध्वंस पाहिला आहेस का ? एका मोठ्या पाणलोट क्षेत्रावर कसा डल्ला मारला गेला आहे हे पाहिले आहेस का ? किंवा त्या दुर्गम भागात जाणारा चाळीस एक किमीचा रस्ता ताबडतोब सरकारकडून रुंदीकरण करुन त्याचा टोल मात्र साधा चांदणी चौक पार करून बावधनला वा पुढे जाणार्‍या सामान्य नागरिकांच्या माथी मारण्यात आला आहे हे पाहिले आहेस का ?

मी हे जवळून पाहिले आहे. इतर पुस्तके वाचली आहेत, पण निळू दामलेंचे नाही वाचले, म्हणून प्रतिक्रिया दिली नव्हती.

मुळात दोन हजार रुपये एकरांची जागा घेउन तिची किंमत दहा कोटी रुपये एकर ( किती टक्के फायदा ? पन्नास लाख टक्के फायदा !! ) करण्याचा हा 'साहेब' पॅटर्नचाच धंदा आहे.

१) आडबाजूची, सर्व प्रकारच्या सरकारी निर्बंधामुळे आजपर्यंत सुरक्षित, अस्पर्शित राहिलेली प्रचंड जागा मिळवायची.
२) त्यासाठी असलेले वनजमीन, ना विकास झोन, डोंगर, इको सेन्सिटिव्ह झोन, आदिवासींची जमीन खरेदी करण्याविरोधातले कायदे यातून सरकारकडून सवलती मिळवून घ्यायच्या. किंवा ते सरळ धाब्यावर बसवून नंतर प्रकरण रेग्युलराईज करून घ्यायचे.
२) रस्ते, पाणी - ( टाकी वगैरे नाही, थेट धरणेच), वीज (महाराष्ट्रात १४ तास अंधार, इकडे प्राधान्याने मोठे स्टेशन उभारले) ही तिन्ही सरकारची खाती स्वतःचीच असल्याप्रमाणे राबवून या सर्व सोयी करून घ्यायच्या.

म्हणजे ही जी किंमत वाढली ती जनतेच्याच पैशांनी वाढली, फायदा जनतेचा नाही, साहेबांचा झाला. याला उद्योजकता नाही तर दरोडेखोरी म्हणतात असे मला वाटते.

दामलेंचे पुस्तक म्हटल्यावर मला वाटले होते की भल्याभल्यांचा बुरखा फाडणारे पुस्तक असेल. पण शैलजाने लिहिले आहे तसे दामलेंनी या प्रकल्पाची पाठराखण केली असेल तर या निमित्ताने 'हर आदमी की अपनी किमत होती है' हेच साहेबांनी दाखवून दिले आहे असे मला वाटते.

---
मी इच्छा असूनही जीटीजीला येउ शकत नाही. पण दामलेंनी आता 'आदर्श' बद्दल चव्हाणांच्या गौरवपर ग्रंथ अथवा "ए राजा आणि त्यांची महान 'टू जी' क्रांती "असे पुस्तक लेखन हाती घ्यावे अशी विनंती आणि शुभेच्छा.

मी ही दामलेंचे पुस्तक वाचले नाही. लव्हासाबद्दल इथे वाचेपर्यंत काहीच माहिती नव्हती.
इथे वाचल्यानंतर नेटवरून थोडी माहिती मिळवली. काही जणांशी प्रकल्प कसा आहे वैगरे चर्चा करताना, जी अगदी प्राथमिक माहिती मिळत होती ती जरा धक्कादायकच वाटली. त्यानंतर यासंदर्भातील जनाअयोगाचा एक रिपोर्ट मिळाला, परंतू पुस्तकाबद्दल किंवा प्रकल्पाबद्दल बायस मत होवू नये म्हणून तो अजुनपर्यंत वाचला नव्हता.
आज कालनिर्णय मधला दामलेंचा लेख वाचल्यावर बरेच प्रश्न पडले, ज्यांची उत्तरे दिसत नव्हती. आत्ता तो जनआयोगाचा रिपोर्ट वाचतेय. कदाचित अजून काही प्रश्न उभे रहातिल किंवा प्रश्नांची उत्तरे पण मिळू शकतिल.
पण अजून तरी जीएस ने मांडलेले प्रश्न मलाही पडलेले आहेतच. याशिवायही प्रश्न आहेत. थोडासा अभ्यास करूनच इथे मांडेन.

काल उघडकीला आलेल्या कर्जघोटाळ्यातही लवासाला फायदा करुन देण्यात आला अशी बातमी आहे.

बित्तु, दिखावा आहे तो. नविन महसूल मंत्र्यांना काही स्टंट पाहिजेच ना चर्चेत रहायला. अन जुन्या महसूलमंत्र्यांची पितळं उघडी करण्यातच हे नाट्य रंगणार अन काहिंच्या बोंबा तर काहिंच्या टाळ्या यातच पडदा पडणार.

Pages