माबो गटग - निळू दामल्यांशी 'लवासा' बद्दल चर्चा

Submitted by शैलजा on 19 November, 2010 - 08:26

लवासा पुस्तकावरुन जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये, एक मायबोलीकर परेश लिमये, ह्यांनी खुद्द निळू दामल्यांशी लवासासंबंधित चर्चा आयोजित करण्याची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली होती. त्याप्रमाणे २८ नोव्हेंबर २०१० ह्या दिवशी, निळू दामल्यांशी ह्या विषयासंबंधित चर्चेची संधी आपल्याला मिळत आहे. वेळ साधारण सकाळी ११:०० ते २:३० दुपार.

निळू दामले ह्यांच्याबरोबर ग्रंथालीचे धनंजय गांगल व मौजेचे संजय भागवत हे देखील उपस्थित असतील.

ज्या मायबोलीकरांना ह्या गटगला जमायची इच्छा आहे, त्यांनी ह्या बाफवर बुधवार, २४ नोव्हेंबर २०१० पर्यंत कळवावे. हे गटग पुण्यात होईल. सभासद संख्या अपुरी असल्यास गटग रद्द करण्यात येईल.

माणशी रुपये २००/- खर्च - सभागृहाचे भाडे व जेवण ह्यासकट -अपेक्षित आहे, असे परेश लिमये ह्यांनी कळवले आहे.

गटगचे ठिकाण : 'बैठक' बॅंक्वेट हॉल, हॉटेल रणजित, भांडारकर रोड. हे हॉटेल भांडारकर रस्त्यावर कॉसमॉस बॅंक आहे त्याजवळ आहे.
गटगची तारीख व वेळ: २८ नोव्हेंबर २०१०, सकाळी ११:०० ते २:३० दुपार.
सकाळी ११ पर्यंत सगळ्यांनी उपस्थित रहावे ही विनंती. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीनचंद्र, धन्यवाद. जरुर या.
बित्तुबंगा, मेधा धन्यवाद. मेधा, मायबोलीकर बाफ वाचतील तसे काही प्रतिसाद मिळतील अशी आशा आहे. Happy

परेश, शैलजा.....
यायचा प्रयत्न करतो.... कोणी मुंबईकर येणार असल्यास कळवा. एकत्रच येऊ.

परेश्,शैलजा... खूप चांगला उपक्रम...अभिनंदन.

येणे जमणार नाही.. पण वृत्तांत वाचायला आवडेल. Happy

निळू दामल्यांनी कालनिर्णयच्या २०१० च्या दिवाळी अंकात लवासाची भलामण करणारा एक दीर्घ लेख लिहिला आहे. या प्रकल्पाविषयी त्यांची ठाम मते असावीत असे लेख वाचून वाटते.

शुभेच्छा !
आणखी एक कल्पना म्हणजे इथे इतर माबोकरांनी त्यांना विचारायचे प्रश्न सुचवावेत. त्यातले निवडक त्यांना प्रत्यक्ष विचारावेत.

मास्तुरे, हो, तुम्ही म्हणता ते खरंय.
विकु, मस्त कल्पना आहे. असे प्रश्न मिळाले तर उत्तम. त्यातले निवडक नक्की विचारता येतील.

बिपिन , साधारण गुरुवारपर्यंत इच्छुकांच्या संख्येनुसार ठिकाण निश्चित करुन ह्याच बाफवर कळविण्यात येइल.

मास्तुरे, शक्य झाल्यास आपण समक्ष येउन आपली मते मांडल्यास आवडेल. तसेच विकुंची सुचनाही स्वागतार्ह आहे.

परेश,
मी आता भारताबाहेर असल्याने येवू शकणार नाही पण पुस्तक आणि ईतर संबंधीत अभ्यासावरून जमेल तसे प्रश्णावली पाठवायचा प्रयत्न करतो. एक आगाऊ सूचना:
चर्चेसाठी एखादा सूत्रधार नेमावा म्हणजे सुसुत्रता राहील अन सर्वांच्या वेळेचा ऊपयोग होईल. मला वाटते ही जबाबदारी शैलजा योग्य प्रकारे पार पाडू शकतील. खेरीज चेर्चेचे ध्वनि मुद्रण करून घ्यावे म्हणजे ईथे संवाद सदरात ते देता येईल.
पुन्हा एकदा मुख्ख्य हेतू हाचः पुस्तकाचे पुन्हा पाठराखण वा जस्टीफिकेशन नको- निव्वळ शंका, प्रश्ण, अन सर्व अंगांने वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून चर्चा व्हायला हवी- कोण बरोबर कोण चूक यात न शिरता.

असो.
चर्चेसाठी शुभेच्छा!
------------------------------------------------------------------------------

>>निळू दामल्यांनी कालनिर्णयच्या २०१० च्या दिवाळी अंकात लवासाची भलामण करणारा एक दीर्घ लेख लिहिला आहे. या प्रकल्पाविषयी त्यांची ठाम मते असावीत असे लेख वाचून वाटते.
मास्तुरे, लिंक/लेखप्रत देवू शकाल का?

योग, ध्वनिमुद्रणासाठी नक्की प्रयत्न करु.

अनिल७६,

लवासा हा मुळ विषय असेल. त्या अनुषंगाने येणारे इतर विषय. जसे पर्यावरण, पुनर्वसन प्रक्रिया, अश्या प्रकारच्या प्रकल्पांची आवश्यकता... ई ई.

>>> >>निळू दामल्यांनी कालनिर्णयच्या २०१० च्या दिवाळी अंकात लवासाची भलामण करणारा एक दीर्घ लेख लिहिला आहे. या प्रकल्पाविषयी त्यांची ठाम मते असावीत असे लेख वाचून वाटते.
>> मास्तुरे, लिंक/लेखप्रत देवू शकाल का?

कालनिर्णय चा वार्षिक दिवाळी अंक ऑनलाईन उपलब्ध नसावा. जयराज साळगावकरांना त्याची ऑनलाईन प्रत उपलब्ध आहे का असे ईमेल पाठवून विचारले आहे. उपलब्ध असेल तर पाठवीन.

शैलजा, परेश.. मीपण येण्याच्या प्रयत्नात आहे. २-३ दिवसात सांगितल तर चालेल का?

Pages