Submitted by डॉ अशोक on 23 November, 2010 - 07:36
तुझी आठवण
मोहरलेल्या आमराईतील
कोकिळ-कूजन
ग्रीष्मा नंतर
पहिला श्रावण
तुझी आठवण
अर्ध्या मिटल्या डोळ्यां पुढचे ,
स्वप्न क्षणों क्षण
भर आकाशी इन्द्र-धनूचे
रंग प्रदर्शन
तुझी आठवण
गुलमोहोराचे राना मधल्या,
गंध-रानपण
राना मधल्या रान फळाचे,
कडू गोडपण
तुझी आठवण
पहिल्या वहिल्या भेटीतले त्या,
थरारले क्षण
विरहात समजते आणिक छळते,
असे रितेपण
तुझी आठवण
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आता नवरोबा चिंतेत
आता नवरोबा चिंतेत आहेत
"उजव्या" तद्न्याच्या शोधात आहेत
दरम्यान म्याडमचे हाल आहेत
उजवी कडून श्वास घेत
डावी कडून शिंकत आहेत!
एकदम छान .आवडली कविता !!
व्वा
व्वा
मस्त ! आवडली.
मस्त ! आवडली.:)