मुळ गाणे पहा: आभास हा
कधी हा प्रबंध कधी तो प्रबंध
जन जाहले मंद का
का हे कसे लिहिती असे हा घोर लागे जीवा
कसे संपवू मी संपवू गं मी स्वत:
दिवा(:दिवा:)स्वप्न का हे झोपताना ही मला
अभ्यास हा अभ्यास हा छळतो मला छळतो मला
अभ्यास हा अभ्यास हा
क्षणात सारे विचार वेडे झुळुक होऊनी जाती
कधी दूर तुही पण जवळ वाटे अन जर्नल दिसते हाती
मी अशीच बसते उगीच वाचते पुन्हा तुला विसरते
मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्यापुढे मी हरते
तू असतांना नसल्याचा खेळ हा
दिवा(:दिवा:)स्वप्न का हे झोपताना ही मला
अभ्यास हा अभ्यास हा छळतो मला छळतो मला
अभ्यास हा अभ्यास हा
मनात माझ्या हजार शंका तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस खरा कसा रे
तू निघून जा ना इथून हट ना
नकोसा वाटे मला तू
पण माहित नाही मलाही अजूनि इथेच थांबशील का तू
नवे लेख सारे बोर वाटे हे जीवा
दिवा(:दिवा:)स्वप्न का हे झोपताना ही मला
अभ्यास हा अभ्यास हा छळतो मला छळतो मला
अभ्यास हा अभ्यास हा
मूळ गाण्याचे शब्द: आभास
मूळ गाण्याचे शब्द:
आभास हा
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे हि असे हा भास लागे जीवा
कसे सावरु गं आवरु गं मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागताना ही मला
आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला
आभास हा आभास हा
क्षणात सारे उधाण वारे झुळुक होऊनी जाती
कधी दूर तुही कधी जवळ वाटे पण काहीच ना ये हाती
मी अशीच हासते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते
मग मिटुन डोळे तुला पाहते तुझ्याच साठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागताना ही मला
आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला
आभास हा आभास हा
मनात माझ्या हजार शंका तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस खरा कसा रे
तू इथेच बस ना हळूच हस ना
अशीच हवी मला तू
पण माहित नाही मलाही अजूनी तशीच आहेस का तू
नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे जागताना ही मला
आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला
आभास हा आभास हा
जबरदस्त सानी !! अगदी माझ्या
जबरदस्त सानी !!
अगदी माझ्या मनातलं .लिहिलयस ...
अभ्यास हा अभ्यास हा छळतो मला
अभ्यास हा अभ्यास हा छळतो मला छळतो मला
अभ्यास हा अभ्यास हा
तुलाच नाही मला स्वप्नात परीक्षाच दिसते.
मस्त
करा करा अभ्यास करा
करा करा अभ्यास करा
छान आता येउ देत "हा वास हा"
छान
आता येउ देत "हा वास हा" ( मी तरी यावर विडंबन करणार नाही )
रच्याकने वासावरचे हे http://www.maayboli.com/node/17186
अभ्यासावरचे हे माझे http://www.maayboli.com/node/12866
धन्स सर्वांना
धन्स सर्वांना
अभ्यास्!!अभ्यास!!!>>> पळा.
अभ्यास्!!अभ्यास!!!>>> पळा. दू>>र
मस्त गे बयो चालु दे अभ्यास
मस्त गे बयो चालु दे अभ्यास
दिवा स्वप्न का हे झोपताना ही
दिवा स्वप्न का हे झोपताना ही मला
अभ्यास हा अभ्यास हा छळतो मला छळतो मला
अभ्यास हा अभ्यास हा
सानी,
परिक्षा जवळ आली आहे का ?
मला तर मला पडणार्या स्वप्नांचा अभ्यासाच टेंन्शन आलय ..
मुलांनो अभ्यास करा बरं ! हेही
मुलांनो अभ्यास करा बरं !
हेही दिवस जातील.
मग आमच्या एवढे झालात, कि आता मी अभ्यास कशाचा करू ? असा प्रश्न पडेल.
वर्षू, स्मितु, अनिल, दिनेशदा
वर्षू, स्मितु, अनिल, दिनेशदा धन्यवाद!!!!
दिनेशदा, तुमचे पटले... हेही दिवस जातील...पण तुमच्या एवढे झाल्यावर आता मी अभ्यास कशाचा करू ? असा प्रश्न पडेल की नाही, शंकाच आहे... पण अभ्यासाला कंटाळून कविता लिहिणार्या पुढच्या पिढीला "हेही दिवस जातील" असा तुमच्यासारखाच धीर मात्र नक्की देईन...
सानी, आता काय अभ्यासिकेत
सानी,
आता काय अभ्यासिकेत जाऊन हे उद्योग का???? विडंबनावर प्रबंध लिही आणो वर्षा_म ला गाईड म्हणून निवड.....
वा वा! छान सजेशन भुंग्या! पण
वा वा! छान सजेशन भुंग्या! पण प्रबंध म्हणून कुठलाही विषय निवडला की आवडता विषयही नावडता होतो, मग काय करायचं???
मस्त गं सानी
मस्त गं सानी
सानी, एक आगाऊ
सानी, एक आगाऊ उपाय.......अभ्यासाच्या पुस्तकांत बिनधास्त गोष्टीची पुस्तकं ठेऊन वाच.मी असंच केलंय लहानपणी ! चांगले मार्क्स पडतात मग.
रचु, रुणुझुणू धन्स
रचु, रुणुझुणू धन्स गं...
रुणुझुणू, तुझा उपाय नामी आहे खरा... आवडेश... पण मला थेसिस लिहायचाय, तेंव्हा या उपायाने फारच आपाय व्हायचा....
सानी .. मस्त लिहिलयं
सानी .. मस्त लिहिलयं
मी अशीच बसते उगीच वाचते
मी अशीच बसते उगीच वाचते पुन्हा तुला विसरते
मस्त जमलयं
चनस, अमित, खुप खुप धन्स
चनस, अमित, खुप खुप धन्स
अरे वा? छानच की! पाहिलेच
अरे वा? छानच की!
पाहिलेच नव्हते!
अनेक आभार बेफिकीरजी...
अनेक आभार बेफिकीरजी...
कार्टे अभ्यास कर की, गाणी काय
कार्टे अभ्यास कर की, गाणी काय म्हणतेस तेही विडंबित करुन
आवडले विडंबन.
धन्स सखे.... अगं म्हणून तर
धन्स सखे.... अगं म्हणून तर मी कित्ती कित्ती दिवे घेतलेत.... दिवा (:दिवा:) स्वप्न पहातांना
भारीच, शाळा-कालेजाचे दिवस
भारीच, शाळा-कालेजाचे दिवस आठवले.
सानी.... जबरदस्त आवडले !
सानी.... जबरदस्त आवडले !
(No subject)
मस्त...
मस्त...
हे मस्त मस्त लिहलेस गं, खूप
हे मस्त मस्त लिहलेस गं, खूप आवडलं. मुळात अभ्यासाचा कधी कंटाळा असा नव्हता, पण अभ्यासाच्या वेळी असलाच टि.पी. करायचे मीही.
बर्याच गाण्यांना विडंबित करायचा छंदच म्हण.
धन्स ग.
रंगासेठ, विशल्या, भरत, रोहित,
रंगासेठ, विशल्या, भरत, रोहित, अनुजा... तुमच्या प्रतिसादांसाठी खुप खुप आभार
कधी दूर तुही पण जवळ वाटे अन
कधी दूर तुही पण जवळ वाटे अन जर्नल दिसते हाती
हे नाहॉ समजले गड्या
बाकी छानच
Pages