''प्रिय ब्लॉग माझा-३ स्पर्धक आणि विजेते..... मायबोलीकरांची बाजी''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 November, 2010 - 12:13

स्टर माझा तर्फे,ब्लॉग लेखकांसाठी,प्रिय ब्लॉग माझा-३ स्पर्धा घेण्यात आली होती. नुकतेच याचे विजेते जाहीर करण्यांत आले असून विजेत्यांत बहुसंख्य मायबोलीकरांचा समावेश आहे. विजेत्यांची नावे व ब्लॉग्स खालील प्रमाणे.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. http://www.pankajz.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/

यात बरेच मायबोलीकर असल्याचे जाणवत आहे...पण मी खात्रीने सांगू शकतो असे,
नरेंद्र गोळे,
मधुकर रामटेके,
विशाल कुलकर्णी,
गंगाधर मुटे,
जयश्री अंबासकर
रोहन कमळाकर चौधरी

यांचा विजेत्यांत समावेश आहे. समस्त माबोकरांस अभिमानास्पद अशी ही बाब असून मी सर्वांचे हार्दिक
अभिनंदन करतो. Happy

बातमी इथे वाचा... http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669

डॉ.कैलास गायकवाड.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तात्यासाहेब,

आपण त्याचा ब्लॉग एकदा नीट वाचावा. त्याने अनेक थोर व्यक्तींबद्दल अतिशय खालच्या थराला जाऊन द्वेषमूलक व असत्य लिखाण केलेले आहे. त्याच्या एका नवीन लेखामध्ये त्याने अविनाश धर्माधिकारींना नावे ठेवताना स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा अतिशय तुच्छतापूर्वक व अनेकवेळा एकेरी उल्लेख करून त्यांच्याबद्दल अतिशय घाण व असत्य लिहिले आहे. त्याच्या पोटात, ओठात व लेखणीतसुध्दा घाण ओतप्रोत भरलेली आहे. अशा अर्वाच्य लेखनामध्ये परिक्षकांना पुरस्कारयोग्य काय आढळले देव जाणे.

मास्तुरे यांच्याशी पूर्ण सहमत..इथे मायबोलीवर त्याचे लिखाण वाचून त्याच्या एकदंरीत विचारांची कल्पना आली होती. पण मला वाटले ब्लॉगला पारितोषिक मिळाले म्हणजे काहीतरी चांगलेही लिहीत असावा म्हणून मुद्दाम जाऊन तो ब्लॉग वाचला....
आणि पश्चाताप झाला....
स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल त्याने इतक्या विकृत भाषेत लिहीले आहे की याला काय म्हणावे कळत नाही...विशेष म्हणजे त्याला प्रतिक्रीयांमध्येच लोकांनी विरोध केला आहे...
तात्या...पोटात एक आणि ओठात असे काही नाहीये त्याचे खरोखर...त्याच्या नसानसात हिंदूद्वेष भरला आहे..त्यामुळेच...

असो...हे सर्व चर्चा करण्याची ही जागा नव्हे....पण रहावले नाही म्हणून लिहीले...

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन (एक सोडून) मायबोलीवरील लिखाण सकस असते आणि अनेक प्रतिभावंत इथे येतात हे याचेच द्योतक आहे...

गल्लत होतेय...
मधुकर संदर्भात
>>त्याच्या बर्‍याच लिखाणातून एका विशिष्ट जातीचा व धर्माचा द्वेष व मत्सर दिसून येतो. त्या जातीतील व धर्मातील काही आदरणीय महापुरूषांबद्दल त्याने अतिशय खालच्या पातळीला जाऊन अतिशय घाणेरडे लिखाण केलेले आहे. तो आपल्या बर्‍याचश्या लिखाणातून जातीयतेचे विष पसरवित आहे. त्याचे बरेच लिखाण असत्य व घाणेरडे आहे.<<
या गोष्टीशी मी सहमत आहे.
जातीयता आणि काही समाजफोडू संघटनांची त्याने केलेली भलामण या मुद्द्यावर मी पण त्याचा निषेधच करते.

बाकी सर्व विजेत्यांचे (एक सोडुन) अभिनंदन.

परीक्षकांच्या मताचा आदर पण जातीय तेढ निर्माण करणार्‍या ब्लॉगला पारितोषिक देउन अशा इतर ब्लॉग्स ना प्रोत्साहन न मिळो हीच इच्छा!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन....

>>परीक्षकांच्या मताचा आदर पण जातीय तेढ निर्माण करणार्‍या ब्लॉगला पारितोषिक देउन अशा इतर ब्लॉग्स ना प्रोत्साहन न मिळो हीच इच्छा!

ज्याला वाईटच लिहायचं आहे तो वाईटच लिहीतो.. लाखोने ब्लॉग्स आहेत.. लोकं चाळतात अन पुढे जातात.. एखादा ब्लॉग वाचून मुद्दामून पुन्हा तसं लिहायचं वगैरे एव्हडा वेळ कुणाकडे असेल असं वाटत नाही. वरील ऊ.दा. मध्ये परीक्षकांच्या सारासार विवेकबुध्धीबदल (अनुभव अन लायकीबद्दल नव्हे) शंका उद्भवते निश्चीत.

मास्तुरे,
मला मधुकर बद्दल जे वाटले ते लिहिले. आपण माझ्याशी सहमत असलेच पाहीजे असा माझा आग्रह नाही. मधुकरने हयात नसलेल्या महान व्यक्तिंवर केलेली चिखलफेक समर्थनिय नाहीये. ते त्याचे वैयक्तिक मते आहेत.

मला फक्त त्याच्या संघर्षाकडे व अतोनात कष्टातुन पुढे आलेल्या पैलुंकडे निर्देश करायचा होता.
परत एकदा थेट जंगलातुन आलेल्या एका व्यक्तिने केलेल्या लिखानाचे कौतुक मान्यवरांनी केले त्याबद्दल मधुकरचे कोटी कोटी अभिनंदन.

माझ्या माहिती प्रमाणे स्पर्धा घोषीत होते किंवा प्रवेशिका पाठवली जाते तेव्हा पर्यंतचे लिखाण जमेस धरतात. त्याने आधी चांगलं लिहीलं होतं त्या बेसिस वर मिळाला असेल नंबर.

मला वाटते मधुकर रामटेके या विषयावरची थांबायला हवी. योग्य-अयोग्य या मुद्याला अनुसरुन नव्हे तर,
माझ्या माहितीप्रमाणे त्यांना मायबोलीवर प्रतिसाद सुद्दा लिहायचे हक्क मायबोलीकडून काढून घेतले आहेत. त्यामुळे ते येथे त्यांची बाजू मांडू शकणार नाहीत. त्यामुळे एकतर्फी लेखन होण्याऐवजी 'मधुकर रामटेके' हा विषय टाळणे जास्त औचित्याला धरून होईल असे वाटते.

गंगाधर साहेब,

मतभेद असले तरी शक्यतो लोक झाले गेले विसरुन जाउन यशस्वी लोकांचे अभिनंदन करतात. (एक उदाहरण: आपल्या कवितासंग्रह प्रकाशनाच्या बाफ वर आपल्याशी मतभेद असलेल्यानी आपले मनापासुन अभिनंदन केलेले मी वाचले आहे). वैयक्तीक पातळीवर इथे कोणी नाराजी ठेवत नाहीत.
इथे बरेच लोक तो एक मनुष्य सोडुन इतरांचे अभिनंदन करत आहेत यावरुन त्या माणसाने किती लोकाना दुखावले आहे ते लक्षात घ्या. दुसर्‍याच्या मताशी सहमत नसणे निराळे आणि दुसर्‍याचा द्वेष करणे हे निराळे. असो.

त्याचे इथले लिहिण्याचे हक्क काढुन घेतले आहेत हे माहित नव्हते. पण जर तो हे वाचत असेल तर त्याला लोकांच्या भावना कळायला ह्व्यात.

सॉरी डॉक्टरसाहेब,
इथल्या अभिनंदनाच्या बाफवर हे लिहायला जरा ठीक वाटले नाही पण अगदीच राहवले नाही म्हणुन लिहिले.
क्षमस्व!

ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल डॉक तुमचे अनेक आभार! Happy
ब्लॉग्ज लिहिणार्‍यांची अशाप्रकारे मोठ्या पातळीवर दखल घेतली जाते, ही गोष्ट मला नव्यानेच समजली. छान उपक्रम आहे.
ब्लॉगर्सपैकी बरेचसे मायबोलीकर आहेत, याचा खुप आनंद झाला.
मंदार शिंदे हे नाव पण मायबोलीवर वाचल्यासारखे आठवतेय... ते पण मायबोलीकर असावेत बहुतेक...
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!! Happy

मास्तुरे आणि इतरांना अनुमोदन .
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ( एक सोडून )!!
खरं तर मधुकर अता 'मायबोलीकर' या कॅटॅगरीमधे तरी कुठे येतो ? Happy
त्यामुळे त्याचं नावच डिलिट करा' मायबोलीकर विजेत्यांच्या' लिस्ट मधून.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! Happy
* (त्या एकाला देव सद्बुद्धी देवो. जमेल देवाला... कदाचित.. )

अरे! हेरंब ओक देखिल मायबोलीकर आहे की!

जास्ती लोक म्हणून जास्ती नंबर Proud :नाय पटत आपल्यालाबी:

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.:)

'पक्का भटक्या'शी सहमत.

>परिक्षकांची नावे बघता हे सर्व लोक आपल्या दृष्टीने सिनियर आहेत आणि त्यांना आपल्यापेक्षा थोडं किंवा भरपूर जास्त कळतं हे आपण मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे?

मधुकरचा समावेश बघितला तर त्यांना किती कळतं हे दिसतंच आहे Biggrin

मधुकरचा ब्लॉग मी सुद्धा इतक्या प्रतिक्रियांनंतर आवर्जून वाचला. अत्यंत आक्षेपार्ह असं त्याचं लेखन आहे आणि मनात एक प्रचंड गैरसमज ठेवून द्वेष मूलक असं त्याने लिहीलेलं दिसतंय. परीक्षकांनी ब्लॉग मधील कंटेंट पूर्णता वाचलंय की नाही हे कळायला वाव नाही.

सिंडरेला यांचं म्हणणं ग्राह्य धरलं तरी त्याने लिहीलेलं लिखाण बर्‍यापैकी जुनं आहे व स्पर्धक म्हणून सामील होताना ते लेख होतेच. ..... यास्तव मला असं वाटतं की त्याचं लेखन एकांगी व आक्षेपार्ह असल्याचं आपण स्टार माझा च्या ब्लॉग वर लिहून प्रदर्शित करावं,जेणेकरुन हा निषेध योग्य ठिकाणी व्यक्त होईल. या स्पर्धेत विजयी झालेल्या समस्त ब्लॉग लेखकांचं मी अभिनंदन केलं असल्याने मधुकरचं नावही तसंच ठेवलं आहे. मी ते नाव इथून काढल्याने मधुकर ब्लॉग लेखनातील विजेता ठरणार नाही असं नाही.

आणि जरी त्याचे प्रतिसादाचे अधिकार काढून घेतेले असले तरी त्याचे आधीचे धागे व प्रतिसाद तसेच आहेत म्हणून मी त्याचा माबोकर असा उल्लेख केला आहे.

असो,आपण सर्वजण आपला निषेध इथे व्यक्त करु या.

http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669

गोळे काका, मधुकर, विशाल कुलकर्णी, गंगाधर मुटे, जयश्री अंबासकर, रोहन कमळाकर चौधरी

सर्वांचे अभिनंदन .

सुधीर

सर्वांचं अभिनंदन. वेळात वेळ काढून ब्लॉगवर लिखाण करणे अन त्यातूनही ब्लॉग आकर्षित कसा वाटेल यावर विशेष भर सुद्धा कौतूकास्पद. लवकरच एक ब्लॉग येतो आहे... !

मधुकरच्या ब्लॉग संदर्भातील तक्रारीबद्दलचे (खालील मुद्दा क्र. ३) आणि एकंदरीत स्पर्धेबद्दलचे स्टार माझा चे हे स्पष्टीकरण त्यांच्या संकेतस्थळावरूनः

ब्लॉग माझा३चे स्पर्धक, विजेते आणि अन्य वाचक... या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यापासून आपल्या अनेक प्रतिक्रिया आम्हाला या ब्लॉगवर मिळत आहेत. त्यातील कौतुकासाठी आणि टीकेसाठीही आभार. सर्व प्रतिक्रिया वाचल्यानंतर, जे मुद्दे उपस्थित केले गेलेत, त्याबद्दल स्पष्टीकरण खालील प्रमाणे १. कोणते ब्लॉग निवडावेत हे पूर्णपणे परिक्षकांच्या हाती होते. २. आमच्याकडे आलेले ब्लॉग यात निवड करण्यास असलेल्या पर्यायांची मर्यादाही आपण लक्षात घ्यावी. यातूनच निवडीविषयी मतमतांतरे असू शकतात. ३. ज्या विशिष्ट ब्लॉगविषयी काही प्रतिक्रियांमध्ये टीकेचा सूर आहे, त्यातील लेखनाविषयी मतभेद असू शकतात. मात्र, हा ब्लॉग निवडणं हा परिक्षकांचा निर्णय होता. (संबंधित प्रतिक्रिया परीक्षकांना पाठविल्या आहेत.) ४.फक्त शुद्धलेखन, आशय घनता, सजावट, वैविध्य याच निकषांप्रमाणेच अनेकवेळा प्रोत्साहन (आणि मुद्दा क्र २.) हाही मुद्दा असू शकतो. ब्लॉगसारख्या मल्टिमीडिया माध्यमाचे परिक्षण करताना (त्यातही मराठी ब्लॉग्ज) निर्णय प्रक्रिया सरधोपट नसू शकते. ५. तीस ब्लॉगर्सची निवड ही उत्तेजनार्थ आहे. दूर परदेशी किंवा ग्रामीणनिमशहरी, परराज्यातील मराठी ब्लॉगर्सना प्रोत्साहन हाही या ब्लॉग्जच्या निवडीमागील एक मुद्दा आहे. ६. मराठी ब्लॉग्जसाठीच्या या अभिनव स्पर्धेचे हे तिसरेच वर्ष आहे. आपल्या अशाच प्रतिक्रियेनेटीकेने यात अधिकाधिक सुधारणा होतीलच.याची खात्री बाळगा. अर्थात, असहमतीबद्दल आपल्या सर्वांचेच एकमत असायला हरकत नसावी. Happy आपला, प्रसन्न जोशी प्रोड्युसरअँकर (स्टार माझा)
प्रेषक -प्रसन्न जोशी,दिनांक - 11/23/2010 12:00:00 AM

होय मुटेजी,सप्तरंग पुरवणी मध्ये,श्री.विनायक पाचलग यांचे ''ब्लॉग-इट'' हे सदर विविध माहितीपूर्ण ब्लॉग विषयी अवगत करतं. आजच्या सप्तरंग मधे त्यात रानमेवा,या शीर्षकाखाली आपल्या ब्लॉगची माहिती आली आहे. अभिनंदन. Happy

Pages