कोल्हापूरहुन सकाळी सव्वा सहाची आजरामार्गे सावंतवाडीची बस पकडली, बसची एकंदरीत अवस्था पाहून धडकीच भरली होती. सगळेच ऐनवेळी ठरल्याने हॉटेल सोडले तर इतर कसलेच आरक्षण नव्हते. हॉटेलची सुद्धा सोय झाली ती मायबोलीकर सुनील गावडे उर्फ सुन्या आंबोलीकर यांच्या कृपेने. (हल बे, धन्यवाद वगैरे म्हणणार नाहीये मी :-P)
धडक-धडक करत लाल डब्बा निघाला. दोन अडीच तासानंतर वातावरण बदलायला लागले...., निसर्गराजाने आज माझा मुड ठिक आहे हे सांगायला सुरुवात केली होती.
दहा-साडे दहाच्या दरम्यान गाडी आंबोलीत पोहोचली. हॉटेलवर जावुन फ्रेश झालो, चहापाणी आटोपले आणि बाहेर पडलो. सुन्याने आंबोलीबद्दल जे काही सांगितले होते त्यातली सत्यता पटायला सुरूवात झाली होती. स्थानिक भटकंतीसाठी एक गाडी ठरवली, पण तो दुपारी ३ च्या नंतर येणार होता. म्हणुन तोपर्यंत पायीच घाटाचा रस्ता धरला.
घाटात सगळीकडे प्रचंड धुकाळ वातावरण होतं. दरीत खाली डोकावुन बघितलं तरी काही दिसत नव्हतं.
या हसर्या फुलांनी मात्र मनापासुन स्वागत केलं...
अजुन काही अॅडिशन्स...
जोडीला फुलपाखरेही होतीच...
शेवटी १२ च्या दरम्यान परत फिरलो, पोटात कावळे ओरडायला लागले आहेत याची आठवण बदललेल्या वातावरणाने आणि या एकाकी मित्राने करुन दिली.
जेवणानंतर थोडा आराम करुन साडे तीनच्या दरम्यान परत उंडगायला निघालो. यावेळी अनिल आमचा स्थानिक ड्रायव्हर कम गाईड बरोबर होता. पहिला मोहरा वळवला तो हिरण्यकेशीकडे. इथे हिरण्यकेशी नदीचा उगम आहे म्हणे. मी फार खोलात गेलो नाही, मला ती जागा मात्र आवडली.
पुढे राघवेश्वर हे स्वयंभु गणेशाचे दर्शन घेवुन ....
लगेचच कावळेसाद पॉईंट गाठला. इथे मला काही बेस्ट लँडस्केप लोकेशन्स मिळाल्या.
दुसरा दिवस तळकोकणात उतरायचे असल्याने स्थानीक स्थळे आज उरकायचीच असे ठरवले होते. दोन दिवस पुर्ण आराम आणि दोन दिवस भटकंती असा बेत होता. त्यामुळे लगेचच पुढच्या पॉईंटकडे 'नांगरतास धबधबा' निघालो.
मला या धबधब्याला काही एका फोटोत बसवता आले नाही.
तिथे जवळचे कुरकुरे आणि वेफर्सची पाकीटे गमवावी लागली. तरीपण ही बया अजुन आशाळभुतासारखी बघतच होती.
तिथुन निघालो ते थेट महादेव गड पॉइंट गाठला. हा स्पॉट मात्र खरोखर वेड लावणारा होता.
मलाही मग मोह आवरला नाही...
त्यानंतर मात्र अनिलने गाडी थेट आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे काढली. आता फारसे पाणी नाहीये पण जे होते ते देखील माझ्यासारख्या मुंबईकरासाठी खुप होते.
तिथुनच पुढच्या वळणावर आणखी एक मस्त नजारे मिळाले..
वातावरण क्षणाक्षणाला बदलत होतं. क्षणापुर्वी स्वच्छा झालेला आसमंत परत धुक्याने भारला गेला.
काही क्षणापुर्वी वरचं हे धुकाळलेलं झाड असं दिसत होतं...
हळु हळु भास्कररावांनीपण परतीचा मार्ग धरला होता. धुक्यामुळे त्यांना टाटा पण करता आले नाही.
आता मात्र पर्जन्यराजाने देखील हजेरी लावली आणि आम्ही आजच्यापुरती माघार घेतली. नुकत्याच काही महिन्यापुर्वी घाटात कोसळलेल्या दरडीचा ढिगारा अजुनही रस्त्यावरुन हलवलेला नाहीये त्या पार्श्वभूमीवर माघार घेणेच शहाणपणाचे होते. आणि ते शहाणपणाचे होते हे नंतर दोन-अडीच तास कोसळलेल्या सडाक्याने सिद्ध केले.
बाकी कोकणाचे इतर फोटो पुन्हा कधीतरी. सद्ध्यापुरते एवढेच बास्स....
विशाल
विशल्या, हे मी कसं काय मिसलं
विशल्या, हे मी कसं काय मिसलं होतं.... मस्तच रे! आंबोलीचे निसर्गसौंदर्य केवळ अप्रतिम..
अशक्य अप्रतिम !!!
अशक्य अप्रतिम !!!
सुरेख.. !!
सुरेख.. !!
(No subject)
हा घे जोडलेला धबधबा. धमाल
हा घे जोडलेला धबधबा.
धमाल नजारे आहेत रे... जातोच आता....
छान आहे वर्णन आणि
छान आहे वर्णन आणि फोटोजही
@साधना
निसर्गाच्या सान्निध्यातलं असं टुमदार घर !! भाग्यवान आहेस...
धन्स रे हबा जायच्या आधी एकदा
धन्स रे हबा


जायच्या आधी एकदा फ़ोन कर म्हणजे हॉटेल, लॉजिस्टिक्स वगैरेचे संपर्क देइन
चैत्रगंधा तुमचेही आभार
अप्रतिम विशालभौ.....
अप्रतिम विशालभौ.....
विशाल, भन्नाट आहेत
विशाल, भन्नाट आहेत प्रकाशचित्रं.
छान आहेत फोटो...
छान आहेत फोटो...
खरंच साधना, आंबोलीत आता २
खरंच साधना, आंबोलीत आता २ हक्काची घरं झाली. मी पण काढला होता या घराचा फोटो.
कावळेसाद ला जायला जो नदीवरचा पूल लागतो, तो पण माझ्या आवडीचा स्पॉट. तिथे केवड्याचे बन आहे आणि त्या केवड्याला फळे पण लागतात (हो केवड्याला फळे लागतात. अननसासारखीच दिसतात आणि तशीच लागतात पण जरा कमी गोड असतात. आफ्रिकेत हे झाड सुगंधापेक्षा फळांसाठी लावतात.)
महादेवगड पॉइंटवर अप्रतिम चवीची जांभळे मिळतात. (साधारण एप्रिल / मे मधे ) तिथेच हिरडे पण मिळतात. तिथून खाली जायला एक वाट आहे आणि ती एका मठात जाते. वाट अवघड आहे पण तिथे वाटेत एक गोड पाण्याचा झरा आहे.
विशालच्या फोटोत जे घर आहे, तिथे पूर्वी छान काष्ठशिल्पे दिसायची. आणि हो तिथले मेंढीगवत दाखवायला साधना आणि पंकज बरोबर हवेत ( मी त्याआधी इतक्या वेळा गेलो होतो तिथे पण कधीच दिसले नव्हते.)
शिरगांवकर पॉइंटवर जाताना वेली करवंद मिळतात. साध्या करवंदापेक्षा ती मोठी आणि जास्त गोड असतात.
वाडीहून अंबोलीला जाताना माडखोल गावाच्या आसपास जे नदीतले कातळ आहेत, ती पण एक मस्त जागा आहे.
चला, पुढच्या वेळी साधना आणि
चला, पुढच्या वेळी साधना आणि दिनेशदांनाही बरोबर न्यायला हवे. दिनेशदा माहितीसाठी खुप खुप आभार
सु॑दर!!! माझा दादा मला
सु॑दर!!!
माझा दादा मला प्रत्येक वेळेला चल बोलतो पण मला वेळ मिळत नाही प्रत्येक वेळी ठरवुन जाते की मी या वेळी जाणार पण जाता येत नाही म्हणून खुप वाईट वाटत.
सुंदर
सुंदर
दिनेशदा तिथल्या सगळ्या भागात
दिनेशदा तिथल्या सगळ्या भागात जांभळ अशिच असतात वटत. माझ्या वडलांच मुळ गाव तिथुन ११ किमी वर आहे. तिथेपण आकाराला एकदम छोटी बि तर एकदमच छोटी पण चविला अप्रतिम जांभळ मिळतात. आणी आंबोलीचा पुर्ण पट्टाच वनओषधीने खचाखच भरलेला आहे.
बाकी कावळेसाद हा पॉइंट एकदम सुंदरच आहे. मि तिथे खुप वर्षांपुर्वी गेलेली. तेव्हा रस्ता पण नव्हता. आणी ति जागा कोणाला माहीतही नव्हति.
खुप सुंदर फोटो नि आंबोलीदर्शन
खुप सुंदर फोटो नि आंबोलीदर्शन हि
रिमा, कावळेसादला रस्ता नसताना
रिमा, कावळेसादला रस्ता नसताना मी आणि गिरीराज तिथे गेलो होतो. तिथे तर कठडाही नव्हता त्यावेळी.
ती जांभळे झाडावरुन तोडून खाण्यातच मजा (आम्ही बाईकवर उभे राहून काढली होती, मायबोलीकर मैतर आणि ऋचा पण होते त्यावेळी ) बाजारात नाहि येत ती.
खूप सुंदर चित्रण.
खूप सुंदर चित्रण.
शिरगांवकर पॉइंटवर जाताना वेली
शिरगांवकर पॉइंटवर जाताना वेली करवंद मिळतात. साध्या करवंदापेक्षा ती मोठी आणि जास्त गोड असतात.

मे महिन्याची वाट पाहातेय.
आम्ही त्याला रेडेकरवंद म्हणतो..
आंबोलीची जांभळे जगात दुसरीकडे कुठेही सापडणार नाहीत. ती चव आणि तो वास... अहाहा....
कावळेसाद पॉईंट आणि महादेवगड
कावळेसाद पॉईंट आणि महादेवगड पॉइंट्चे फोटो प्रचंड आवडले. अफलातून!!!
सुरेख ! फोटोग्राफी मस्तच.
सुरेख !
फोटोग्राफी मस्तच.
व्वा..सुरेख फोटो रे .. कोणता
व्वा..सुरेख फोटो रे .. कोणता कॅमेरा हाय तुझ्याकडे????
तू ग्रेट आहेस. तुझी दृष्टी
तू ग्रेट आहेस. तुझी दृष्टी सर्वांना देतोस हे प्रचंड पुण्य आहे तुला. अतिशय अप्रतीम फ्रेम्स. मस्त. अजून काय म्हणावे ते सुचेच ना. एवढ्या व्यस्तातून वेळ काढणं किती अवघड असतं याची कल्पना आहे मला.
सदैव शुभेच्छा.
......................अज्ञात
अज्ञातजी, प्रकाश
अज्ञातजी, प्रकाश तुमच्यासारख्या फोटोग्राफीतल्या दिग्गजांची दाद मिळाली, मी भरुन पावलो.
वर्षू, अगं साधा ७.१ MP (4X zoom) चा कॅननचा डिजीकॅम आहे हा.
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार
विकु, मस्त आहे चित्रं आणि लेख
विकु, मस्त आहे चित्रं आणि लेख दोन्ही. बाप्पाची शिडी विशेष आवडली !
इथे काहीच नाही मिळत.
कोकण..माझी दुखरी रग आहे. कधी जायला मिळणार परत कोण जाणे ?
जांभळं,करवंदं ...तों.पा.सु.
झक्कास... "कावळेसाद पॉईंट"
झक्कास...
"कावळेसाद पॉईंट" अप्रतिम.
प्रचिंना क्रमांक दे म्हणजे प्रतिसाद देणे सोपे जाईल.
रुणुझुणू, चंदन आभार
रुणुझुणू, चंदन आभार

रुणुझुणू, त्याबाबतीत मी सुदैवी असल्याने मनात आले की निघु शकतो. ऐनवेळेला रिझर्वेशन्स नाही मिळाली तर आम्ही सरळ बाईक काढतो आणि निघतो
विशालभाऊ, सगळे फोटो खासच आणि
विशालभाऊ,

सगळे फोटो खासच आणि वर मस्त वर्णन!
आज जेवण नाही केलं,पण पोट भरलं राव !
कोल्हापुरहुन आजर्याला २-३ वेळा गेलो पण हे एवढं सगळं तिथुन जवळ आहे,हे आता कळालं !
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
विशाल, तुमच्यामुळे कोकणची सहल
विशाल, तुमच्यामुळे कोकणची सहल झाली. कोकण मला फार फार फार आवडत. धन्यवाद......
सर्वच फोटो सुंदर.
Pages