कोल्हापूरहुन सकाळी सव्वा सहाची आजरामार्गे सावंतवाडीची बस पकडली, बसची एकंदरीत अवस्था पाहून धडकीच भरली होती. सगळेच ऐनवेळी ठरल्याने हॉटेल सोडले तर इतर कसलेच आरक्षण नव्हते. हॉटेलची सुद्धा सोय झाली ती मायबोलीकर सुनील गावडे उर्फ सुन्या आंबोलीकर यांच्या कृपेने. (हल बे, धन्यवाद वगैरे म्हणणार नाहीये मी :-P)
धडक-धडक करत लाल डब्बा निघाला. दोन अडीच तासानंतर वातावरण बदलायला लागले...., निसर्गराजाने आज माझा मुड ठिक आहे हे सांगायला सुरुवात केली होती.
दहा-साडे दहाच्या दरम्यान गाडी आंबोलीत पोहोचली. हॉटेलवर जावुन फ्रेश झालो, चहापाणी आटोपले आणि बाहेर पडलो. सुन्याने आंबोलीबद्दल जे काही सांगितले होते त्यातली सत्यता पटायला सुरूवात झाली होती. स्थानिक भटकंतीसाठी एक गाडी ठरवली, पण तो दुपारी ३ च्या नंतर येणार होता. म्हणुन तोपर्यंत पायीच घाटाचा रस्ता धरला.
घाटात सगळीकडे प्रचंड धुकाळ वातावरण होतं. दरीत खाली डोकावुन बघितलं तरी काही दिसत नव्हतं.
या हसर्या फुलांनी मात्र मनापासुन स्वागत केलं...
अजुन काही अॅडिशन्स...
जोडीला फुलपाखरेही होतीच...
शेवटी १२ च्या दरम्यान परत फिरलो, पोटात कावळे ओरडायला लागले आहेत याची आठवण बदललेल्या वातावरणाने आणि या एकाकी मित्राने करुन दिली.
जेवणानंतर थोडा आराम करुन साडे तीनच्या दरम्यान परत उंडगायला निघालो. यावेळी अनिल आमचा स्थानिक ड्रायव्हर कम गाईड बरोबर होता. पहिला मोहरा वळवला तो हिरण्यकेशीकडे. इथे हिरण्यकेशी नदीचा उगम आहे म्हणे. मी फार खोलात गेलो नाही, मला ती जागा मात्र आवडली.
पुढे राघवेश्वर हे स्वयंभु गणेशाचे दर्शन घेवुन ....
लगेचच कावळेसाद पॉईंट गाठला. इथे मला काही बेस्ट लँडस्केप लोकेशन्स मिळाल्या.
दुसरा दिवस तळकोकणात उतरायचे असल्याने स्थानीक स्थळे आज उरकायचीच असे ठरवले होते. दोन दिवस पुर्ण आराम आणि दोन दिवस भटकंती असा बेत होता. त्यामुळे लगेचच पुढच्या पॉईंटकडे 'नांगरतास धबधबा' निघालो.
मला या धबधब्याला काही एका फोटोत बसवता आले नाही.
तिथे जवळचे कुरकुरे आणि वेफर्सची पाकीटे गमवावी लागली. तरीपण ही बया अजुन आशाळभुतासारखी बघतच होती.
तिथुन निघालो ते थेट महादेव गड पॉइंट गाठला. हा स्पॉट मात्र खरोखर वेड लावणारा होता.
मलाही मग मोह आवरला नाही...
त्यानंतर मात्र अनिलने गाडी थेट आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे काढली. आता फारसे पाणी नाहीये पण जे होते ते देखील माझ्यासारख्या मुंबईकरासाठी खुप होते.
तिथुनच पुढच्या वळणावर आणखी एक मस्त नजारे मिळाले..
वातावरण क्षणाक्षणाला बदलत होतं. क्षणापुर्वी स्वच्छा झालेला आसमंत परत धुक्याने भारला गेला.
काही क्षणापुर्वी वरचं हे धुकाळलेलं झाड असं दिसत होतं...
हळु हळु भास्कररावांनीपण परतीचा मार्ग धरला होता. धुक्यामुळे त्यांना टाटा पण करता आले नाही.
आता मात्र पर्जन्यराजाने देखील हजेरी लावली आणि आम्ही आजच्यापुरती माघार घेतली. नुकत्याच काही महिन्यापुर्वी घाटात कोसळलेल्या दरडीचा ढिगारा अजुनही रस्त्यावरुन हलवलेला नाहीये त्या पार्श्वभूमीवर माघार घेणेच शहाणपणाचे होते. आणि ते शहाणपणाचे होते हे नंतर दोन-अडीच तास कोसळलेल्या सडाक्याने सिद्ध केले.
बाकी कोकणाचे इतर फोटो पुन्हा कधीतरी. सद्ध्यापुरते एवढेच बास्स....
विशाल
मी" शिवथरघळ" ला जाताना हे
मी" शिवथरघळ" ला जाताना हे कोकण सौंदर्य सगळं अनुभवलं आहे.
धुक्याने भरलेल्या दर्या, डोंगर, धबधबे, जीवघेणे घाट,तुमच्या
फोटोतली बया तिच्या परिवाराबरोबर बघितली. आणि भाताची
हिरवीगार शेतं. हिरव्या रंगात एवढ्या छटा असतात हे मला पहिल्यांदा
समजलं. दुर्दैवाने माझ्याकडे चांगला कॅमेरा नव्हता त्यामुळे फोटो
एवढे चांगले आले नाहीत. तुमचे हे आंबोलीचे फोटो पाहून सगळ्या
आठवणी जाग्या झाल्या.फोटोंचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत.
खूप अप्रतीम.
छान.
छान.
विकु.. आंबोली मस्तच.. तो
विकु.. आंबोली मस्तच.. तो लँडस्कॅपचा फोटो भन्नाट !
नि त्या सुन्याला धन्यवाद नको.. पण मला दे.. जल्ला सुनील गावडे नि सुन्या आंबोलकरचा फरक मीच सांगितला ना बे..
धन्यवाद बे योग्या
धन्यवाद बे योग्या
सहीच !
सहीच !
चला माझ्या गावाची पाटी तर
चला माझ्या गावाची पाटी तर दिसली.
तिथे खरंच हिरण्यकेशीचा उगम आहे बरं का. असं आम्हाला शाळेत असल्यापासुन सांगण्यात आलंय..पण मी अजुन नाही गेलेय.
छान लेख.
आवडली चित्रकथा!
आवडली चित्रकथा!
सही रे.... पावसाळ्यात जा
सही रे.... पावसाळ्यात जा पुन्हा आंबोलीला...
मस्त आहेत फोटो!
मस्त आहेत फोटो!
खूप सुंदर आहेत रे फोटो शेवटचे
खूप सुंदर आहेत रे फोटो शेवटचे काही तर भन्नाटच... !
बाकी तो .. हिरो कोन हय ? गरीबोंका रजनीकांत काय ?
@#$%&)()( मला ओळखलं नव्हतं ना
@#$%&)()( मला ओळखलं नव्हतं ना बे... विसरणार हे माहीत असतं तर त्यावेळीच कॅनियॉन व्हॅलीत सोडून आलो असतो...
बाकी फोटू मस्तच आणि आबोलीचं वर्णनही...
मस्त आहेत फोटो..... सुन्या
मस्त आहेत फोटो.....
सुन्या तुझ गाव छानं छान आहे बे...
हे राम, टाकलासच का शेवटी? आणि
हे राम, टाकलासच का शेवटी? आणि वर अजून कोकणाचे फोटो यायचेत म्हणतोय
महादेवगड पॉईंट अशक्य सुंदर आहे.
शिरगावकर पॉईंट नाही पाहीलात
शिरगावकर पॉईंट नाही पाहीलात तिथुन थेट अरबी समुद्र दिसतो. बाकी आंबोली बद्दल काय बोलणार .. सिर्फ नाम ही काफी है ..
मस्तच फोटो आहेत. black and
मस्तच फोटो आहेत. black and white खुप आवडलेत
विकु, मस्तच रे!!! आवडले हे
विकु, मस्तच रे!!!
आवडले हे फोटो फिचर
आगावा, मी तर वेडाच व्हायचा
आगावा, मी तर वेडाच व्हायचा बाकी राहीलो होतो रे तिथे. मला हा स्वर्ग मित्रांसोबत शेअर केल्याशिवाय राहवेना. आणि गंमत म्हणजे या ठिकाणी बाप्पाने थेट आमंत्रण दिलं होतं
वर येण्यासाठी शिडी पण पाठवली होती. हे बघ...
आम्हीच कपाळकरंटे ठरलो, ऐहिकाचा मोह काही सुटला नाही.
सहीच रे, विशल्या. मला तरी फोन
सहीच रे, विशल्या. मला तरी फोन करून सांगायचं शिडीच्या वाटेने स्वर्गाचा ट्रेक नक्कीच केला असता.
माझे कोकण!!
माझे कोकण!!
मस्त फोटो रे विशाल कोकण आहेच
मस्त फोटो रे विशाल
कोकण आहेच सु़दर!!
व्वा! मस्त! फोटो आणि लिखाण!
व्वा! मस्त! फोटो आणि लिखाण!
मस्तच फोटो.. शेवटचा तर लय
मस्तच फोटो.. शेवटचा तर लय भारी.
मस्तच फोटोज...
मस्तच फोटोज...
छान आहेत फोटो. (तिथे अजून
छान आहेत फोटो. (तिथे अजून बरेच बघण्यासारखे आहे !)
कुठल्याही ऋतूमधे अंबोली सुंदर असते. त्या देवळाच्या मागून सूर्यास्त पण छान दिसतो.
मस्त रे जबरी... लय भारी
मस्त रे जबरी...
लय भारी फोटु...
विशालभौ, कधी गेलात माझ्या
विशालभौ, कधी गेलात माझ्या गावाला?? मी गेल्या आठवड्यात तिथेच होते, रविवारी जड मनाने परतले
यावर्षी आंबोलीला पुर्ण वर्षभर पाऊस पडला. वर दिसतेय तसे वातावरण मी गेल्या जानेवारीत पाहिले, मग मार्चमध्ये पाहिले, मग सप्टेंबरमध्ये पाहिले आणि गेल्या आठवड्यातही सेम असेच होते. सकाळी धुक्याची एक फेरी असायची. घाटावरुन बाजारात आणि तेथुन गावात जाणारे धुके रोज पाहात होते घरातुन. सकाळी अर्धा तास हा देखावा, मग स्वच्छ निळे आकाश आणि उबदार उन. दोन वाजता काळे ढग अगदी घड्याळ लाऊन यायचे आणि सुर्याला दुपारच्या जेवणानंतर दिवसाचीच सुट्टी द्यायचे. दाटलेले आभाळ दोन तासात कोसळायला लागले की रात्रभर कार्यक्रम चालु. सकाळी उठून पाहायचे तर परत स्वच्छ निळे आकाश आणि उबदार उन..... चार दिवस किती सुखात गेले काय सांगणार?????????
हे माझे आंबोलीतले घर..... दिनेश, आठवतेय ना? परत या म्हणायला नकोच. घरच खेचुन आणेल तुम्हाला..
(फोटो गेल्या आठवड्यातला आहे,तारीख चुकीची आहे. सकाळी उन आणि धुके दोन्ही होते त्यामुळे अंदाजपंचे फोटो काढलाय, डिजिटलच्या स्क्रिनवर काहीच दिसत नव्हते)
साधना, किती सुंदर वर्णन करते
साधना, किती सुंदर वर्णन करते आहेस. अन तुझं घर निसर्गाच्या कुशीत निवांत पहूडल्यासारखं भासतं आहे.
असोत लवकरच , बाईकने कोकण करायचा विचार आहे. कोण कोण मायबोलीकर तयार होतय ते बघूयात.
अरेरे आधी तरी नाही सांगायचे,
अरेरे आधी तरी नाही सांगायचे, माझा तेवढाच खर्च वाचला असता ना साधना
मी १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर आंबोलीत होतो.
अरे बरेच झाले ना?????
अरे बरेच झाले ना????? आंबोलीला परत जायला तुला एक कारण सापडले...... आता माझ्या घरी म्हणुन ये...
१० ते १४?????????????????????????????????????????????????????????? मला कसा दिसला नाहीस???????????????/ मीही १० ते १३ आंबोलीत:(
पण मी घराबाहेर अजिबात पडले नाही, घराभोवती वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत होते...
दिनेशदा अजुनही खुप काही आहे
दिनेशदा अजुनही खुप काही आहे खरेच. सगळे फ़ोटो पिकासावर टाकले मी मग दुवा देइनच इथे.
सगळ्यांचे मन:पूर्वक आभार
Pages