आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आम्ही मुंबईकर
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं
कधी अडवाणीनी आम्हाला खेळवायचं
कधी सोनियानी चुचकारायचं
निवडणूका झाल्या की पुन्हा फेकून द्यायचं
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं

कधी आपआपसातच लढायचं
जात-पात, धर्म आणि काहीच नाही तर भाषेवरनं भांडायचं
चाळी जाळायच्या, नाहीतर लोकांनाच जाळायचं
कसोटीच्या क्षणीही एकमेकांना लाथाडायचं
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं

कधी बाँबस्फोट तर कधी अंडरवल्‍ड
कधी लोकल नाहीतर बस
कधी रेल्वे स्टेशन तर कधी हॉटेल
नाहीतर भररस्त्यावर कुणाच्या तरी गोळ्यांना बळी पडायचं
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं

चला उठा, जागे व्हा, झोपलेल्यांनाही जागं करा
निर्लज्ज राजकारण्यांना फेकून द्या सत्ता सिंहासनावरनं
पत्रे लिहा, फोन करा, माहीतीचा हक्क बजावा
द्या दाखवून नपुसंक राजकारण्यांना
आम्ही नवभारताचे युवक आहो
आम्हा कुत्र्याच्या मौतीने मरणार नाही!

प्रकार: 

आपल्या देशात कुत्र्यांना मारायला बंदी आहे
आपली लायकी त्याहुनही खालची आहे.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आणि मिळणार्‍या थातुर-मातुर सहानुभुती रकमेवर कुटुंबातल्या लोकांनी खुष रहायचं ते ही गेलेल्याच्या मृत्यूचं दु:ख विसरून. Sad

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

खूप सुंदर...
वाह उस्ताद वाह...[:)]

वैभव,
तुझी कविता वाचणारे नक्कीच जागे होतील.
खूपच छान........