मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ताजच्या बाहेर जत्रा म्हणजे लोकांना काय तो डोंबार्‍याचा खेळ वाटतोय का???? Sad
==================

ताज मधे अतिरेक्याना संपुर्ण ईमारतीची पुर्ण माहिती होती, त्यामुळे ते अगदी सहजपणे बाँब स्फोट करीत होते. १ महिन्यापासुन त्यांनी नियंत्रण कक्षही स्थापन करुन ठेवला होता. हे अर्थातच तिथल्या स्थानिक माहितीगार व्यक्तिंशिवाय शक्य नाही. कमाल म्हणजे ATS व गुप्तचर विभागाला काही कल्पनाही नाही. ATS ची परिस्थिती हातळण्याची तयारी योग्य दिसत नाही. त्यानी प्रसिद्धी च्या मागे लागण्यापेक्षा तंत्रज्ञानावर व खर्या दहशतवादावर लक्ष दिले असते तर निदान असे शुर वीर अधिकारी हकनाक नसते मारल्या गेले.

CNN वर ५ ज्यूंच्या मरणाची बातमी आहे.
तिथल्याच एका छोट्या मुलाला तिथे स्वयंपाक करणार्‍या बाईने वाचवलं ना?

ताजबाहेर जत्रा - काय म्हणावं लोकांना Sad Angry

अशीच जत्रा नरिमन हाऊसच्या बाहेरसुद्धा आहे.
या अतिरेक्यांना मुंबईच्या गल्लीबोळांची माहिती होती. शिवाय ताज व ओबेरॉयचीसुद्धा. ताजमध्ये अनेक जिने, व बाहेर जायचेयायचे मार्ग आहे. सराईत असल्याशिवाय हे सर्व मार्ग माहिती असणं अशक्य आहे. आणि अतिरेकी अतिशय सफाईदारपणे आत वावरत होते.

हा हल्ला ए टी एस च्या ही अवाक्या बाहेरचा वाटला, ए टी एस कढे ऑटोमेटीक वेपन्स असतील पण हे असला हल्ला परतवायचा म्हणजे ट्रेनिंग लागत... जन हुड्डा बोलत असताना ऐकल असेल तर अंदाज येतो की एन एस जी कस काम करत...

आत्ताच सांगितले की ATS कडचे बुलेटप्रुफ जाकीट कालबाह्य झालेली होती.............

माझी मैत्रिण व तिचे सर्व सहकारी सुखरूप आहेत. आज संध्याकाळी त्यांना बाहेर काढण्यात आलं.

chinoox .... अत्यंत चांगली बातमी.......

लोकांच्या बेजबाबदार वागण्याने international channels वर देशाची बदनामी होतेय CNN वर ताज बाहेरच्या reporter ने "लोक इथे गर्दी करता आहेत, authorities लोकांना अडवत नाही आहे, UK, USA मध्ये अस होत नाही लोक अश्या ठिकाणि दिसत सुध्दा नाही...this is not safe and we r going to do wht makes SENSE... अस सांगितल.

लोक गर्दि काय करतात पोलिसांचा ताण याने वाढतो हे कस कळत नाही यांना ह्या अश्य वेळी काही लोकांना camera समोर येण्याची TV त दिसयाची धडपड सार जग मुम्बईला पाहतय आणी काही मुर्ख लोकांच्या मुर्खपणाने देशाची आब्रु अधिकच जातेय. Sad

वा चिनूक्स, बरं वाटलं ऐकून.

अगदी बरोबर. या मूर्ख लोकांना गोळ्या लागल्या तरी मला वाईट वाटणार नाही.

नरिमन हाऊस मोहीम फत्ते झाल्यावर समोर जमलेल्या लोकांनी म्हने जल्लोष केला. मूर्ख लेकाचे. अरे काय क्रिकेटची मॅच जिंकली की काय? किती ओलीस्,पोलिस, कमान्डो मेले त्यात. जालपोळ झाली अन हे जल्लोष करताहेत, फटाके वाजवताहेत. वर कोणी तरी म्हतलय ते बरोबर आहे. आपन अतिरेक्यानी मारण्याच्या लायकीचेच आहोत. खरे तर दहशतवाद्यानी दोन चार फैरी या बघ्यांवरही झाडाव्यात

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

हुश्श... चला बरं झालं
चिनूक्स.. खरच बरं वाटलं..

ताजमधे front office staff आणि इतर काही स्टाफ अशा एकूण २२ जणांना अतिरेक्यांनी एका रांगेत उभे करून त्यांच्यावर firing केले... Sad
माझ्या ओळखीतल्या एक बाई... त्यांच्या ४ विद्यार्थिनी ताजमधे लागल्या होत्या नुकत्याच...... Sad

--
Sad

इंडिया टिव्हीचा रीपोर्टर कमांडोबरोबर ताज मध्ये कसा ??
नरिमन हाउस क्लिअर झालेय.. निदान अतिरेकी तरी नाहियेत.. पण ताज चे प्रकरण लांबणार.. Sad

चिनूक्स, बरे वाटले वाचून की तुझी मैत्रीण आणि तिचे सहकारी सुखरुप आहेत.
मनी.. Sad Sad

शेकडो निरापराध लोक मारले गेले आणी बोटावर मोजण्या इतके आतंकवादी. (२ आतंकवादी : ५ निरपराध लोक). काय निस्तरल???? काय संपल???? राजकीय लोकांना पत्र लिहिण्या सोबत देश बांधवांना ही काही समजावल पाहीजे. जनता आपली जबाबदारी समजुन राहिल तर किति तरी समस्या येणारही नाहीत. सेलिब्रेशन करताय म्हणे. Brain wash करा. आपली पोलिस यंत्रणा, राजकीय व्यवस्था (?) खराब पण जनतेच स्व:ताच काय?????

या सम्पूर्ण बीबी वर आतापर्यन्त 'फ' यांचे पोस्ट सर्वोत्कृष्ट आहे असे मला वाटते. अतिशय सकस आणि अभ्यासपूर्ण मांडणी. देशदेशीच्या स.म्बंधांचे उत्तम विष्लेशण . घडलेल्या अन येऊ घातलेल्या घटनांची उत्तम कारण मीमांसा. तसे घडेलच असे नाही पण ट्रेन्ड्स एकदम तर्क शुद्ध. बाकी इतर काय बोलावे? इतर बीबी वर अभ्यासपूर्ण लिखान करणार्‍यांचाही इथे अगदीच 'सन्तु' उर्फ 'भाउराव' झालाय्. यंत्रणेचे अपयश हे राज्यकर्त्यांचे अपयश मानले जाते हेही ठीक. पण अत्यंत अर्वाच्य भाषेत इन्दिरा गांधी, महात्मा गांधी, पन्तप्रधान्,इत्यादीचा उद्धार करणे ही ज्यांची संस्कृती आहे ती बालक, पशु, और नारी, सब ताडनके अधिकारी असे म्हणणार्या प्रतिगामी प्रवृत्तीशी नाळ सांगणारीच आहे. मुम्बैचा सी पी हसन गफूर आहे म्हणून दहशत्वाद्यांचे फावते असेही एक 'नेहमीचा यशस्वी कलाकार' म्हणाला. अहो करकरे असतानाही साध्वीचा आणि पुरोहितसाहेबांचा छळ झालाच ना. मोदींची करकरेंबद्दलची मुक्ताफळे विसरलात की काय. ? सत्ताधीशांच्या तालावर नाचायला करकरे एवढे 'चीप' होते काय ? शिवसेनेने १ डिसें. चा महाराष्ट्र बन्द केवल एटीएसच्या अत्याचाराविरुद्ध आयोजित केला होता म्हणे.एटीएसचे प्रमुख हसन गफूर असता तर ? (आता करकरेसाहेब एकदम हीरो.)

इथल्या शूर वीरात एवढा दम आणि धर्माभिमान होता तर का नाही आत्मघातकी पथके पाकिस्तानात पाठवून बॉम्बस्फोट घडवले?
मोदीचा इथे येण्याचा अन पैसे जाहीर करण्याचा उद्देश स्पष्ट होता ही सगळी निवडणूकीची पेरणी चालू आहे..

We should not much bother about who came by boat,
We should much bother about who came for vote!!

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

चिनूक्स, वाचून बरे वाटले.
लोकहो, अशा वेळी खरे खोटे काय ते कळणे कठिण असते. अगदी TV, Radio वरील बातम्या सुद्धा बरेचदा खोट्या असू शकतात. तेंव्हा जोपर्यंत खरोखर सगळे पोलिस नि लष्कर सांगत नाही तोपर्यंत हे चालूच रहाणार.
आता वॉल स्ट्रीट नि इतर अमेरिकन लोकांनी 'अक्कल काढली' याकडे मुळीच लक्ष देऊ नये. बुशची 'अक्कल' सगळ्या जगातल्या देशांनी काढली. एकंदरीतच इराक चे युद्ध, सध्याची आर्थिक परीस्थिती पहाता अमेरिकेत 'औषधाला तरी कुठे अक्कल सापडेल का हो' असे विचारण्याची वेळ आहे. वॉल स्ट्रीट वाल्यांना सांगा तिथल्या लोकांनी जे धंदे केले त्यातून त्यांची अक्कल सगळ्या जगाला कळली! त्यांनी उगीच दुसर्‍याची अक्कल काढू नये, विशेषतः दहा हजार मैलावरून. ९/११ च्या वेळी कुणि अमेरिकेची अक्कल काढली नाही. पण तेव्हढी सभ्यता अमेरिकेकडे कुठे?
असो. काही माहिती कळली ती अशी. गुरुवारपासून मासेमारी कोळी संपावर जाणार होते. ते गेटवे ऑफ ईंडिया च्या विरुद्ध बाजूच्या समुद्रात. म्हणून भारतीय कोस्ट गार्डच्या बोटी तिकडे गेल्या. हे अतिरेक्यांना कळले, कसे? कुणि सांगितले असेल, किंवा त्यांनी आपले डोके लढवले असेल.
ह्या हल्ल्यापूर्वी एक दोन आठवडे ताजमधे वगैरे कडक सुरक्षा होती. सर्वांच्या बॅगा उघडून तपसण्यात येत होत्या. कारण बातमी कळली होती की असे काही होणार आहे. पण कुठे नि कधी? याचे उत्तर कुणालाच माहित नसते. सुरक्षा दलाच्या लोकांना स्वतःचे आयुष्य असते. अतिरेक्यांना नक्कीच नसते. प्राणावर उदार झालेले लोक ते. त्यांना वेळापत्रक नसते. ते फक्त कायम अश्या संधीची वाट पहात असतात, त्यांना बायका मुले, आई वडील यांचा विचार नसतो.
अतिरेक्यांच्या डोक्यात कुणितरी भरवले की भारतातल्या मुसलमानांवर अन्याय होतो आहे! तरी बरे जगातल्या सर्व मुसलमानांत भारतातल्या मुसलमानांची परीस्थिती चांगली आहे. उगाच नाही जगातले जास्तीत जास्त मुसलमान भारतात रहातात. पण चुकीचा प्रचार. आणि 'आपले' भट्ट त्यान्ना समजून घ्या म्हणतात.

३०-३५ अतिरेक्यान्ना नेस्तनाबुत करायला ५० च्या वर तास!!!
हा कुरेशी किती समर्थन करतो आहे पाकिस्तानचे..सगळे आरोप हसुन नाकारत आहे!!! काय निलाजरी माणसे आहेत..

दुसरी गोष्टः जे झाले ते कालच नाही सुरु झाले, या लोकांचे जाळे भारतात गेली अनेक वर्षे सगळीकडे पसरलेले आहे. त्यांची तयारी झाली, प्लॅनिंग झाले, की संधी बघून ते कृति करतात. हे असेच चालू रहाणार. ताजमधे या लोकांनी नोकर्‍या आधीच घेऊन ठेवल्या होत्या. दारुगोळा भरून ठेवणे चालूच होते. काही लोकांनी खोल्या भाड्याने घेतलेल्या होत्या. दुबईहून भरपूर पैसा मिळतोच. जागोजाग हे लोक पसरलेले आहेतच. ते एरवी नोकया करतात, धंदा करतात, कुणाला संशयदेखील येऊ नये की हे अतिरेकी आहेत. संजय दत्तकडे सुद्धा दारुगोळा नि बंदुका सापडल्या म्हणे! काय झाले त्याचे? त्याला अटक केली तर लोकांनी तो सुटावा म्हणून सत्यनारायण केले म्हणे. असे जर आपलेच लोक. तर कशाला उगीच कुणि कुणाला नावे ठेवायची? त्यांना त्यांच्या पुढार्‍याने केंव्हा काय करायचे ते सांगितले की ते करतात!

दाऊदचे पैसे घेऊन लोक निवडणूका लढवतात म्हणे! मग कसे यांना कुणि पकडून देणार?

थोडक्यात, सध्या चालू परीस्थितीत पोलीस नि इतरांना काय करायचे ते करू द्यावे!

बाकी ती माणसे मराठीत बोलली म्हणजे नक्कीच ते मराठी नसणार हे मी ओळखलेच.

कारवाई पुर्ण म्हणजे काय ? तेथील अतिरेक्यांना ताब्यात घेत आहेत का ? की फक्त अडकलेल्या लोकांना बाहेर काढले ?

साधारण ६ महिन्यांपुर्वी ह्या हल्ल्याची तयारि सुरू केलेली होती असं आत्ताच CNN वर सांगत होते.

CNN वरच्या 'Your Voice' वर आपली मुंबई अतिरेकि हाल्ल्यांबाबत मत व्यक्त करण्याच्या सुविधे बाबत इथे बर्‍याच मायबोलि करांना माहीत असेल...पण तरीही इथे माहीती साठी सांगितल...कुणाला काही मत/प्रतिक्रिया व्यक्त करायच असल्यास

ओबेरॉय बरोबरच नरीमन हाऊसचं ही ऑपरेशन फत्ते!!!!!!! एन.एस.जी चे मोठे यश!!!!
मात्र ताज मध्ये अजुन ही चकमक सुरू.....बुधवार च्या रात्रीनंतरची सकाळ लवकरच उजाडेल अशी चिन्हे!!!!
देवा लवकर सोडव रे यातुन सर्वांना!!!!

*****************
सुमेधा पुनकर
*****************

काहीतरी मोठं प्रकरण शिजत असल्याचा संशय येतोय.
--- ही सर्व काळ चालणारी प्रक्रिया आहे, एक प्रकरण हातावेगळे झाल्यावर पुढचे आधी पे़क्षा वेगळे, भयंकर, जास्त परिणामकारक... live telecast मधुन जसे आपण शिकतो त्या पे़क्षा जास्त अतिरेकी शिकतात. हे म्हणजे कसे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पुढच्या मालिकेआधी सचिन च्या बॅटींगचा संपुर्ण अभ्यास करतात, कच्चे दुवे, बारकावे काठतात. मग त्याचा उपयोग पुढे खेळात करतात, आता सचिनलाही थोडे बदलावे लागते आणि म्हणुन तो सचिन टिकला आहे.

झक्कीसाहेब तुमचेही पोस्ट उत्कृष्ट... आय बी चे लोक आणि सी आय डी (इन्टेलिजन्स)(आता त्याला एस आय डी म्हनतात) चे लोक केवळ काहीतरी रेकॉर्ड ठेवायचे म्हणून रेग्युलर पोलीस फोर्सकडे नेहमी काहीतरी फुसकुल्या सोडीत असतात. अशी पोलीसान्ची नेहमी तक्रार असते. अत्यन्त भोंगळ रीपोर्ट. म्हनजे लवकरच तुमच्या शहरात कट्टर दहशतवाध्यांच्या हालचाली वाढणार आहेत वगैरे. म्हनजे चीतभी मेरी और पट भी मेरी. काही झालेच तर आम्ही तुम्हाला आधीच कळवले होते. नाही झाले काही तर काही फरक पडत नाही .या रिपोर्टांचा सुरक्षा दलाला म्हणजेच पोलीसाना फारत्रास होतो. कारण अंतर्गत सुरक्षा हा राज्य सरकारांचा विषय आहे .अशा रिपोर्टात नक्की कधी , कुठे असा काही क्लू नसतो. उगीचच आपल्या ढगात गोळ्या...
गुजरातवाल्यांचे हेच नाटक चालू असनार्..बर्‍याच वेळा असा इन्सिडन्स घडल्यावर एक बातमी हमखास असते की याबाबत राज्याला अथवा मुम्बै पोलीसाना आधीच सावध करण्यात आले होते.शिवाय सुरक्षा दलातील माणसे व अतिरेकी यात झक्की म्हणतात तो फरक आहेच... शिवाय कोणताही सुरक्षा कर्मी काही २४तास कामावर असू शकत नाही.
१९९३ च्या स्फोटांचे आर डी एक्स जिथे उतरविले ते शेखाडी गाव मी पाहिले आहे. ३००-४००-वस्तीचेच. पण सुनसान किनारा आणि मानसांची वर्दळ दिवसाही नाही अशी ती जागा. शेकडो कि.मी. लाम्बीचा सुनसान किनारा माहाराष्ट्राला आहे. कुठेकुठे वॉच ठेवणार? इतर पाश्चिमात्य राष्ट्राशी तुलना आपन करतो.(त्याची तर या बीबी वर अहमहमिका लागली आहे) पण आपला प्रचंड भूप्रदेश अन प्रचंड लोकसंख्या(तीही मूर्ख आणि बेशिस्त अन बेफिकिर्,त्याची सुशिक्षीत झलक नरीमन हाऊसला आपन अनुभवलीच आहे) वॉच करायची म्हनजे का खायचे काम आहे?

संजय दत्तकडे सुद्धा दारुगोळा नि बंदुका सापडल्या म्हणे! काय झाले त्याचे? त्याला अटक केली तर लोकांनी तो सुटावा म्हणून सत्यनारायण केले म्हणे. असे जर आपलेच लोक. तर कशाला उगीच कुणि कुणाला नावे ठेवायची? >>>>


अहो , संजय दत्त कन्विक्ट झाला तेव्हा केवळ ति हिन्दू आहे म्हणून त्याच्या शिक्शेविरुद्ध इथल्या प्रचारकानी किती गहजब केला? मुसलमानाना शिक्षा देनारे न्या. कोदे एकदम रामशास्त्री मात्र संजय दत्ताला शिक्शा देनारे न्या.कोदे हिन्दुत्वविरोधी. (आता एटीएएस बद्दलही तशाच कोलान्ट उड्या ).. आम्हाला आवडेल तोच न्याय, विरोधात असेल तर फिजूल अशी यांची मतलबी भूमिका...

आता पोलीसांची अक्कल काढताय पण १९९३ च्या ब्लास्ट्चा यशस्वी तपास केल्याबद्दल जगभराचे पोलीस इथे येउन त्याचा अभ्यास करून गेले त्याबद्दल कुणी इथे कौतुक नाही केले.. कारण संजूबाबा कसा इनोसन्ट आहे याबाबत विव्हळण्यात मग्न होते/होत्या ना..

हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

४८ तास सुरु असलेले दुष्टचक्र शेवटि संपले म्हणायचे.
ताज मधिल अतिरेक्याचा खात्मा करुन भारतिय सैन्याने ,एनएसजी कमांडोजनी मुंबईला वाचवले असेच म्हणायला हवे.
काल शोभा डे पोटतिडकीने या निष्क्रिय सरकारला शिव्यांची लाखोली वहात होती तेंव्हा सहज मनात आल, आता या सगळ्याची आठवण झाली का? का तर तुंम्हा श्रीमंताच्या सगळ्या आवड्त्या जागांचा अतिरेक्यांनी त्यांचे मनसुबे पार पाडण्यासाठी जास्त करुन वापर केला आणि नासधुस केली म्हणुन ?,मुंबई लोकलमधे ११/७ ला जेंव्हा स्फोट झाले होते आणि मध्यमवर्गातली आणि कसे तरी दोन वेळचे पोट भरणारी माणसे अतिरेक्यांच्या भक्ष ठरली होती तेंव्हा कुठे गेल्या होत्या तुमच्या संवेदना.
आज नरेंद्र मोदी मुंबईत येउन गेले आणि १ करोड रुपये विरमरण आलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातेवाईकांना देण्याची घोषणा केली ,(राजकारण करु नये त्यांनी ) आणि गुलछबु विलासरावांना लगेच मिरच्या झोंबल्या.व लगेच त्यांनी प्रतिक्रिया दिली "मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोणी राजकीय फायदा घेवू नये. आणि महाराष्ट्रात येवून कोणीही नाटकबाजी करू नये, असा टोला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लगावला." हिच भाषा उत्तरभारतियांच्या विरोधात व मराठी साठी महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनाच्या वेळेस लालु आणि त्यांच्या चेल्यांना सुनवायला काय वाचा बसली होती की काय या विलासरावांची?
अतिरेक्यांवर विजय मिळवायला अजुन कीती वेळ लागणार अशी विचारणा सगळ्या वृत्तवाहिन्यांकडुन सैन्याच्या अधिकार्‍यांना विचारला जात होता.मला त्यांच्या या प्रश्नाचच हसु येत होत ,ज्या अतिरेक्यांना या हल्ल्याची तयारी करायला ६महिन्याचा कालावधी लागला.मग काहि दिवस अथवा काही अधिक तास त्यांचा खात्मा करायला भारतिय सैन्याला लागत असेल तर आपण वाट बघायला काय हरकत आहे.
जमेची बाजु एकच की या वेळेस व ते फालतू खट्ले आणि मानवाधिकारवाल्यांना व्यथा तोंडसुख घेण्याची संधी आपल्या शुर सैनिकांनी ठेवली नाहि.पार संपवुनच टाकले सगळ्यांना.आपल्या सैन्याच कौतुक कराव तितक थोड आहे.
माझी तर फार इच्छा होती ताज मधिल शेवटच्या अतिरेक्याला भर रस्त्यात भारतिय सैनिकांनी गोळ्या घातलेल्या बघायची .कुणाला हे फार जहाल वाटेल.पण जो पर्यंत अश्या प्रकारच मरण आपल्यालाही येऊ शकत हा संदेश या निर्दयी अतिरेक्यांपर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत त्यांना दहशत बसणार नाही.भारत म्हणजे सहज ,निर्धोक येऊन निरपराधांचे बळी घेण्यासाठी आंदण दिले आहे का या अतिरेक्यांना?
येताजाता जी काँग्रेस कंदहार विमान प्रकरणाचा आणि भाजपा सत्तेत असताना संसदेवर झालेल्या हल्लाच पल्हाळ लावत असते ..........आता मुंबईवर झालेल्या भिषण हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारण्याची तयारी आहे का काँग्रेसची?तरी बर महाराष्ट्रात सरकार देखिल यांचच आहे .आता भविष्यात प्रत्येक वेळेस काँग्रेसला देखिल या हल्यासाठी जबाबदार धरुन कायम आरोप केले जातील तेंव्हा कुठे तोंड काळ करणार आहेत सगळे काँग्रेसी. आज मनमोहनसिंग यांच्या बरोबर आडवाणी मुंबईला आले नाहित यामागे राजकारण दिसतय्?स्वतः कायम अल्पसंख्याकाच लांगुलचालन करण्याच्या नादात मुसलमानांना डो़क्यावर बसवल .आणि ते देखिल केवळ आणि केवळ एकगठ्ठा मतांसाठी ...............बहुसंख्य हिंदुना डावलुन निधर्मिवादाचे फालतु गोडवे गाणार्‍या काँग्रेसला भाजपाला नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार तरी पोहोचतो का?
आताच त्या शकिल अहमद्ला एका वाहिनीवर प्रतिक्रिय देताना बघितल .....काय तर म्हणे आम्ही पाकिस्तानकडे त्यांच्या प्रदेशातील अतिरेक्यांच्या छावण्यां उध्वस्त करण्यासाठी परवानगी मागु?आणि जणु राजरोसपणे पाकिस्तान देणार आहे यांना परवानगी?मुर्ख पणाचा कळस म्हणायला हवा.
काहीही झाल तरी मुंबई थांबत नाही हा संदेश देण्याचा अट्टाहास आणि व्यर्थ कौतुक आता पुरे. .....हे स्पिरिट नसुन आपल्या संवेदना दिवसेंदिवस किती बधिर होत चालल्यात याच लक्षण आहे .........शेवटि देशासाठी आपण आहोत आणि आपल्यासाठी देश आहे हे विसरता कामा नये..........आता सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरुन जनतेच्या संरक्षणासाठी सरकारला भाग पाड्ण्यावाचुन दुसरा पर्याय उरला नाही आता.
हे असले शेपुट घालु नेते करणार आपल रक्षण -http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3770545.cms
अवांतर -मुंबईवर इतका अघोरी प्रसंग ओढवल्यावर मनसे आणि शिवसेना कुठे होती ?असे प्रश्न विचारणार्‍यांनी ह्या पण गोष्टिंची खातरजमा करुन घेण्याचा प्रयत्न जरुर करावा की शहरात भिषण परिस्थिती ओढवली असताना रक्तदान करुन आणि रुग्णवाहिका पुरवण्यात याच दोन संघटना आघाडिवर होत्या. .................

जय हिंद!
जय महाराष्ट्र!

बरोबर लिहिलेस टोणग्या... मी सहमत आहे...... भारत ओवरॉलच मच्युर होतोय, मी तर म्हणतो नेत्यांनी त्यांचा मुर्ख्/गलथानपणा (आणी आजुन बरेच "पणे" आहेत) करत असताना पोलीस, आर्मी, नेव्ही खरच कमेंडेबल काम करत आहेत....... माझ मनमोहन सिंगान विरुद्ध काहीच नाही, पण त्यांच भाषण आयकुन हुरुप वगैरे तर सोडा साधा दिलासा सुद्धा नाही वाटला ईथे बसुन, तिथे लोकांना काय वाटल असेल काय माहीत, किंवा मला तर वाटत भारतीय सामन्य नागरिकाला सवय झालीय आपल आपल बघुन घ्यायची... त्यांना फरकच नसेल पडत कुठल सरकार आहे त्याच...
मोदी सुद्धा, त्यांनी आधीच भांबावलेल्या(?) लोकांना फक्त त्यांच्या यायच कारण आणी गुजरातनी जाहीर केलेली मदत येवढ सांगितल असत तरी चालल असत, पण त्यांना राहावल नाही गेल, येत्या निवडणुकीचा विचार न करुन कसा चालेल्...भले का देशात यादवी का माजलेली नसावी.. नाहीका?

मोदींचं नाटक, विलासरावांचा तमाशा.. काय फरक?? सगळे एकाच माळेचे मणी !!

>>>जो पर्यंत अश्या प्रकारच मरण आपल्यालाही येऊ शकत हा संदेश
दुर्दैवानं अतीरेकी मरणाला तयार आहेत. त्यामुळे ह्या संदेशाचा फायदा नाही.

काल तावातावात एक पत्रकार बाई एका अतीरेक्याला विचारत होत्या, "कुठून आलात? किती दारुगोळा आहे??" वगैरे. तो काय खरं उत्तर देणार होता?? 'निरपराध लोकांचे प्राण घेऊन तुमचं कुठलही उद्दीष्ट साध्य होणार नाही.' हे सांगायचं विसरल्या.

आपल्या देशाच्या नागरिकांसाठी प्राणार्पण करणार्‍या, जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या सगळ्या भारतीय वीरांना मनापासून प्रणाम!

Pages