Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36
मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ताजमधे
ताजमधे थोडं यश मिळालंय. दहशतवाद्यांशी बोलणी चालू आहेत. काही माणसांची सुटका झालीये.
underworld पण आहे यात असं म्हणतायत.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
शस्त्रास्
शस्त्रास्त्र आणि स्फोटकांनी भरलेल्या ४ होड्या जप्त केल्यात कुलाब्याला... ८ किलो आरडीएक्स सापडले....
--

जोपर्यन्त
जोपर्यन्त प्रत्येक जण वैयक्तीक हितसंबंधाना किंमत देतो.तो पर्यन्त असे एकत्र येणे, पोलीस लषरी अधिकांर्यांचे मनोधैर्य वाढविणे वैगेरे केवळ बी बी वर केलीली वायफळ बडबड!!
आपण असे काही घडले की अशी तावातावाने खूप चर्चा करतो!! पण पहा अशी सर्वांनी एकत्र एऊन सुधृड चर्चा अहोणे आवश्यक असतानांही काही जण आपल्या बोलण्यात दांभिकपणा आहे असे म्हणतात... 'काल पर्यन्त ATS ला शिव्या घालणार्यांच्या दृष्टीने ATS आज एकदम हिरो का वाटतात?' असे म्हणणून हिणवितात! म्हणजेच तुमच्या मनात घडलेल्या घटनेच्या दु:खा पेक्षा हेवेदावे महत्वाचे वाटतात!
अश्या ठिकाणीच आपण एकत्र येऊ नाही शकत तर इतरत्र काय येणार?
कधी कधी वाटते की आपले हे सगळे स्मशान वैराग्य! असे काही घडले की आम्ही सामान्य माणसे अशी खुप साधक बाधक चर्चा करतो पण त्याची फल निष्पत्ती काय? नुसते मतदान केल्याने आपाली भ्रष्ट व्यवस्था खरेच बदलेल? मतदान करायला हवे १०० % मान्य पण दानही सत्पात्री असावे असे म्हणतात! आहेत ज्यांना मत द्यायचे ते सत्पात्र? पुन्हा आम्ही असे म्हणू की दगडापेक्षा वीट मऊ असे पाहून मत द्यावे!! अरे पण ह्या दगड वीटा येतातच कश्या इथे? की सगळेच असे लोक आहेत समाजात? अश्या भ्रष्ट गुंड लोकांना मज्जाव का नाही ? कसे राजरोस ते राजपदी येतात? ह्याला कारण पैसा!! आणि त्यावरच सगळे बोलते आणि चालते!! त्यामुळेच सगळे घडते! मग तो मनमोहन असो की लालकृष्ण असो.. लालू असो की मुल्ला असो, माया असो की जया असो सगळेच सत्तेच्या लोभापायी अनेक भ्रष्ट प्रवृत्तीना पदरी बाळगून आहेत! आपल्या नेतृत्वाचा मुलभूत पायाच विसरलेत!
खूप काही लिहलय अजूनही लिहायचय...
मित्रांनो माझी मते १०० बरोबरच असतील असे नव्हे पण जे काही वाटले ते बोललो... ही वेळ वादाची नसून चर्चेची आहे... आणि चर्चेतून काही उपयोगी समोर आणण्याची आहे. तेंव्हा मला वाटते वाद बाजूला सारून एकत्र यावे नाही तर खूप उशीर झालेला असेल!
काही
काही अपडेटस??
आत्ताच्या
आत्ताच्या वृत्तानुसार ताज मधील एकही ओलिस आता राहिलाय नाही...सर्व बंधकांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे...नशीब!!!!!
पण अजुनही ताज मध्ये काही अतिरेकी आहेत आणी ओबेरॉय मध्येही चकमक चालुच आहे!!!!!
*****************
सुमेधा पुनकर
*****************
आत्ताच्या
आत्ताच्या वृत्तानुसार ताज मधील एकही ओलिस आता राहिलाय नाही...सर्व बंधकांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे...नशीब!!!!!
पण अजुनही ताज मध्ये काही अतिरेकी आहेत आणी ओबेरॉय मध्येही चकमक चालुच आहे!!!!!
*****************
सुमेधा पुनकर
*****************
मथळा
मथळा -टाईम्स ऑफ ईंडिया :
We want all Mujahideen released: Terrorist inside Oberoi ..
त्यातील थोड्क्यात बातमी :
"Muslims in India should not be persecuted. We love this as our country but when our mothers and sisters were being killed, where was everybody?" he told the channel by phone from inside the hotel, which is surrounded by army commandos.
"Release all the Mujahideens, and Muslims living in India should not be troubled," he said.
अशावेळी
अशावेळी पोलिसांचे किती हाल होतात ना? कारण सगळेच काही करप्ट नसतात.
माझ्या मैत्रिणिचे काका अत्ता तिकडेच आहेत, त्यांच्या घरच्यांची मनस्थिती खुप वाईट अवस्था आहे.
विजय साळसकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आमचा रस्ता नुसता गर्दीने फुलुन गेला होता. चांगली माणसे उगाच मारली गेली, त्याऐवजी पुढार्यांना मारा ना.
जरा
जरा अवांतर
आत्तच सगळे ई वृत्तपत्र वाचत होतो. शेजारी एक केरळी बसला होता. मी सामना चे पान उघडले आणि वाचत होतो. मधुन मधुन त्याला पण सांगत होतो काय चालु आहे ते सगळीकडे, सामना चे पान बघितल्यावर म्हणाला कि आम्हाला बाळासाहेबांबद्द्ल आदर आहे पन आम्हि त्याना पाठिंबा देउ शकत नाहि हिंदू असुन कारण त्यांच्या विषयी विश्वास वाटत नाहि. कधि आमच्या विरुध्ध कधि यु.पी वाल्याविरुध्ध.
हा हल्ला हिंदूंवर नसला तरी हिंदूस्तानावर आहेच.
हिंदूंना आणि हिंदूस्तानला आता वाचवणे अवघड आहे. तो कोण तो राहिल का कोण त्याने जशी त्यांच्या अतिरेक्याना मदत केली तशि आपण अनिवासी भारतीयांनी अभिनव भारतला वगैरे करायला सुरुवात करावी काय????
यांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय यांची डोकि ठिकाणावर येणार नाहित!!!!!!!!
बातम्या पाहून पाहून डोक खराब झालय.
हा हल्ला
हा हल्ला भेकड मुळीच नाही...
... भारतीयाना आव्हान आहे. त्यानी दाखवून दिले आहे की ते काहिही करू शकतात....
... आणि आपण काही करू शकणार नाही, कारण एकतर लोकशाही आणि दुसरे म्हणजे हिन्दू मानसीकता.
नेहमी प्रमाणे निशेध होइल... बास...
चायला, पकडलेल्या अतिरेक्याला फाशी देण आपल्याला जमत नाही... आपण काय लढणार त्यान्च्याशी?
>>>> मथळा
>>>> मथळा -टाईम्स ऑफ ईंडिया :
) दाखले वकिलपत्र घेतल्याच्या थाटात याच वृत्तवाहीन्या भडक मथळ्यान्मधे पुढे पुढे करुन दाखवतील
आता या मिडियाचे तुणतुणे चालू होईल
हा जो हल्ला झाला, तो म्हणजे अशिक्षित, अडाणी (की सुशिक्षित्?) गरीब बिचार्या मुस्लिम युवकान्च्या सन्तापाचा उद्रेक हे
अन या उद्रेकाला बाबरी ते गुजराथपर्यन्तचे (व हल्ली मालेगावचे!
त्याला विशिष्ठ राजकीय पक्ष साथ देऊ लागतील (की त्यान्च्याच आदेशाने मिडीया अशी हलेल?)
अशा प्रचाराचा धुराळा उडवला की त्यात जनतेच्या मनातले प्रश्न उत्तरे न मिळताच वाहून जातील अशी अपेक्षा, उलट "मी हिन्दू हे" अस म्हणायची लाज वाटावी इतकी हिन्दुन्च्या मनात न्युनगण्ड तयार व्हावा अशी परिस्थिती मिडीया तयार करेल
पूर्वापार हेच होत आल हे, कॉन्ग्रेसचा तर यात हातखण्डा हे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
02:33 PM: Navy helicopters
02:33 PM: Navy helicopters are chasing a Vietnamese registered ship, MV Alpha, which is believed to have dropped terrorists near Bombay. Navy Chief Admiral Sureesh Mehta is closely monitoring the situation.
विलासराव
विलासराव देशमुख कुठे आहेत?
रे
रे हिंदबांधवा, थांब या स्थळी, दोन अश्रू ढाळी..
आपल्या शहीद पोलिस अधिकार्यांना अभिवादन म्हणून एक मेणबत्ती पेटवाल?
http://features.ibnlive.in.com/packages/mumbai-attack-light-a-candle.php
पेटवली गं
पेटवली गं मेणबत्ती. खूप वाईट वाटलं त्या क्षणी. इतक्या लवकर ज्यानीकुणी हे पान बनवलं त्याला आभार.
मी आताच
मी आताच आलो हापिसात.
काल रात्री ३ वाजेपर्यंत बातम्या बघत होतो.
बातम्यांमध्ये थोडी सुसुत्रता नाही.
काल तर ब्रेकिन्ग न्युज होती की ते अतिरेकी ज्या जहाजातुन आले ते जहाज ताब्यात आहे आणि आता मघाशी बातमी होती की ते जहाज पळुन जात आहे. त्याचा पाठलाग सुरु आहे. नेव्ही आणि कोस्ट गार्ड्स वाले त्यांचा पाठलाग करत आहेत. नेव्हीच हेलिकॉप्टर देखील आहे.
माझ्या मते तर विमान पाठवुन ते जहाजच उडवायला हव होत. चैन पडत नाहिये. काय कराव???
काल बातम्या बघताना मध्येच ब्रेकिन्ग न्युज यायला सुरवात झाली की हेमंत करकरे शहीद. मग पाठोपाठ अशोक कामठे आणि विजय साळसकर यांचीही नाव.
ते वाचुन फारच वाइट वाटल.
आपण फार मोठी किम्मत चुकवली. चौदा पोलिस अधिकारी आणि कर्मचारी शहिद झाले आहेत.
अशोक कामठे हे सोलापुरमध्ये फार फेमस झाले होते कारण त्यानीच दंगली नंतर सोलापुर मध्ये कायद्याचा धाक ठेवला होता.
त्यांचे पोस्टर उगाच नाही रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवजा दुकानात देखील अजुनही.
विजय साळसकर हे एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जात होते.
ह्या तीन ऑफिसरना गमावणे ही तर माझ्या मते फारच मोठी किम्मत आहे.
ती न्युज वाचुन मनात एकच विचार आला. "fXXk those bastards"
बाकी पोलिस साध्या बंदुका आणि सर्वीस रिवोल्वर किंवा पिस्तुल ह्या सहीत (ते ही समोर एके ४७ असताना) त्या हॉटेलात घुसले.
हे चांगल म्हणाव की वाइट हे कळत नाही. पण हे करण्यासाठी फार मोठ डेअरिन्ग लागत. त्याना माझा सलाम.
खरंच... हेमं
खरंच...
हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामठे ही खूप मोठी किंमत आहे...
विश्वास नांगरे पाटील ताज मधे गेल्याचं आणि जखमी झाल्याचं ऐकलं.. पण पुढे काही कळलं नाही...
रिअल लाईफ हीरो आहेत ही मंडळी... त्यांना सलाम....
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
ऑफिसात
ऑफिसात बसून काहीच कळत नाहीए.

सकाळपासून http://idesitv.com/nepal.php
ही लिंक पहातेय, ऑडिओ डिव्हाईस नाहीए त्यामुळे काही कळत नाहीए. फक्त इथे लिहील्या जाणार्या अपडेटस मिळतायत.
वरच्या लिंकवर कामटेंची अंतयात्रा दाखवतायत.
लेटेस्ट बातमी काय आहे?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
04:25 PM: Loud explosion has
04:25 PM: Loud explosion has been heard outside Taj Hotel.
03:54 PM: Third grenade blast has been reported from the Trident Hotel (Oberoi).
03:15 PM: Two grenade blasts have been heard from Trident hotel.
मुंबई -
मुंबई - मुंबईवर हल्ला करणारे दहशतवाद्यांनी बोटींमधून मुंबईत प्रवेश केल्याची माहिती उजेडात आली असून कराचीवरून आलेल्या एमवी ल्फा जहाजातून या बोटी मुंबईच्या समुद्रात उतरविण्यात आल्याच संशय व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय नाविकदला आणि कोस्ट गार्ड च्या जवानांनी संयुक्तरित्या राबविलेल्या मोहिमेंतर्गत एमवी अल्फा या जहाजावर ताबा मिळविला असून जहाजावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
मिळवला
मिळवला ताबा? दॅट्स गुड!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
आता पकडून
आता पकडून गेलेले जीव परत येणार आहेत का? जे व्हायचं होतं ते झालंच की...
इतकी स्फोटक सामग्री घेऊन कुणीतरी जलमार्गे येतं आणि पत्ता लागत नाही?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरळ हल्ला
सरळ हल्ला करावा आता पाकवर आणि जो भूभाग जिकून घेऊ तो परत देऊ नये आता तरी!
आता पकडून जरी कोणी परत येणार नसलं तरी पकडल नाही तर त्यांच बलिदान व्यर्थ जाईल.. पकडून अशी अद्दल घडवायला हवी, की कायमची जरब बसेल आणि परत असले किडे करायची हिंम्मत होणार नाही!
ते जहाज
ते जहाज कल्प्रीट नाही अशी बातमी ऐकु आली आहे
पण आत्ता
पण आत्ता सगळ शांत झालय का?
येथे दुबईत बसुन तिथल काहीच समजत नाही आहे.
असं का?
असं का? म्हणजे ही चकवेगिरी झाली..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या़
माझ्या़ कडून या सर्व शहीदांन्ना ही नम्र पण "तेजस्वी" श्रद्धांजली:
इथे कोण मेला, कुणी घात केला?
माणसातला माणूस सम्पला
पुन्हा श्वापदाचा ठेचा रे जहरी डंख
तुमच्या बलिदानाचे द्या आम्हा अग्निपंख!
का शिवबांनी खेळली स्वराज्य रक्त होळी
किती भगत सिंघान्नी फुंकली आयुष्ये कोवळी
खेळा क्रांतीचे तेच पुन्हा बसंतीरंग
तुमच्या बलिदानाचे द्या आम्हा अग्निपंख!
वृथा "ताज" "सेतू" चा बढीवार सारा
जाती धर्मात बाटला कैवार सारा
नसानसातून उसळू द्या रे अस्मितेचे मलंग
तुमच्या बलिदानाचे द्या आम्हा अग्निपंख!
किती धर्मांधांचे किती रोग झाले
निष्पाप माणसांचे किती भोग झाले
छेडा रे आता एक तूफानी जंग
तुमच्या बलिदानाचे द्या आम्हा अग्निपंख!
इथे लाचार द्रौपदी अन पांडवांचे राज्य षंढ
मतांध चक्रव्यूहात जळे अभिमन्यूंचे बंड
उद्वीग्न रणदुंदूभीचे वाजवा रे केशव-शंख
तुमच्या बलिदानाचे द्या आम्हा अग्निपंख!
अजून कोणता भास काबूत आहे?
उलटला तरी देव शाबूत आहे?
आयुष्याची गड्या असते आपलीच जंग
तुमच्या बलिदानाचे द्या आम्हा अग्निपंख!
कुठे डोळ्यात जळे शेंदूर आहे
कुठे दुव्यात कबीराचा यल्गार आहे
राखेस शहीदांच्या तरी नसे रंग
तुमच्या बलिदानाचे द्या आम्हा अग्निपंख!
हा वणवा असाच उरात राहु द्या रे
ही राष्ट्रज्योत आता डोळ्यात तेवू द्या रे
दगडातूनी चेतवा रे राष्ट्रप्रेमी अभंग
तुमच्या बलिदानाचे द्या आम्हा अग्निपंख!
या दिव्य शहीदांचा नको शोक आता
ना"पाक" पावलान्ना तरी रोक आता
हो मुखाग्नी तयांचा हिमालयी सुरूंग
तुमच्या बलिदानाचे द्या आम्हा अग्निपंख!
Groups behind attacks based
Groups behind attacks based outside India: PM
November 27, 2008 17:04 IST
In a televised address to the nation, Prime Minister Manmohan Singh [Images] said that those behind the terror attack in Mumbai were from outside India
He promised that: "We will take the strongest possible action. We'll take a number of measures to strengthen our security forces."
___________________________
Which groups ??? where outside ???

No guts to take name ??? or voting calculation ???
कुठे
कुठे डोळ्यात जळे शेंदूर आहे
कुठे दुव्यात कबीराचा यल्गार आहे
राखेस शहीदांच्या तरी नसे रंग
तुमच्या बलिदानाचे द्या आम्हा अग्निपंख! >>
अंगावर काटा आला वाचताना ......
त्या
त्या विलासरावाला,मनमोहनला,आबा पाटलाला आधी काढाव्.आबाने तर काल रडायचच बाकी ठेवल होत.अरे काय चाललय काय आपल्याकडे??????ताज किंवा ओबेरॉयच्या छतावर हेलिकॉप्टरनी जवान का उतरवले गेले नाहीत???इतका वेळ का लागतोय या ऑपरेशनला???आपण अशा प्रकारच्या हल्ल्याचा सामना करायला अजिबात तयार नाही हे स्पष्ट होतय.होस्टेजेसही ठेवलेले नाहीयेत्,सकाळीच जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याने आम्हाला होस्टेजेस नकोयेत आम्ही फक्त मारण्यासाठी आलोय हे सांगितलय्.पोलिसांच्याच गाड्या दहशतवाद्यांनी पळवल्या. हे पोलिस काय जनतेच रक्षण करणार???
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
Pages