धन्यवाद!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

अनिलभाई, परदेसाई, वैद्यबुवा, स्वाती_आंबोळे, असामी, सागर (माणूस्), सिंड्रेला, अंजली भस्मे, आश्विनी साटव, रुनि पॉटर, केदार, एबाबा, वृंदा, प्राचि, सायली कुळकर्णी, पराग सह्स्त्रबुद्धे, व माझे भारतातील मित्र श्री गुरुदास बनावलीकर आणि श्री रवी उपाध्ये,

या सर्वांना स. न. वि. वि.

आम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल हार्दिक आभार. बर्‍याच जणांनी दोन दोनदा शुभेच्छा देऊन आमची दिवाळी दुप्पट आनंदाची केली याबद्दल धन्यवाद.

या वर्षी मुलगा, मुलगी व जावई आले होते. चिवडा, लाडू, तिखटमिठाचे भाजून केलेले शंकरपाळे, शेव, बाकरवडी व मराठी विश्वाकडून मिळालेली बर्फी, सुरळीच्या वड्या, रगडा पॅटिस, Lasagna, चायनाग्रासच्या खरवसासारख्या दिसणार्‍या गोड वड्या, असे बरेच पदार्थ होते.

भाउबीज, पाडवा मिळून मुलीला बर्‍यापैकी कमाई झाली!

मी ठरल्याप्रमाणे सौ. च्या हातात क्रेडिट कार्डांनी भरलेले पाकीट ठेवले!

आता हॅरी पॉटर चा नवीन सिनेमा येणार, त्यासाठी उजळणी म्हणून हाफ ब्लड प्रिन्स परत एकदा बघितला.
डेथली हॉलो वाचून झालेच आहे.

भारतातील सौ.च्या बहिणींशी सर्वजण गूगलवर व्हिडीओ कॉन्फ. करून बोलले.

आनंदी आनंद गडे. असाच लोभ असू द्यावा.

पुनश्च धन्यवाद.

विषय: 
प्रकार: 

झक्की काका,
तुमची चिवडा-लाडू इ. पारंपारिक + गूगलवर व्हिडीओ कॉन्फ. असलेली 'high-tech' दिवाळी वाचून छान वाटलं.
आमची पण दिवाळी, दिवाळी पार्टी मजेत झाली.
सिम (प्राची), वृंदा, एबाबा.