माझ्या ऑफिसातल्या रांगोळ्या

Submitted by साधना on 4 November, 2010 - 10:14

दिवाळीनिमित्त माझ्या ऑफिसातल्या विविध ब्लॉक्स मधल्या कलाकार मंडळींनी आपापली हस्तकला सादर केली, त्याची ही एक झलक...

१. तांदुळ रांगोळीच्या रंगात रंगवुन ही रांगोळी घातलीय -

२. मिठ रांगोळीच्या रंगात रंगवुन ही रांगोळी घातलीय -

३. ह्या सगळ्या फुलांच्या रांगोळ्या

४. ह्या आपल्या नेहमीच्या. काही साध्या, काही संस्कारभारती डिजाईन्स

५. आणि यात बाजी मारुन गेला हा मोर. आणि सोबत बक्षिस घेऊन त्याच्या निर्मात्या.

मोबाईलवरुन फोटो काढल्याने काही फोटो नीट आले नाहीत. तरीही मुळ रांगोळी इथे देण्याचा मोह आवरला नाही म्हणुन टाकलेत.

गुलमोहर: 

सुंदर.
साधना, ह्यातली एखादी रांगोळीची कल्पना घेतली तर चालेल का? आज संध्याकाळी काढायचा विचार आहे. मला सांग.

वॉव, मोराची रांगोळी काय भन्नाट आलीये. बाकीच्या सगळ्या पण मस्त आहेत. तू कुठली काढली आहेस का ह्यातली?

सगळ्याच रांगोळ्या सुंदर. पहिल्या दोन आणि मोराची जबरीच. फुलांच्या रांगोळ्यांची रंगसंगतीही छान आहे.

अहाहा!! फुलांच्या आणि तंदळाच्या पिठाची अशा सगळ्याच रांगोळ्या देखण्या आहेत. मोर अफलातून!

मस्त आज संध्याकाळी ह्यापासून स्फूर्ती घेऊन काढते रांगोळ्या. मला तो आपला चार बाय चार वाला आकाश कंदीलच येतो.

येकदम भारी .:-)
मामी- मला पण तो एकच आकाशकंदिल येतो. Proud
एकवेळ सर्वतारी पाक जमतील पण रांगोळी आणि शिवण जमेल असे वाटत नाही.

Pages