टीम इंडीया
टीम इंडीया
टीम इंडीयाला झालेय तरी काय?
असे आपण मालीका हारल्यावरही ऐकतो व जिंकल्यांवरही. सध्याची भारत वि इंग्लंड मालीका आतापर्यंत ४-० ने आपण खिशात टाकलीच आहे पण त्यापुर्वी ऑस्ट्रेलियाला २-० ने टेस्ट मध्ये हरविले. ऑस्ट्रेलियाच्या दौर्यात आपण २-१ ने हारलो पण वन डे सिरिज जिंकली.
२००७ च्या इंग्लड मधील नॅट वेस्ट सिरिज नंतर आपला वल्ड कप सोडला तर आपला संघ बर्याचदा जिंकतोय. ते ही कमाडिंग विन्स. असे असतानाच श्रिलंका सिरिज येते व हि वाघ असलेली टिम त्या काळ्या वाघांसमोर शेळी सारखी ढासळते. मी इथे त्याचं विश्लेषन करनार नाही, कारण मला ऍनॅलिस्ट म्हणून पैसे मिळत नाहीत.
पण ह्या सामन्यांमध्ये एक विचीत्र गोष्ट नेहमी दिसतेय ती म्हणजे नविन गोलंदाज हे प्रतिस्पर्धी खेळाडुंना त्यांच्या बॉल वर फटका मारता आला नाही की हमखास शिव्या देताना आढळतात. प्रतिस्पर्द्यावर दवाब टाकन्यासाठी देहबोलीचा वापर नेहमीच होत असतो. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ह्या टिम मैदानावर सारख्या चिव चिव करत असतात पण आधी श्रिशांत आणी आता इशान शर्मा, झहिर खान त्यापुढे जाऊन दर बॉलला बॅट्समनला खुन्नस देत आहेत. ह्याची मला एक क्रिकेट रसिक म्हणून काहीही आवशक्ता वाटत नाही. बॉल टाकने जसे त्यांचे काम, तसेच त्या बॉल्सवर रन काढने हे प्रतिस्पर्ध्यांचे काम. मग ह्यात बॉल त्याला खेळता आला नाही तर खून्नस का द्यायची? सध्या चालू असलेल्या सिरिज मध्ये दर हे दरवेळी जास्तच दिसते.
ऑस्ट्रेलिया पॉन्टींग च्या नेतृत्वाखाली असेच करते पण थोड्या वेगळ्या स्टाईलने. त्यांचा माज आता उतरत आला आहे, पण असा नेहमी माज दाखवने बरा नाही असे सामान्य क्रिकेट रसिक म्हणून मला आपले नेहमी वाटत राहते. कधी कधी तो दाखवने योग्य असतो जसे गंभीरला डिवचल्यामूळे त्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूची खोडी काढली. पण दर वेळी?
लिडरशिप, बिनधास्तपण हवाच पण त्याला सोबत खेळाडूवृत्ती ही हवी. ऑस्ट्रेलियन्स तसे करत होते म्हणून आपणही तसे करू हे मात्र चूकीचे. निवड समितीने ह्याची नोंद घेउन वेळीच खेळाडुंना सावरले पाहीजे नाहीतर टि ट्वेन्टी मध्ये जसे भज्जीने श्रिसंथ ला जसे शांत केले तसे कोणीतरी आणखी कोणाला तरी शांत करेल व आपल्या टिमचा पाकीस्थान होन्यास वेळ लागनार नाही. (पाक खेळाडू एकमेकां सोबत मारामारी करतात), त्यामूळे वेळीच सावध झालेले बरे.
आगामी तिनही मॅचेस मध्ये जिंकन्यासाठी टीम इंडीयाला शुभेच्छा.
हो मी
हो मी क्लिप्स पाहिल्या त्यात जरा जास्तच स्लेजिंग चालले आहे, ते ही इंग्लंड विरुद्ध! ज्या तर्हेने झहीर, इशांत बोलिन्ग करत आहेत त्याला आणखी काही करायची गरजच नाही. त्यातही एक महत्त्वाचे म्हणजे काही खेळाडू तसे करून आपला फोकस वाढवतात (वॉ मुद्दाम तसे करायचा) तर काहींचा असलेला जातो.
मला वाटते पूर्वी इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे लोक भारत दौरा असला की विशेष इंटरेस्ट ने खेळत नसत कारण त्यांच्या करिअर मधे त्याला काही महत्त्व नसे. तसे आपल्या लोकांचे लंकेत झाले असावे. पूर्वी लंकेत चांगले खेळत व ऑस्ट्रेलिया, पाक, इंग्लंड विरुद्ध काही करत नसत, त्यापेक्षा हे बरे
मला वाटते
मला वाटते की ही एक 'फेज' आहे. ही नवी आक्रामकता मुख्यतः धोनीच्या नेत्रुत्वामुळ निवळेल.आपल्याला अजुन अशी दणकेबाज टीम बघायची सवय नाही त्यामुळेही कदाचित विचित्र वाटत असेल.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल