गुप्तहेर

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग २

Submitted by रुद्रसेन on 29 March, 2024 - 03:50

उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता. रस्त्यावरून चाकरमान्यांची कामाच्या ठिकाणी जायची लगबग चालू होती. सकाळी अगदी नऊच्या सुमारास या बागेमध्ये लहान मुले आणि बिनकामाचे म्हातारेकोतारे लोक फेरफटका मारायला येत. त्यातले काही आपापल्या नातवांना घेऊन येत तर काही म्हातारे पाय मोकळे करायच्या नावाखाली मुलांच्या किंवा मुलींच्या संसारातील कागाळ्या एकमेकांना सांगायला येत असत. बाग तशी खूप मोठी होती. दुपारी १-४ काही तास बंद असायची आणी सकाळी ६ वाजताच उघडायची. आजसुद्धा बागेमध्ये बऱ्यापैकी लहान मुले आणी म्हातारी माणसे यांची गर्दी होती. सकाळचे कोवळे उन जाऊन आता त्याची जागा कडक उन्हाने घेतली होती.

विषय: 

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग १

Submitted by रुद्रसेन on 25 March, 2024 - 13:32

आढ्याला करकर आवाज करत फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत आपल्या दोन्हीही तंगड्या टेबलावर ठेवून रॉबिन आपल्या खुर्चीमध्ये रेलून बसला होता. दोन्ही हात डोक्यामागे बांधून शून्यात पाहत असल्याप्रमाणे तो वर फिरणाऱ्या पंख्याकडे मलूल पणे पाहत होता. त्याचा समोरच्या टेबलावर टेलीफोन, चहाचा कळकट कप आणि सिगरेटची काही थोटके रॉबिनप्रमाणेच मलूल पडलेली होती. तसं पाहायला गेलं तर या छोट्याशा घरात रॉबिन एकटाच राहत होता. मागे झोपायची एक खोली तिथे एक बेड, कपाट, त्याला चिटकुनच न्हाणीघर आणि पुढे हॉल मध्ये एक टेबल आणि २ खुर्च्या काही लोखंडी पेट्या एवढाच काय तो ऐवज होता.

विषय: 

द स्पाय अँड द ट्रेटर - बेन मॅकिंटर

Submitted by टवणे सर on 26 January, 2019 - 21:11

शीतयुद्धाच्या चरमकाळात सोविएत आणि नाटो राष्ट्रात एकमेकांबद्दल टोकाचा अविश्वास होता. नाटो राष्ट्रांसाठी सोविएत रशियात हेर वा डबल एजंट चालवणे जवळजवळ अशक्य होते. केजीबीची सरकार तसेच समाजावर मजबूत पकड होती. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये देशांतर्गत व देशाबाहेर काम करण्यासाठी स्वतंत्र सरकारी यंत्रणा होत्या. जसे अमेरिकेत एफबीआय व सीआयए, इंग्लंडमध्ये एम.आय.५ व एम.आय.६ (भारतात आयबी व आर अँड ए.डब्ल्यु.). मात्र सोविएतमध्ये केजीबीच सर्वेसर्वा होती. केजीबी निरंकुशदेखील होती.

विषय: 

खाजगी गुप्तहेर

Submitted by स्पॉक on 13 May, 2013 - 04:25

आमच्या घरी झालेल्या चोरीबददल माहिती काढणे आणि पुरावे शोधणे यासाठी मुंबई - नवी मुंबईतील विश्वासू आणि प्रामाणिक खाजगी गुप्तहेर व्यक्ती / संस्थांची माहिती हवी आहे.
माबोवर कुणी कधी खाजगी गुप्तहेराची मदत घेतली असल्यास तुमचे अनुभव लिहा.
सरकार प्रमाणीत (govt approved or registered) खाजगी गुप्तहेर असतात का? असल्यास त्यांची यादी कुठे बघावी?
Double Cross करण्याचा धोका किती असतो? फसवले गेल्यास ग्राहक कायद्यानुसार दाद मागता येते का?
असे खाजगी गुप्तहेरामार्फत माहिती काढणे / पुरावे गोळा करणे भारतात कायदेशीर आहे का?

विषय: 

पुण्यातल्या डिटेक्टिव एजन्सी संदर्भात माहिती हवी आहे

Submitted by विनम्र on 8 November, 2011 - 22:28

पुण्यातली कुठली डिटेक्टिव एजन्सी माहीत आहे का? चांगला अनुभव आहे का?
दोन्ही पैकी काहीही असल्यास कृपया लवकरात लवकर उत्तर द्याल का?
संपर्कातून माहिती कळवलीत तरी चालेल.

मदतीकरता धन्यवाद!

~ गरजू

विषय: 
Subscribe to RSS - गुप्तहेर