'मायबोली गणेशोत्सव 2023

लेखन उपक्रम -३-●■●- अज्ञानी

Submitted by अज्ञानी on 27 September, 2023 - 08:06

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच... त्याने सर्वकाही पुन्हा चार्जिंगला लावले. गेल्यावेळेस अचानक सहल जाणे रहित झाल्याने सर्वच बेत फसले होते. म्हणून आता कुठलीच रिस्क नको होती. सर्व काही वेळेवर आणि वेळेनुसार घडणे ह्यावरच सर्वकाही अवलंबून होते. अन्यथा उद्या ह्या वेळेला त्याचं इतरांसाठी असलेले अस्तित्व शून्य होणार ह्याची त्याला खात्री होतीच.

लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे - अज्ञानी

Submitted by अज्ञानी on 26 September, 2023 - 05:42

ह्यावर खुप काही ऑलरेडी बऱ्याच जणांचे सांगून / लिहून झालंय तरीही नव्याने आता काय असा प्रश्न सुद्धा मनात न डोकावण्या इतपत - स्त्री असणं म्हणजे.... ह्या एका अर्ध्यवाक्याचं पोटेंशिअल आहे. स्त्री म्हणजे काय हा मुळात प्रश्न न बनता कायम कौतुकाने उद्गार वाचक वाक्य बनेल तेव्हा खऱ्या अर्थाने समानता आली असे मी म्हणेन. स्त्री पुरुष भेदभाव शास्त्रीय विचारसरणीच्या लोकांसाठी निसर्गाने आणि श्रद्धाळू लोकांसाठी देवाने केलेला असताना आपण त्यात हे असेच का वगैरे उहापोह करत खांद्याला खांदा लावण्याची शर्यत करण्याचा अट्टाहास का करायचा.

चित्रकला उपक्रम - १- छोटा गट- चंद्रयान - माऊमैया - राधा भगत

Submitted by माऊमैया on 25 September, 2023 - 21:19

माझ्या ७ वर्षाच्या लेकीने काढलेले चित्र. चंद्रयानाच्या बातम्या सुरु झाल्यापासून , बऱ्याचवेळा घरी कागदावर चंद्रयान उतरलंय. हे खास माबोकरांसाठी---

चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चंद्रयान - sonalisl - विराज

Submitted by sonalisl on 25 September, 2023 - 08:09

लेखनस्पर्धा १: 'स्त्री असणं म्हणजे…' - वंदना

Submitted by वंदना on 23 September, 2023 - 15:29

स्त्री असणं म्हणजे चा थोडक्यात प्रवास.

स्त्री असणं म्हणजे असणं.

स्त्री असणं म्हणजे, माहितच नसणं.

मुलगी असणं म्हणजे थोडं वेगळं दिसणं.
वेगळं असलं तरी मुलगी असणं मजेचंच असणं.

वेगळेपणाची जाणीव वाढणं पण तरी काही तक्रार नसणं.

अचानक एका दिवसात "मोठं" होणं. आता मात्र जाणिवांचा आणि भावनांचा न थोपवता येणारा पूर. हा देवाचा/निसर्गाचा शुद्ध पक्षपात आहे. आय हेट बीइंग गर्ल अँड यु कॅन नॉट चेंज माय माईंड.

स्त्री असणं म्हणजे कटकट, इनकन्व्हिनियंस.
स्त्री असणं म्हणजे अनेक इनकन्व्हिनियंसची सवय करून घेणं.

लेखन उपक्रम २ : ललाटरारा - स्वाती आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 23 September, 2023 - 11:33

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.

ती तिथेच दिसली ‘दो नंबर पर’ त्याच घड्याळाखाली
चोरट्या अधाशी भेटी जेथे घडल्या कोण्याकाळी
आणाभाकांना साक्षी ‘मनहर कहानियाँ’चा ठेला
दोघांमध्ये शेअर झालेला ‘चाय गरम’चा पेला

आठवले सारे तिचे तगादे ‘लग्न करूया’वाले
थोपवताना नाकी नऊच का, अठराही आलेले
स्लो लोकल स्लोअर होत होत मग पार बॅकला गेली
अन् ‘दो नंबर पर आनेवाली’ फास्ट ट्रॅकला गेली

विषय: 

लेखन उपक्रम २ - साथ - आशिका

Submitted by आशिका on 21 September, 2023 - 07:52

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

विषय: 

लेखनस्पर्धा १: 'स्त्री असणं म्हणजे…' - स्वाती आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 September, 2023 - 15:28

'टायटॅनिक'मधली केट विन्स्लेटने साकारलेली रोज आठवते?

विषय: 
Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  2023