भावे सर

भावे सर

Submitted by वावे on 3 July, 2023 - 01:14

एप्रिल १९९८. माझी नववीची परीक्षा संपली. ही सुट्टी काही खरीखुरी सुट्टी नसतेच. मी आणि माझ्याच वयाची मुंबईची माझी आतेबहीण दहावीला शंभर गुणांचं संस्कृत घेणार होतो. माझी जांभूळपाड्याची आत्या संस्कृत शिकवायची. त्यामुळे सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी आम्हा दोघींची रवानगी तिच्याकडे झाली. जांभूळपाड्याची आतेबहीण आमच्यापेक्षा एकच वर्षाने लहान. तिघींचा मस्त कंपू जमला. अभ्यास आणि मौजमजा एकत्रच होऊ लागली. अधूनमधून अभ्यास, बाकी दिवसभर टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकणं, अखंड गप्पा मारणं, बॅडमिंटन, पत्ते, संध्याकाळी टेकडीवर किंवा समोरच्याच पाली-खोपोली रस्त्यावर फिरायला जाणं यात दिवस भराभर जायला लागले.

Subscribe to RSS - भावे सर