कविता

निवडुंग

Submitted by अज्ञात on 14 May, 2012 - 00:29

रुतल्या कोर-कपारी दारी
अगणित वांछा संसारी
निवडुंग कुंपणी मी तैसा
चाकरी करी खडकाळ तिरी

निश्चल काटेरी खोड असे
माळल्या विशाखा संभारी
राखणे देखणे बहुतांचे
अंकीत होतसे सहज उरी

निरपेक्ष साधना जन्मभरी
जड देह उभा; जळ गाभारी
अवकाळहि माझा काळ नसे
मी चिरंजीव तव दरबारी

...............अज्ञात

गुलमोहर: 

"आई''

Submitted by विभाग्रज on 13 May, 2012 - 08:57

बंद डोळ्यांआडून,
ती चोहीकडे पाही
सदा पुढे-मागे असे
तिचे नाव आई!

ठेच बाळा पायी
सल तिच्या ठायी
दुवा जिची दवा तिची
तिचे नाव आई!

बाळ जरी कापे
केसाने तिचा गळा
सुख चिंती बाळा
तिचे नाव आई!

जिवनाचे सार
अक्षर दोन "आई''
ब्रम्हांडाचे सार
तिचे नाव ''आई''!

गुलमोहर: 

Facebookवरचे आयुष्य

Submitted by प्रसाद पासे on 12 May, 2012 - 09:33

Facebookवरचे आयुष्य

मनातल्या भावना आता "Wall" वर लिहितो
मित्रांची दाद आता "comment"तून घेतो
Facebook वर आता आयुष्य जगतो

"Profile picture" कपड्यासारखा बदलतो
मित्रांना फोटोतून "Tag" करतो
Facebook वर आता आयुष्य जगतो

बोलतानाही "sms language" वापरतो
मित्रांशी Whts up करत "Chat" करतो
Facebook वर आता आयुष्य जगतो

आवडलेली गोष्ट एका बटनावर "Like" करतो
मित्रांशी गोष्टी एका बटनावर "Share" करतो
Facebook वर आता आयुष्य जगतो

प्रसाद पासे

गुलमोहर: 

सिंदबाद मी.

Submitted by मकरन्द जामकर on 11 May, 2012 - 14:17

सिंदबाद मी.

मकरंद जामकर .
११-०५-१२

येणार मी , जाणार मी ,
थांबेन तरी , कसा मी ,
जन्मोंजन्मी प्रवासी मी ,
जसा तो, सिंदबाद मी .

फकीर, बेफिकीर मी ,
प्रवाही ,बेदरकार मी ,
जगलो जगती या मी ,
कधी न रमणार मी .

नात्यागोत्यात न मी ,
यार दोस्तात न मी ,
भिजलो जरी लाख मी,
आत कोरडा ठप्प मी .

गस्त मृत्यूची ,पाहतो मी ,
मनी आपल्या, हसतो मी ,
त्यागीले वस्त्र , ते आत्म्यांनी ,
"मृत्यू"स तसा,समजतो मी .

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गाथा

Submitted by आरसा on 11 May, 2012 - 06:23

ओठांनी टिपले ओठ
कायेने स्पर्शली काया
गोठली स्पंदने सगळी
जन्म सांडला वाया.

भांडलो उभ्या जगण्याशी
जगण्याचे भांडण झाले
आकर्षण होते हरण्याचे
जिंकणेच नशीबी आले

थकले ऊर्मींचे गाणे
ओठात वाजते शीळ
जाळला सुंभ हाताने
तरीही न सुटेना पीळ

किती युगे जाहली न कळे
आठवणही उरली नाही
गोठलो सुकलो जरीही
पाणी तरीही वाही

गुलमोहर: 

येऊ का?

Submitted by suneha on 11 May, 2012 - 03:13

नमस्कार, मी अमुक अमुक,
व्यावहारिक जगात येतेय,
प्रामाणिक प्रयत्न करतेय.....
पण, हा प्रामाणिकपणाच आड येतोय.
खूप ताकदीनं, शक्तीनं त्याला दूर ठेवून येतेय.

चाणाक्षपणा, चतुराई, कावेबाजपणा
विकत आणलेत,
वेगवेगळ्या भावनांचे मुखवटे
काय महाग झालेत! पण आणलेत.
पण, डोळे? ते गोंधळलेत
पाणी न येण्याचं - आनंदाचं असो वा दुःखाचं,
औषध घेऊन यायला सांगतायत.

बेफिकिरी, निर्विकारपणाचे कोट, अन
निर्लज्जपणाचा सदरा सेलमधून आणलेत.
चांगले जाड अस्तराचे बघून.
पण, त्यातूनही टोचणारया, सलणाऱ्या जाणीवा....?
बोथट होण्याचा इलाज मागतायत.

पण मी येतेय, येण्याचा प्रयत्न करतेय .....

गुलमोहर: 

शीण थोडा घालवू या

Submitted by निशिकांत on 11 May, 2012 - 02:33

पेलले ओझे, जिवाचा
शीण थोडा घालवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

जे घडावे ते न घडले
प्राक्तनाचा खेळ सारा
भोगला होता किती तो
भावनांचा कोंडमारा
जिंकली आहे लढाई
चल तुतारी वाजवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

चैन म्हणजे काय असते
हे कुठे माहीत होते
पोट भरण्या घाम आणी
कष्ट हे साहित्त्य होते
भोगले अन्याय जे जे
चल जगाला ऐकवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

वेदना भोगीत चेहरा
नाटकी हसराच होता
मुखवट्याच्या आत दडला
तो कुणी दुसराच होता
लक्तरे शोकांतिकेची
चावडीवर वाळवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

दोन असतिल फक्त नोंदी

गुलमोहर: 

अमर प्रेम

Submitted by मोहन वैद्य on 11 May, 2012 - 00:47

ह्रुदय तुझे न चोरले मी ग, तेच आले माझिया दारी
नाही कसे म्हणू त्याजला, अतिथी तर असे ईश्वरी

गोरे गोरे हात तुझे ग गुम्फू दे माझिया हातात
तो अनुराग तुझा विरघळू दे माझ्याच प्रणयात

गन्ध तव केसान्चा अजुनही धुन्द तो मज करी
मनी तरुण रात्र अजुनी जरी वये गाथली उत्तरी

दे अधर अधरी आणि जगास तू स्तब्ध करी
नसे स्तब्ध तसे ते उमलले रोमान्च शरीरी

देह मीलनाहुनी असे मनोमीलन सुन्दर
एक रूप होउ तु मी जसे प्रक्रुतीपरमेश्वर

गुलमोहर: 

लक्ष्मी

Submitted by manohar vibhandik on 10 May, 2012 - 13:34

सायंकाळी
दारं उघडी ठेवल्यावर
आताशा
लक्ष्मी येत नाही, तर
मुसंडी मारून भसकण
डासच घुसून येतात
घरात !
कष्टकर्‍याच्या शोधात
आता
फिरत नाही लक्ष्मी
पहाट्पासण
घराघरात डोकावून पहात!
मध्यरात्री केव्हां तरी
बार मध्ये
जावून
सफरीतल्या साहेबाला
फ्लाईंग किस देवून येते
लक्ष्मी !!

गुलमोहर: 

संयम आणि मोह (अष्टाक्षरी)

Submitted by निंबुडा on 10 May, 2012 - 05:09

संदर्भ - संयम आणि मोह

सख्या तुझ्या आठवणी
बघ किती बदमाष
फिरी येती मनामधे
जरी तोडले मी पाश

मग घेतले लावून
घट्ट कवाड काळाचे
वरतून घातले मी
जड टाळे संयमाचे

तरी चुकार सयांना
कुठे संयमाची क्षिती
फटीतून इवल्याश्या
पहा सरकत येती

मग होतो थोडा मोह
थोडे घेते गोंजारून
आत धाडते तयांना
पुन्हा त्याच फटीतून

तुझ्यापरी बदमाष
बघ तुझ्या आठवणी
फटीआडून पाहती
मला मिश्किल डोळ्यांनी

मोठ्या संयमाने तरी
मग फिरवते पाठ
पुन्हा वळायचे नाही
मन बांधे खूणगाठ

मोह आणि संयमाचे
अवरोह नि आरोह
बघू कोण आता जिंके
माझा संयम की मोह

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता