काव्यधारा

संतोष

2.jpg

साहीत्य चोरां पासुन सावध रहा ...

२ दिवसांन पुर्वी मी ऑर्कुटवर मरठी कविता ही कम्युनीटी जॉईन केली.. बर्‍याच वर्षा पुर्वी मायबोलीवर लिहीलेली कविता आज मी तिथे पोस्ट केली.

आईच्या कविता-१

ध्यास

इट्ट्ल इट्टल म्हनता, मन पार येडं झालं
ध्यास लागला नामाचा, मन खुळावून ग्येलं
हितं तितं सारीकडं, दिसे इट्टल सावळा
झाडा पाना फुलामंदी मज भासाया लागला

वाटे साजिरी फुलांनी, करू पूजा या द्येवाची

मनपाकळ्या

वेचीत पाकळ्यांना ह़ळुवार सांज झालि,
शोधित त्या फुलांनां विरहात रात्र गेलि.

वंदना

Vandana.jpg

असंच खरडलेलं....

मागची काही वर्षं जरा depression मध्ये गेली.
मी कदाचित कोणी कवयित्री नाही. पण अशाचं मनःस्थितीत असताना ,एका दिवशी (२००२ साली), काहीतरी खरडलं होतं. ते लिहीत आहे.

बोथट झालेल्या जाणिवांना
एकदा चांगली धार लावूया म्हाटलं.

चवथरा तुझा-माझा

तु भेटावीस म्हणुन रोज याच चवथर्‍यावर येतोय
तु भेटशील नक्की असे तो चवथरा देखिल म्हणतोय

तिच रात्र अन तोच तुज्या आठवणीचा दिवस
तु नक्की परत येशील असे तेच भाबडे नवस

तुजा विरह आत मला सहन होत नाही

प्रवास अज्ञाताचा

शब्दच का ?
नाही माहीती विचारही-
येती पटलावर कुठूनसे,.........
हा प्रवास अज्ञाताचा
मी वाटसरू,..........
खेळणे कुणाचे जाणत नाही,.......
रेखतो रेष येणारी,........
आकार शोधतो; अर्थ तोच त्याचा

घालतो हात काळजास कधि-
आकाश पिंजतो,....
न कळे कशास सारे,....

सावलीस सावली पोरकी

कुशीत ज्या खेळले बाळपण
बागडली अंगाई
साहवे न वार्धक्य तिचे
बघ जीर्ण जाहली आई

तोच जिव्हाळा तीच माऊली
खंड त्यात नाही
निश्पर्ण वृक्ष वठलेला जणु
मन-उरात लाही लाही

सुरकुतलेला स्पर्श गात्र थकलेली,
परि उधाणलेली माई

वेंधळा

आकाश चांदण्यांचे
रवि-चंद्र तिथे आहे
अवसेस का पसारा
ओहटी मागतो आहे

शत रंग जिवाच्या पुनवेला
फेसात वाटतो आहे
परतून वाट येताना
वाळू सवे आणतो आहे

हा वारकरी भजनात दंग
भवभान विसरतो आहे
रत्नाकर अवघा ओंजळीत
प्राणास शोधतो आहे