कविता

पण तुझी आठवण येते

मी उगमुन शिखरावरती
सागरात मिसळुन गेले
वाटेत किनार्‍यावरती
मन अगणित जागी रमले

अडवून कुणी वा मजला
बांधावर रोखुन धरले
मी भिजवुन हिरवी राने
शेतातहि फिरून आले

कधि असे वाटले इथेच मी थांबावे
अंगणात कल्पतरू, घर मनभर बांधावे....

मुळात सारे असुनी

पंखहि माझे माझी ईर्षा
पिले उडाली गगनी
आकाशाची निळी पोकळी
भरली ओल्या सदनी

स्वप्नामधली तुम्हीच आशा
सजविण्यास ही अवनी
कितीही मारा उंच भरारी
पहा एकदा वळुनी

मेघ म्हणाला मी ही एकला
माझी तीच कहाणी
भरकटलो हरवलो लक्ष तरी घरी

कायापालट.....

घाव स्वताचे अभिमानास्तव मिरवत गेले
हाल भोगले स्वताच आता गिरवत गेले...
तीर तटीचे उभ्याउभ्या बावचळुन गेले
पाणी नदीचे रंग हजारो बदलत गेले...
जो आला तो रमला येथे रहाता झाला
नवे नकाशे जुन्या वेशींना हाकलत गेले...

उगीचच..

कधी कधी आपण सगळ्या मिळून,
नुसत्या हसत राहतो खदाखदा..
उगीचच, कशावरही,
किंवा कशावरच नाही बहुधा.
खदखदून हसत राहतो आपण सगळ्याजणी..
डोळ्यात पाणी येतं, तरीही हसत राहतो.
हसता हसता रडत राहतो,
कि रडता रडता हसत असतो?

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय (बालगित)

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय

नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी.व्ही. पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

भेसूर

ती एकटीच सांभाळे
क्षण रमलेला तो जीव
पोटात उगवलेला अंकुर
कंठात भुकेला सूर

नियतीचा नर थिजलेला
हरवला मेघ अतिदूर
डोळ्यात शुष्क अवसेचा थर
ओसंडुन गेला पूर

चोचीस मिळे दाणा पण
मन घर उधाणलेले काहूर
एक मोकळा मुजोर

प्रीत माझी.....

प्रीत माझी ग तुझ्यावरी, अव्यक्त जरी पण अमोल खरी
आठवता तुज भरती लोचन, काळीज होय हे खालीवरी

दीस घालवले जे तुझ्यासावे, काढीती नयनातुनी आसवे
एक तू अन दुजा तो श्रावण, ह्रदयावर पडती प्रेमसरी

हमामा

हरएक शिल्प घडलेच कसे
उत्सुक एकांत सुदामा
जाळ्यात अडकते मन अवघे
संम्मोहित मी रामा

चण निसर्गदत्त लतेसम ही
वात्सल्य उरी मुक्कामा
डोळ्यात मदन कमनीय रती
काळीज विदारे कामा

स्वर हळवा व्याकुळ सुमनविकल
घायाळ इंद्र निजधामा

वरमाप

उजेडास ना ताप
नाही अंधाराचा व्याप
स्फटिकजळाचे मेघ
तयांना मदनाचा उश्शाप

थिजून गेले वारा वादळ
श्वासांवर निष्पाप
भिजलेल्या अंगास शहारा
स्वर्गाचे वरमाप

.................अज्ञात
१२६६, नशिक

कधी वाटतं...

कधी वाटतं सालं आपलं नशीबच खडतर
सात मैलात अडचणी सत्तर.

कोणत्याही कार्याची सुरुवात शंकरपटागत दणक्यात असते...
पाठराखणीची प्रत्येक आरोळी
थोडी डोक्यात, थोडी अंगात,
रोमारोमात भिनत जाते.

मन वेगावर असतं स्वार..