निसर्ग

चंद्रग्रहण अनुभूती: हा खेळ सावल्यांचा!

Submitted by मार्गी on 8 September, 2025 - 08:26

नमस्कार! काल रात्रीच्या चंद्रग्रहणाचा अनुभव अविस्मरणीय होता. सुरूवातीला ढग आणि पाऊस! त्यामुळे "संपेल ना कधी हा खेळ (ढगांच्या) सावल्यांचा" असं वाटत होतं. चंद्राला आधी ढगांचं ग्रहण लागलं होतं. दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलरसह आम्ही मित्र तयार होतो. पण ढग होते. ढगात असतानाच चंद्र पृथ्वीच्या उपछायेत जाऊन ग्रहणाची सुरूवात झाली. पण सूर्य इतका तेजस्वी आहे की, तो अंशत: झाकला गेला तरी चंद्राच्या तेजात लक्षात येईल असा फरक पडत नाही. नंतर जेव्हा चंद्राने पृथ्वीच्या मुख्य सावलीत प्रवेश केला (सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या आड गेला) तेव्हा मात्र चंद्राची कडा काळी झालेली दिसली. पण सतत ढग होते.

शशक - २ - गरुड-भरारी -सामो

Submitted by सामो on 2 September, 2025 - 13:07

कथा सर्वांना परिचित अशी आहे. मी फक्त शशक मध्ये मांडलेली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकर्‍याला एकदा गरुडाचे पिल्लू सापडते. तो कोंबड्यांच्या कळपात सोडतो. गरुड वाढू लागतो, कोंबड्यांसारखाच चालू लागतो, दाणे टिपु लागतो. पण त्याला नेहमी वाटत रहाते - अन्य कोंबड्यांसारखा आपल्याला का नाही कलकलाट करता येत, आपल्याला का नाही दाणे टिपायला आवडत, कसली बेचैनी सतत आपल्याला जाणवते.

विषय: 

सुगंधित श्रावण

Submitted by पुरंदरे शशांक on 25 August, 2025 - 02:26

सुगंधित श्रावण

टपटपणारी पहाटवेळी देठीची पोवळी
झिरमिळ भाळी शुभ्र पाकळी गंधखुळी कोवळी

शुभ्रतुर्‍यांनी लगडून गेली पाचूची पैठणी
सजली कुंती दरवळणारी धुंदगंध देखणी

जुळ्या सावळ्या जाईजुईही रोमांचित साजणी
रातराणी ती सांडून देई भुईवरती चांदणी

शुभ्र तलम पाकळी लवलवे हिरव्या पानातूनी
गुच्छ अवतरे सोनटक्याचा करांजुळी उघडुनि

अवखळ श्रावण घेई गिरकी रेशिमसा न्हाऊनि
चमकून खाली उन्हे पहाती मेघ बाजू सारुनी

श्रावण पक्षी

Submitted by पुरंदरे शशांक on 13 August, 2025 - 01:30

श्रावण पक्षी

हलके हलके पानांवरती
थेंबांची ती नाजुक नक्षी
सरसर सरसर झाडांवरती
बरसत येतो श्रावण पक्षी

घनघन घनघन निळ्या आकाशी
अवचित येता मेघ अंबरी
झळझळणार्‍या रवी करांनी
पात उजळते मस्त बिलोरी

सळसळणारे शिवार थबके
क्षणात वाजे झरा खळाळी
भिरभिरणारी रंगबिरंगी
फुलपाखरे सोनझळाळी

खुळावणारा निसर्ग सारा
फिटे निराशा उदासवाणी
लवलवणारे मानस डोले
मिटूनी डोळे अंतर्यामी

पावसाच्या आठवणी - जुन्या माबोवरून

Submitted by फारएण्ड on 27 July, 2025 - 10:15

जवळजवळ १८ वर्षांपूर्वी जुन्या माबोवर लिहीलेला हा लेख नवीन लोकांनी वाचावा म्हणून जसाच्या तसा पुन्हा कॉपी केला आहे. ती लिंक आहे पण आता तेथे नव्याने प्रतिक्रिया देता येत नाहीत.
----
मूळ लेख १७ जुलै २००७

शब्दखुणा: 

भाग दुसरा: मुंबई स्पिरिट : एक मौल्यवान पैलू !

Submitted by मीस्वच्छंदी on 26 July, 2025 - 02:24

२६ जुलै २००५, मुंबई,

भाग पहिला: वीस वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी ...

Submitted by मीस्वच्छंदी on 26 July, 2025 - 02:19

२६ जुलै २००५, मुंबई.

दुपारच्या चहानंतर बातम्या येऊ लागल्या की कुठे कुठे पाणी भरतयं, लोकल्स उशिरा धावतायत (लोकल्स म्हणजे तेव्हा तरी मुंबईची जीवनवाहिनीच होती). तोवर दिवसभर आत एसीत बसून कॉम्पुटरमध्ये डोकं खुपसलेल्या आम्हाला बाहेर कोसळणाऱ्या पावसाची सुतराम कल्पना नव्हती. पटापट सगळं आवरून लॉग ऑफ करून खाली येऊन बघते तो, आज जो तो बस पकडण्याच्या घाईत होता. रस्ताभर कंपनी बसच्या मोठ्या रांगा लागलेल्या. मी ही माझी नेहेमीची बस हेरून सीट पटकावली. हां हां म्हणत काही मिनिटांतच बस भरून, निघाली सुद्धा.

दक्षिण मुंबईतील एक रम्य पहाट ! - (फोटोसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 July, 2025 - 19:56

दक्षिण मुंबईतील एक रम्य पहाट !

श्रावण पाळत नसलो तरी गटारी पाळत असल्याने ती साजरी करायला माहेरी गेलो होतो. शनिवारी रात्रीच कार्यक्रम सुरू झाल्याने रात्रभर जागरण झाले होते. मुले उशीराच झोपली, पण मी पहाटेपर्यंत जागाच होतो. डोळ्यावर झोप नाही त्यामुळे कधी एकदा उजाडते आणि मी पावसाळ्यातील थंडगार वातावरणाचा फायदा उचलत पहाटेचे दवबिंदू टिपायला घराबाहेर पडतो असे झाले होते. दर दोन मिनिटांनी किती उजाडले आहे याचा अंदाज घ्यायला खिडकीबाहेर डोकावणे चालू होते.

साधारण पावणेसहा वाजता असे उजाडू लागले आणि....
हा पहिला फोटो टिपला.

विषय: 

श्रावण आला...

Submitted by ऋतुराज. on 25 July, 2025 - 13:00

श्रावण आला....

Screenshot_20250725_222755_WhatsApp.jpg

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

विषय: 
शब्दखुणा: 

कविता

Submitted by Santosh zond on 25 July, 2025 - 01:28

चिखलाच्या वलयात फुलते,चिखल कधी होत नाही
काट्यांच्या विळख्यात खिळते,निखळ कधी होत नाही
कमळ फुलाच्या पाकळ्यांवर
चंद्र होऊन साचते कविता,
पानवेलीच्या धुंद कळ्यांवर
पाऊस होऊन नाचते कविता,
आयुष्य देही कुरुक्षेत्रावर
कर्ण् होऊन गाजते कविता,
निरागस जिवाला लागल्यावरती
आई होऊन याचते कविता,
चिखलाच्या वलयात फुलुन,काट्यांच्या विळख्यात खिळुन कधीही संपत नाही कविता,
माती होऊन मातीत रुजते,पुन्हा पहाटे फुलते कविता.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग