निसर्ग

नेपाळ - निसर्गाचा रुद्रावतार

Submitted by बेफ़िकीर on 27 August, 2026 - 05:21

'चालू घडामोडी' ह्या सदरात धागा निर्माण करू शकलो नाही.
=====

नेपाळमधील फोटो, व्हिडीओ सगळ्यांनी पाहिले असावेत. क्षणार्धात होत्याचे नव्हते होताना दिसत आहे. असेही उडत उडत कोठेतरी वाचले की चीनने काहीतरी जाणूनबुजून केले. खरे खोटे माहीत नाही. पुराचे परिणाम बिहारपर्यंत पोचले आहेत. अश्या संकटसमयी काही दुष्प्रवृत्ती उफाळून येऊ शकतात. निसर्गाच्या रौद्र रूपाचा गैरफायदा घेऊन लुटालूट होऊ शकते.

बसेस, ट्रक, मोटारी वाहून चालल्या होत्या. एक पूलही वाहून गेला. भारताचे शंभरएक पर्यटक संपर्काच्या बाहेर असल्याचे समजते. १५७ माणसे मेली असे कळले. भारताने शक्य ती मदत पुरवण्याचे आश्वासन दिले.

विषय: 
शब्दखुणा: 

जिवती

Submitted by Mugdha Deole on 14 August, 2026 - 05:42

श्रावण नुकताच सुरू झाला होता.

पुण्याच्या आकाशात सकाळपासूनच ढगांची गर्दी होती. खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या गार वाऱ्याबरोबर ओल्या मातीचा मंद सुगंध घरभर पसरला होता.

किचनमधून मीराचा आवाज आला.

"अनन्या, जरा स्टोअररूममधली ती तपकिरी पेटी देशील का गं?"

लॅपटॉपसमोर बसून ऑफिसची मीटिंग अटेंड करत असलेली अनन्या थोडी वैतागली.

"आई, आत्ताच का? पाच मिनिटांत देते."

"हो हो, आधी तुझं काम कर."

मीराने सहज उत्तर दिलं.

हीच त्यांच्या नात्याची खासियत होती.

मीरा सल्ला द्यायची, सांगायची, समजावायची; पण आग्रह करायची नाही.

शब्दखुणा: 

मुंबई निसर्ग निर्मित नाही!

Submitted by मार्गी on 26 July, 2026 - 09:06

✪ कोळी व आगरी वस्ती असलेला ७ बेटांचा समूह
✪ हॉर्नबी वेलार्ड प्रोजेक्टअंतर्गत पुलांद्वारे सर्व बेटं जोडली गेली
✪ वाळूचे भराव, बांध व तटबंद्यांद्वारे समुद्राचं पाणी अडवलं गेलं
✪ १७८३ मधील प्रकल्पानंतर १८५० च्या सुमारास मुंबईला एकसंघ रूप
✪ वाळू आणि पाणथळ जमिनीवर मुंबई उभी!
✪ मुंबईचा खरा सत्ताधीश समुद्रच!

शब्दखुणा: 

साप घुशी येती घरा||

Submitted by mi_anu on 21 July, 2026 - 06:38
Snake,cat, rodents

भल्या पहाटे(म्हणजे 7.45 ला) वर्क फ्रॉम होम दिवस.
अचानक नवरा जोरजोरात हाका मारायला लागला.नेहमी अश्या हाका ऐकू आल्या की मी पळत जाऊन बेसिन च्या कपाटावरचं लाल हिट काढते, पळत जाऊन ते ओरडणाऱ्याच्या 2 फुटावर ठेवून पळत पळत दुसऱ्या खोलीत पलंगावर पाय वर ठेवून बसते.(इतकं करून पण पालींना देवाने भिंती, छतावर चढण्याचं माझ्याकडे नसलेलं स्किल दिल्याने भीती असतेच.)

El Niño

Submitted by अनन्त्_यात्री on 20 June, 2026 - 04:00

यक्ष विरहार्त झाले
मेघ संपावर गेले
"संप बेमुदत त्यांचा"
El Niño ने म्हटले

"ज्यांचा टँकरचा धंदा
त्यांचे भाग्य उजळले
दुवा देतील ते मला"
El Niño ने म्हटले

पाणी नभीचे आटले
पाणी डोळ्यात दाटले
"पाणी तोंडचे पळेल"
El Niño ने म्हटले

"पावसाळी कवितांचे
बाण तुझ्या भात्यातले
यंदा गंजणार नक्की"
El Niño ने म्हटले

विषय: 

सांगावा

Submitted by अनन्त्_यात्री on 22 May, 2026 - 23:56

दऱ्या खोऱ्यांनी धाडला
काल हिरवा सांगावा
सांग शहरात आता
जीव कसा हा रमावा

हिर्व्या सांगाव्याची भाषा
ओढे सुसाट बोलती
बिजलीच्या मशालीने
रानवाटा उजळती

ढग एकटा चुकार
बघ ओथंबून आला
धरणीला चुंबताना
त्याचा तोल पार गेला

बेड्या अभेद्य पायात
विसरण्या दोन दीस
जिंदगीच्या लोखंडाला
लावू हिरवा परीस

विषय: 

पक्षीनिरिक्षण - निळे पक्षी! (बर्ड्ज इन ब्ल्यू!)

Submitted by वर्षा on 19 May, 2026 - 22:13

पक्ष्यांमध्ये निळ्या रंगाच्या पक्ष्यांचे आकर्षण मला जास्तच आहे. कारण नक्की सांगता येणार नाही कदाचित पण मुंबईसारख्या शहरात रंगीबेरंगी म्हणण्यापेक्षा बोल्ड कलर्स ल्यालेले पक्षी तसे कमी दिसत. अगदीच नाहीत असं नाही अर्थात कारण, सोनसळी रंगाचा हळद्या, पिवळे-लालभडक पॅच असलेला तांबट किंवा हिरवेगार पोपटही घरबसल्या दिसत आणि नेत्रसुखद वाटत. त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी पाहिले गेलेले मोर, किंगफिशरही परिचयाचे, पण ते सोडल्यास निळ्या रंगाचे पक्षी झाडावर बसलेत, असं काही कधी मी पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांचं मला आजतागायत विशेष सुप्त कौतुक आहे.

शब्दखुणा: 

सुट्टीतलं शिबिर- आनंदाचे डोही आनंद तरंग!

Submitted by मार्गी on 13 May, 2026 - 14:27

✪ एक, दोन, तीन... “बाय!”
✪ थक्क करणारी मुलं आणि त्यांचा उत्साह
✪ निसर्ग रहस्ये उलगडणार्‍या व मुलांची "नस जाणणा-या" डॉक्टर स्नेहलताई
✪ किडे, वनस्पती, पानं, खेकडे अन् काजव्यांचं अद्भुत जग
✪ मुलांसोबत मोठ्यांचं लहान होणं आणि शिकणं
✪ पुस्तकवेडे आणि हॅरी पॉटरचे भक्त गण
✪ खजिन्याचा शोध आणि सोबत केलेली धमाल
✪ चंद्र- सूर्य, तारे आणि दोन गुरू
✪ “तुमच्यासाठी पण आईस्क्रीम आहे!”
✪ अविस्मरणीय जोडसाखळी, विष- अमृत आणि लंगडी

शब्दखुणा: 

सुपर एल निनो - भारतात यावर्षी पाण्याचे संभाव्य दुर्भिक्ष

Submitted by राज अज्ञानी on 22 April, 2026 - 20:46

सुपर एल निनो : इतिहास, विनाश आणि २०२६ चा धोका

सुपर एल निनो म्हणजे काय?
सामान्य एल निनो सर्वांना माहीतच आहे. एल निनो हा एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) चक्राचा भाग आहे. जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाणी असामान्यरित्या गरम होते, तेव्हा एल निनो उद्भवतो. तापमान वाढल्यामुळे वातावरणीय अभिसरणाचे नमुने बदलतात, मान्सून प्रणाली कमकुवत होते, उष्णतेच्या लाटा तीव्र होतात आणि खंडांवर पाऊस पुनर्वितरित होतो. (कंसात सोपे मराठी शब्द दिले तर काहींना ते एआय वाटतं Happy )

शब्दखुणा: 

भारतातील शेती - समस्या, उपाय आणि अनुभव

Submitted by उपाशी बोका on 22 April, 2026 - 14:19

साधना यांचे शेती याविषयी लिहिलेले अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद वाड्यावरून वाहून जातात. म्हणून एक स्वतंत्र धागा सुरू करत आहे. इथे शेती संदर्भात साधना यांचे प्रतिसाद एकाच ठिकाणी मिळू शकतील आणि शेतीविषयी समस्या, उपाय आणि अनुभव यांची सर्वांना चर्चा करता येईल.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग