ऑब्स्टकल एंड रुट मार्च झाल्यावर एक दिवस आमची रिटन टेस्ट झाली, मुल्की कायदे, सीमावर्ती राज्यांची संस्कृती, अर्थकारण इत्यादी विषयांचे पेपर्स झाले, नाही म्हणले तरी ती एक परीक्षाच होती, आजवर शिकवलेले सारे विषय फारच नवीन वाटत होते कारण जास्ती करून आम्ही ह्या सब्जेक्ट लेक्चर मधे डोळे उघडे ठेऊन झोप काढायचो.
वेपन्स मधे आम्ही आता बऱ्यापैकी निपुण झालो होतो 9 mm, ए के 47 तर आता आम्ही जणु तोंडपाठ केले होते, एका मिनिटात हत्यार खोलणे जोड़णे वगैरे खेळ पुढे सुरु झाले होते, ते झाले तेव्हा डोळ्याला पट्टी बांधून वेपन चे स्पेयर ओळखणे वगैरे ची प्रैक्टिस करत होतो. वेपन मधे ज़रा जम बसता सुरु झाले, ते मॅप रीडिंग. नकाशे, त्याचे वेगवेगळे प्रकार कंटूर मैप्स, ऑपरेशनल मैप्स, वेगवेगळी लेजेंड्स इत्यादी चा आमचा अभ्यास सुरु झाला होता.
अकादमी ने पहिल्या एका आठवड्यात काही केले असेल, तर ते म्हणजे आम्हाला सॅंड पेपर ने घासल्यागत चकाचक केले!! एव्हाना 3 आठवडे झाले होते , खच्चुन फिजिकल करूनही आजकाल संध्याकाळी स्पोर्ट्स ला बाहेर काढले तरी काही वाटत नसे आम्ही खुशाल बास्केटबॉल वॉलीबॉल वगैरे खेळत असु.त्या तीन आठवड्यात आमची अंगदुखी बरीच आटोक्यात आली होती पण आता नवीन प्रॉब्लेम सुरु झाला होता, पहिल्या आठवड्या नंतर. बघायला अतिशय मनोरंजक पण शिकायला खुप जास्त डिमांडिंग तो म्हणजे "ड्रिल".
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायला लागलो तेव्हा चोवीस वर्षांचा होतो. प्रस्तुत अनुभव कथन हे अगदी सत्य असुन माझ्या सेवाशर्ती अन केंद्रीय कर्मचारी नियमावली च्या निर्देषांना अनुसरुन मी काही नावे अन जागा वगळतो किंवा बदलतो आहे तेवढे फ़क्त मायबाप वाचकहो सांभाळुन घ्यावे इतकी विनंती करतो अन माझ्या अनुभवांना कथा रुपात पेश करतो.
अकादमी भाग 1: एंट्री