अवांतर

प्रोजेक्ट प्रोमेथिअस - स्पेस हाईस्ट!

Submitted by राज अज्ञानी on 28 July, 2026 - 14:20

टीप - एका बैठकीत वाचता आले नाही तरी पुढच्या वेळी शोधणे शक्य व्हावे यासाठी भाग पाडले आहेत.

भाग १: गूढ सिग्नल

वर्ष २०४५.

कॅनडाच्या बर्फाच्छादित जंगलांमध्ये वसलेल्या अपेक्स-आर या अथांग रेडिओ टेलिस्कोप डिशवर रात्रीचा गडद अंधार पसरला होता. बाहेर उणे २० अंश सेल्सिअस तापमान होते, पण कंट्रोल रूममध्ये मात्र वातावरण प्रचंड तापले होते.

विषय: 
शब्दखुणा: 

"जेन झी आंदोलन - इन्स्टा रील्स" Like, subscribe & Share

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 July, 2026 - 18:27

या जेन झी आंदोलनाला घरबसल्या तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर यांच्या एकेक धमाल रीळ बघा आणि फॉरवर्ड करा. एवढे केले तरी देशात क्रांती झालीच म्हणून समजा.
आणि यात तुमचे मनोरंजन होईल ते वेगळेच. कारण काय एकेक धमाल आहेत..
काही क्रिएटिव्ह.. काही इमोशनल.. काही सुखावणारे.. काही फुल हॅपनिंग.. काही अरे आता आपण तिकडे असायला हवे असे वाटणारे.

आणि हो या बघितल्या की वेगळ्या न्यूज चॅनेल बातम्या बघायची काही एक गरज नाही. आजच्या तारखेला रियल मीडिया हाच आहे Happy

विषय: 

शेवटच्या प्रवासाचा सन्मान ......

Posted
3 आठवडे ago
शेवटचा प्रतिसाद
3 आठवडे ago

आपल्या समाजात मृत्यू हा आजही निषिद्ध विषय आहे. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर अनेकदा रुग्णापेक्षा त्याचे नातेवाईक अधिक अस्वस्थ, गोंधळलेले आणि अपराधीपणाच्या भावनेत अडकलेले दिसतात.

याच कारणामुळे "उपचार" आणि "उपचारांचा अट्टहास" यामधला सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा फरक अनेकदा लक्षात येत नाही. काही वेळा उपचारांमुळे रुग्णाला जगण्याची संधी मिळते; पण काही वेळा ते केवळ मृत्यू काही दिवस पुढे ढकलतात आणि त्या बदल्यात रुग्णाला अधिक वेदना, अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यात आर्थिक ओझे, भावनिक ताण आणि "लोक काय म्हणतील?" ही भीतीही निर्णयांवर परिणाम करत असते.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

महाराष्ट्रात SIR

Submitted by केशवकूल on 6 July, 2026 - 06:17

महाराष्ट्रात SIR सुरु झाले आहे का?
मी असे ऐकले आहे कि पुण्यात SIR प्रोसेस सुरु झाली आहे. ह्या बद्दल कुणाला काही माहिती आहे का?
हे आर्टिकल वाचा
https://thewire.in/labour/maharashtra-blo-whatsapp-groups-sir-details-vo...
Overworked and With Very Little Time, Some Maharashtra BLOs Are Collecting SIR Details Through WhatsApp Groups
आणि माझ्याकडे मोबाईल नाही, कसे होणार?

फक्त प्रौढांसाठी असलेले - Adult content मुलांनी बघायची इच्छा व्यक्त केल्यास तुम्ही काय करता?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 June, 2026 - 13:45

फक्त प्रौढांसाठी असलेले - Adult content मुलांनी बघायची इच्छा व्यक्त केल्यास तुम्ही काय करता?

विषय: 

भूत : एक शोधगाथा

Submitted by सदा_भाऊ on 29 June, 2026 - 01:38

प्रत्येकाच्या मनात भूत या कल्पनेबद्दल अनामिक भीती आणि कुतूहल लपलेलं असतं. लहानांपासून थोरांपर्यंत कोणीसुद्धा याला अपवाद नाही. जगभरातील सर्व संस्कृतींमध्ये नक्की सापडणारी गोष्ट म्हणजे “भूत”. नुसत्या शब्दोच्चारानेच मनात कुठेतरी भीतीची लाट उत्पन्न होते. आपल्या पूर्वजांनी घाबरून “भीती” हा शब्द उच्चारताना तो “भूत” असा उमटला आणि “भूत” हा शब्द तयार झाला, असा एक न सापडलेला शोध. लाखो पुस्तकं, कथा या भुतांवर लिहिल्या गेल्या आहेत. कदाचित देवापेक्षा मोठा वाचकवर्ग या भुतांचा असावा.

विषय: 
शब्दखुणा: 

मुंबई लोकल ट्रेन मर्डर

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2026 - 13:46

ज्यांना अजून बातमी ठाऊक नाही त्यांना थोडक्यात सांगतो

मंगळवारी रात्री चर्चगेट-नालासोपारा लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात मुसळधार पावसादरम्यान दरवाजा बंद ठेवण्याच्या वादातून साधारण २१-२२ वर्षीय युवकाची एका सहप्रवाशाने भर ट्रेनमध्ये चाकूने भोसकून हत्या केली. मृत मयंक लोहार हा विरार येथील रहिवासी होता, तर आरोपी रोशन सुवर्णा हा मीरा-भाईंदर येथील रहिवासी आहे.

विषय: 

नाभिका रे

Submitted by सदा_भाऊ on 24 June, 2026 - 02:01

सामान्यतः केस वाढल्याची जाणीव इतरांना प्रथम आणि स्वतःला शेवटी होते. बायको, मुलं किंवा मित्र जेव्हा यावर भाष्य करतात तेव्हा आपल्याला नाभिकाची आठवण होते. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातील सर्वात कंटाळवाण्या दोन घटना, त्या म्हणजे दाढी आणि केशकर्तन! या घटना पुढं ढकलता येतात पण टाळता येत नाहीत.

विषय: 
शब्दखुणा: 

अचानक जमून आलेले पुणे गटग

Submitted by हेमंतकुमार on 7 June, 2026 - 01:45

फेब्रुवारीतील पुणे गटगच्या धाग्यावर दोनच दिवसांपूर्वी ऋतुराजने आठवण काढली होती की पुढचे गटग कधी?
योग कसा असतो बघा . . .
आज सकाळी अचानक ध्यानीमनी नसताना ३ मायबोलीकर आणि ३ मायबोली वाचक यांचे सुरेख गटग पुण्यातील बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर जमून आले. . .
WhatsApp Image 2026-06-07 at 10.50.08 AM.jpeg

फोटोतील मायबोलीकर अनुक्रमे हेमंतकुमार, मोहना आणि DJ........
आणि
आपल्या वाचकांसह :

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर