आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं स्वातंत्र्य म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य; आणि सर्वात मोठी शिक्षा म्हणजे त्या निर्णयांचे परिणाम भोगणे.
खरं सांगू? माझ्या मते सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते म्हणजे निर्णय घेणे. प्रत्येकाच्या आयुष्यात रोज काहीना काही निर्णय घ्यावेच लागतात. काही छोटे असोत वा काही मोठे. आपापल्या कुवती प्रमाणे आपण निर्णय घेतच असतो. निर्णय घेताना गोंधळून जाणे हा मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे, पण तरीही आपण निर्णयापासून पळ काढू शकत नाही. तो काही ना काही घ्यावाच लागतो. कधीकधी निर्णय न घेणे हा पण एक प्रकारचा निर्णयच आहे.
(बॅकग्राउंडला 'टिन-टिन-टिडिन्ग...' ऐवजी जुन्या इंटरनेट मॉडेमचा 'किर्रर्र-पी-पी-चू-चू' असा आवाज येतो.)
स्टुडिओमध्ये झगमगते दिवे नाहीत, तर दोन ट्यूबलाईट लुकलुक करत आहेत. अनभिषिक्त अतिरिक्त-अभिनेते आणि शोचे होस्ट 'तात्या तोफखाने' एका चकचकीत निळ्या सूटमध्ये (ज्यावर चमकी चिकटवलेली आहे) एंट्री घेतात.
तात्या तोफखाने: (अतिशय गंभीर आणि बेस आवाजात)
१. 'मोहब्बतें'
इष्क आणि दहशत ह्यात अंतिम विजय कशाचा ?
प्रश्न गंभीर आहे. डेंजरस क्वेश्चन टू आस्क.
गुरूकुल नामक देशातली एक टॉपची शिक्षणसंस्था. एखाद्याला तिथून काढून टाकले की नंतर कुठेच प्रवेश मिळणार नाही. शाखा तीन-चार सर्वश्रेष्ठ विद्यापीठांच्या ऑफर्स धुडकावत गुरूकुलात येतो. ॲजे म्युझिक टीचर. किंवा इष्काचा संदेश घेऊन आलेला प्रेषित. शिकवण त्याची साधी सरळ आणिक सोपी. आपापल्या दिलाचं ऐका. जा, प्रपोज करा, इष्क करा, मझा करा. ढिले पडू नका. पार पिच्छा पुरवा तिचा. शाखाच्या गाठीशी 'डर'चा अनुभव आहे.
माझं जीवन म्हणजे एक खुला ग्रंथ आहे, असं गांधी म्हणाले होते. माझं जीवन हा एक मोठा जोक आहे, असं मी मानतो.
साधारण पस्तीस वर्षांपासून सुरू असलेला हा लांबलचक जोक सहन करण्याबद्दल एखादा ॲवॉर्ड असेल तर माझ्या नावाची घोषणा करायला हरकत नाही. म्हणजे मला तो पटकन नाकारता येईल.
१. काय करावं बरं आता? ही संध्याकाळ कशी कुठे घालवावी? खरंतर एकूण आयुष्यच कुठे कसं घालवावं? असे च्युतिया टाईपचे विचार यायला लागले की पटकन एखादी विधायक कृती करून टाकणं बरं राहतं. म्हणून मग दाढी करायला गेलो.
तर सलूनचं शटर अर्धं खाली ओढलेलं. वाकून आत गेलो. शटर ओढण्याचं कारण नंतर सलूनवाल्यानं बोलताबोलता सांगितलं, "तिथं पलीकडं देशी दारूचा गुत्ता है. तिथले बेवडे संध्याकाळच्या टायमाला इथं येऊन आरशापुढं भांग पाडत उभं राहतेत. जरा काय बोलायला गेलं तर लगीच भांडायला लागतेत. कोण नादाला लागणार? पेल्यावर लोकं बादशाह झाल्याले असतेत."
दिवसभर राब राब राबायचं.
सकाळपासून नदीच पाणी आण, सडा शिंप, झाडलोट, गुरांना वैरण, दूध काढणे अंगण सारवणे
15 माणसांचा स्वयंपाक चहा नाश्ता
धान्य निवडणे, जात्यावर दळणे
लसूण, गवार भाज्यां निवडणे
अशी हजार कामं संपता संपत नाहीत.
त्यातून जिवाला वाईच विरंगुळा म्हणून बीटाऊन मधल्या बाया अशा एखादीच्या घरी सुखदुःखाच्या गप्पा करताना...
नवरे यायच्या आत..

१. बॉर्डर-२. कामावरच्या लोकांनी जबरदस्तीनं नेलं म्हणून बघितला. साडेतीन तासांचा पिक्चर. जीव आंबून गेला. कायबी दाखवलंय. बिदागीच्या मानानं सनी देवलला लैच पिदवून घेतलंय ह्यांनी. लैच काम करून घेतलंय. थकलंय ते सनी देवल. चालताना डक माराय लागलंय. आराम करू द्या त्येला आता. कशाला उगाच तेच्या म्हाताऱ्या हाडांना त्रास देता?
२. दोन दिवस कोकण ट्रिप. मुरूड. सुवर्णदुर्ग. आंजर्ले.
मुक्काम एका लॉजमध्ये. गादी पार सपाट झालीय. ह्या गादीवर आजवर किती जणांनी कार्यक्रम केला असेल काय माहित.!
एक नवीन खेळ खेळूयात. एक सिच्युएशन असेल आणि त्या सिच्युएशन मधे तुम्ही काय कराल किंवा तुमची प्रतिक्रिया काय असेल ? असा प्रश्न विचारायचा. त्याच्या वर उत्तरे येऊ द्यायची. जेव्हां तो प्रश्न जुना होईल तेव्हां कुणीही तसाच प्रश्न विचारायचा. असा खेळ चालू ठेवायचा.
पहिला प्रश्न : समजा तुम्ही जंगलात फसला आहात , तुमचा ड्रायव्हर तुम्हाला सोडून गेला आहे. तुम्ही काही मदत मिळते का म्हणून गाडी पासून लांब आला आहात. अशा वेळी जर तुमच्या समोर एक बिबळ्या , एक चित्ता, एक गेंडा, एक वाघ , एक सिंह आणि एक अजगर आला तर..
अ) तुम्हाला जास्त भीती कुणाची वाटेल ?
ब) तुम्ही काय कराल ?
दुपारचे १२:३० वाजले होते. सूर्याची किरणं खिडकीतून आत येण्यासाठी धडपडत होती, पण बंड्याच्या खोलीत पसरलेल्या अस्ताव्यस्त सामानामुळे त्यांनीही माघार घेतली होती. बंड्याची खोली म्हणजे एखाद्या युद्धभूमीवर बॉम्ब पडल्यानंतर जशी अवस्था असते, तशी दिसत होती. कोपऱ्यात तीन दिवसांपूर्वीचे पिझ्झाचे बॉक्स एकमेकांवर रचून त्याचा ‘कुतुबमिनार’ झाला होता. बेडच्या खाली सॉक्सचा असा काही विचित्र वास येत होता की, तिथे लपलेली डास आणि झुरळं सुद्धा ऑक्सिजन मास्क लावून फिरत होती.
शहराच्या एका कोपऱ्यात 'खातमा क्लिनिक' नावाची एक इमारत होती. तिथे बसत होते, जगातील आठवे आश्चर्य - डॉ. दर्द बहालकर. त्यांचे मेडिकल सायन्स जगाच्या पलीकडचे होते.
त्यांचे ब्रीदवाक्य होते: "जसे झाडाच्या मुळाला पाणी घातले तर शेंड्याला फुल येते, तसेच पोटातील आतडे दुखून जास्त वळवळ करत असले तर, डोक्यावरचे केस ओढले की आपोआप बरे वाटते!"
त्यांच्या मेडिकल सायन्सचे असे अनेक तिरपागडे नियम होते.
एका दुपारी डॉ. दर्दच्या दवाखान्यात दोन 'हेवीवेट' पेशंट एकाच वेळी धडकले.