खरेदी
मला washing machine विकत घेण्याची आहे पण घर भाड्याचे आहे तर कोणती मशीन घ्यावी.please मागदर्शन करा.
मला washing machine विकत घेण्याची आहे पण घर भाड्याचे आहे तर कोणती मशीन घ्यावी.please मागदर्शन करा.
आजपर्यंत Sony Bravia चा LED गेली १० वर्ष्ये वापरत आहे, नवीन TV घ्यावाच ह्या निर्णयाप्रती ( सहकुटुंब ) तिसऱ्यांदा येऊन पोचले आहोत.
आता FINAL झाले आहे पण ...
१). TV कुठल्या कंपनीचा घ्यावा (SONY सोडून )
२). SMART घ्यावा कि GOOGLE TV घ्यावा ??
सध्याच्या दारूमिश्रीत पेट्रोलमुळे माझी जुनी अॅक्टिव्हा त्रास द्यायला लागली आहे. तशी १४ वर्षांची पण झाली आहे म्हणा..
तर मुद्दा हा, की दिवसाकाठी ३-४ किमी फिरणे असलेल्या 'अधेड उम्र के नौजवान' को चालेल अशी विजेवर चालणारी कोणती गाडी घेता येईल? तुमच्याकडे आहे का? तुमचा अनुभव काय?
नौजवान असल्याने मोटरसायकल सारखी दिसणारी देखिल चालेल. स्कूटरच हवी असे नाही.
ओला नको. कुणाल कामर्याने घाबरवलं आहे बरंच.
हल्ली हॅण्ड हेल्ड स्टीम वाल्या इस्त्रीची सारखी जाहिरात दिसते आहे. (मी गुगल वर सर्च केल्यानेही असेल). मल घ्यावी वाटते आहे. पण कोणाकडेच बघितली नाही. फक्त ब्रँडेड कपड्यांच्या दुकानात बघितली आहे. हँगर ला कपडे लावून तिथल्या तिथे इस्त्री करता येते. पट्कन होते वगैरे खूप ऐकले आहे.
तर इथल्या कोणी वापरली आहे का? कोणत्या ब्रँड ची?
इंस्टा वर टेकी मराठी म्हणून एक पेज आहे ते शाओमी ची रेकमेंड करत आहेत. पण साधारण सेम किमतीत (३ हजार) फिलिप्स ची पण दिसते आहे ऑनलाईन.
हल्ली पूर्वी कधीही नव्हती एव्हढी गॅझेट्स उपलब्ध होत आहेत. आपण यातली गॅझेट्स वापरली असतील. अॅक्सेसरीज वापरली असतील. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल अविष्कार वापरले असतील. त्याची माहिती इथे शेअर करूयात.
हा ग्रुप वाहनांशी संबंधित असला तरी वाहन आणि मोबाईल यांचे नाते वाढत चालले आहे. त्यामुळे वाहनात वापरायचे मोबाईलशी संबंधित गॅझेट, अॅक्सेसरीज ( मोबाईल होल्डर इत्यादी) याच्याशी संबंधित माहिती सुद्धा इथे शेअर करता येईल.
सायकल साठी सुद्धा अनेक वस्तू उपलब्ध आहेत.
कामवाली ने वैताग आणलाय कधीही न सांगता सुट्टी, टाइम न पाळणे, खूप उशिरा येणे. पण घरातली सगळी काम नाही होत ऑफिस असते, घरी आले कि घरातली काम, मुलांचा अभ्यास सगळी काम स्वतः करायला वेळ आणी शक्ती अपुरी पडते.
ऍमेझॉन वर आज रोबोट Vaccum अँड Mop बघितला पण खूप Model आणी companies आहेत. कुणाकडे रोबोट vaccum अँड mop आहे का? असेल तर कुठल्या कंपनी चा आहे किंवा घ्यावा. माहिती मिळाली तर खूप मदत होईल.
Review बघून Ilife किंवा Dreame चांगले वाटत आहेत.
ILIFE A20 Robotic Vacuum Cleaner
dreame D9 Max Robotic Vacuum Cleaner and Mop
तुम्ही विचाराल कोण हा डेव्हिन? कोण ही सोरा? आणि ते आलेत म्हणून आम्ही का थांबायचे?
या दोघांबद्दल जाणून घेण्याआधी एआय म्हणजे काय ते बघू.
पोलिसांना वॉकी-टॉकी वापरतांना आपण नेहमी पाहतो परंतु मोठ्या हॉस्पिटल, हॉटेल, रहिवासी संकुलातील सुरक्षा रक्षकही बऱ्याचदा वॉकी-टॉकी वापरताना दिसतात. काही वेळेस चित्रपट / मालिकेच्या सेटवरील crew मेंबर, event management कंपनीचे कर्मचारीही वॉकी-टॉकी वापरताना दिसतात.
आम्ही नवीन घरी पुण्यामध्ये शिफ्ट झालो आहोत. गेली बारा वर्षे आमच्याकडे कपडे धुण्यासाठी मावशी होत्या... पण इकडे या नवीन एरियामध्ये कितीतरी मावशींना आम्ही विचारले कपडे धुण्यासाठी पण तिथे कोणीच कपडे धुण्याचे काम करत नाही तर शेवटी म्हटले की मशीनच आता वापरावी लागणार आहे तर आता माझ्याकडे सतरा वर्षापासून एलजीची सेमी वॉशिंग मशीन आहे पण त्यात कपडे इकडून तिकडे करताना खुप वेळ जातो आणि सकाळच्या धावपळीत ते शक्य होत नाही.
मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. मुख्य उद्देश प्रवासादरम्यान किंवा फिरायला गेल्यावर सहज आणि सुलभ व चांगल्या दर्जाची फोटोग्राफी करता येणे हा आहे. दर वेळेस कॅमेरा सोबत नेणे शक्य नसते. अशा वेळेस एखादे सुंदर दृश्य टिपता येत नाही.
कृपया 30 हजार पर्यंत बजेट असणारा फोटोग्राफी साठी उपयुक्त असा मोबाईल सुचवा.
Thanks in Advance !