एक बोचलेला किस्सा!

काल आमच्या Foster City च्या India Cash 'n Carry तून खोबर्‍याची चटणी आणली, Shasta brand ची .. आतापर्यंत इडली, डोसा ह्यांचं तयार batter , तयार चटणी ह्यांचा अनुभव चांगला होता त्याप्रमाणे कालही आणली चटणी .. थंडगार खाण्यापेक्षा room temperature ला बरी लागते म्हणून fridge मधून बाहेर काढून ठेवली होती, साधारणतः एक तासभर, म्हणजे तासभर बाहेर राहिली होती .. खाण्यापुर्वी सहज म्हणून टेस्ट केली आणि disappointment .. चव पार उतरली होती आणि वास घेउन बघितला तर खवट येत होता ..

मी लगेच ती चटणी परत घेऊन गेले आणि म्हंटलं खराब झालीये तर Cash 'n Carry तला दुकानदार म्हणतो, दुसरी घेउन जा .. चेहेर्‍यावर कुठेही दिलगिरी नाहि .. दुसरा डबा बघावा म्हणून त्यांच्या refrigerator मधून काढून मुद्दम वास घेतला तर त्यालासुध्दा slight खवट वास येतच होता .. आणि ह्या सगळ्या डब्यांवर sell by डेट होती, २२ सप्टेंबर .. सांगायचा मुद्दा हा की, एक तास बाहेर राहिल्यामुळेच ती खराब झाली ह्याची शक्यता मला वाटत नाहि .. एकतर जो नारळ वापरला तो तरी खराब असावा किंवा मग त्याची (चटणीची) हाताळणी तरी नीट झाली नसावी ..

मला अशा प्रकारचा अनुभव ह्याच दुकानात दीप किंवा तत्सम frozen भाजीच्या बाबतीत एकदा आणि दुधाच्या बाबतीत एकदा आलाय .. मागे एकदा दीप ची frozen भाजी आणली ह्या दुकानातून तेव्हासुध्दा ती सगळी भाजी त्यातल्या tray च्या एका बाजूला गेलेली दिसत होती .. ह्याचा अर्थ बहुदा ती एकदा(?) thaw होऊन कदाचित तो pack तिरका वगैरे हून परत freez झाली असावी .. कधीतरी एकदा तिकडचं दूध sell by डेट च्या आधीच चहासाठी गरम करताना नासलं (फ़ाटलं) होतं ..

माझ्या अंदाजाप्रमाणे Cash 'n Carry चं primary outfit sunnyvale ला आहे .. आमचा Foster City तला दुकानदार बहुधा दररोज (किंवा जी काहि frequency असेल त्याची, भाज्या आणि refrigerated/ frozen products restock करण्याची त्याप्रमाणे तो माल Sunnyvale हून त्याच्या Odyssey मध्ये घालून इकडे Foster City त घेऊन येतो आणि मग त्याचा assistant तो माल दुकानात stock up करतो .. म्हणजे हे जर खरं असेल तर ही शक्यता नाकारता येत नाहि की refrigerated/frozen माल हा किमान एक तासभर तरी बाहेरच रहातो .. मग त्यात Shasta Foods कडून थोड्या जरी substandard quality चं खोबरं वापरलं गेलं असेल तर मग चटणी अशी खराब झाली ह्यात आश्चर्य काहिच नाहि ..

बरं दुकानात जाऊन हे सांगितलं तर ह्यांच्या चेहेर्‍यावर दिलगिरी ची एक बारीकशी रेषही उमटत नाहि .. refund देण्याची भाषा दूरच! जणू ह्या प्रकारात ते पुर्णपणे नामानिराळे असल्याचा भाव .. हे असं का?

आमचं Foster City म्हणजे छोटं town आहे .. हा दुकानदार त्याच्या बायको - मुलांसकट माझ्या apt. जवळच रहातो .. चांगली ओळख आहे माझी त्याच्या बायकोशी .. हिंदी सिनेमे ह्याच्याचकडून rent करतो आम्ही .. बाकी जी काहि Indian grossary लागते ती सुध्दा ह्याच्याचकडून घेतो आम्ही .. तर चटणी प्रकारात उपाय म्हणून वर लिहीलेलं सगळं समजाऊन सांगायचा प्रयत्न केला किंवा त्या दुकानदाराला जाब विचारला तर मला खात्री आहे की त्याची परिणती एक चांगलं relation बिनसण्यात होणार .. म्हणजे हा प्रकार अगदी 'पाण्यात राहून माशाशी वैर' इतका severe नसला तरी unpleasant नक्कीच आहे .. पण मग ह्यावर उपाय काय? मनात आणलं तर त्या दुकानदाराला sue करता येईल पण ह्यातून निष्पन्न काय होणार? ह्या प्रकारातून fine म्हणून पैसे वसूल करणं हे तर आमचं उद्देष्ट नाहिये .. पण consumer म्हणून मी जे पैसे मोजतेय त्याच्या बदल्यात चांगल्या quality चा माल मिळावा अशी माफ़क अपेक्षा आहे .. पण हे साध्य कसं होणार? आवाज केला तर relation बिघडणार .. तत्वाला चिकटून रहायचं तर, Indian grossary store मधून माल विकत घेण्यातले जे 'ईतर' फ़ायदे आहेत त्यांना मुकायला हवं मग .. अगदी स्पष्ट सांगायचं तर, कमी किमतीतलं organic दूध, भाज्या (गवार, पापडी, तोंडली ई. सोडून) मीठ, साखर इ. गोष्टी (ज्या Safeway मध्ये थोडे जास्त पैसे देऊन घ्याव्या लागतात) .. त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे हिंदी सिनेमाच्या DVD's हे सगळं मग बंद करावं लागेल .. आणि परत ह्याचा त्या दुकानदारावर काहिही परिणाम होणार नाहि कारण एक गिर्‍हाईक गेलं तर त्याला काय फ़रक पडतोय .. नुसतंच गप्प बसणं पण सहन होत नाहि ..

का बरं अशी उदासीनता असावी? Indian grossary stores, restaurants असल्या ठिकाणी consumer welfare बद्दल जी उदासीनता, indifference आणि बर्‍याच अंशी मग्रुरी असते ह्याचं अंशतः कारण आपण Indian consumers च तर नाहि ना? कदाचित आपली स्वस्त, substandard मालाची easy acceptability , आवाज न उठवण्याचा स्वभाव, pirated DVDs बघण्याची हौस ही कारणं असू शकतील का ह्यामागे?


सॉरी, ह्यावर लिहायला खूपच उशीर झालाय खरंतर. पण इथे फिरकलेच नाही हल्ली. असो, बरोबर आहे तुझं म्हणणं. ह्या दुकानदारांचं फावतं ह्याचं कारण आपलाच स्वभाव. किती जण ह्या विरुद्ध आवाज उठवत असतील? आता माझंच उदाहरण देते. मागे मी बदाम घेऊन आले. आणल्यानंतर लगेच नाही पण एक दहा पंधरा दिवसांनी कशाततरी घालायला म्हणून डबा उघडला नी सगळ्या अळ्या त्या बदामात. आता मला इंडियन स्टोअर काही जवळ नाहीये की ताबडतोब घेऊन जाईन दाखवायला. आणि पुढच्या वेळेपर्यंत ते अळ्यावाले बदाम कोण सांभाळून ठेवणार. त्यामुळे शांतपणे फेकून दिले. नी त्या ग्रोसरी स्टोअरमध्ये जाणं बंद केलं. हे झालं खाण्याच्या गोष्टींचं. मागे एडिसनहून स्प्राऊट मेकर घेतला. चांगला पॅक्ड बॉक्स होता म्हणून तिथे उघडला नाही.(आणि तिथे उघडून बघितला तरी चालतो ह्याची कल्पनाही नव्हती). घरी आल्यावर बघितलं तर त्यातल्या दोनतीन गोष्टी मिसिंग होत्या म्हणून रिसिट जपून ठेवली. पुढच्या वेळी मॅनेजरला सांगितलं तर तो म्हणाला की तुम्हीच तो बॉक्स उघडून खात्री करुन घ्यायला हवी होतीत. त्यामुळे आता शांतपणे स्वत:ला समजावलंय की कोणत्याही गोष्टीत फार हाय क्वालिटी मिळेल अशी अपेक्षा ठेवायची नाही.