तन्वीर सन्मान सोहळा - २००९

Submitted by चिनूक्स on 5 April, 2011 - 00:46
सहावा तन्वीर सन्मान सोहळा ९ डिसेंबर, २००९ रोजी पुण्यात आयोजित केला गेला. सत्कारमूर्ती होते डॉ. राजेंद्र चव्हाण आणि श्रीमती विजया मेहता. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वसंध्येला झालेली श्रीमती विजया मेहता यांची मुलाखत. विजयाबाईंची नाटकं, त्यांचा नाट्यक्षेत्रातला प्रवास यांविषयी तरुण पिढीला फारशी माहिती नाही. दिग्दर्शिका व अभिनेत्री म्हणून त्यांनी केलेलं प्रचंड काम या पिढीनं पाहिलेलं नाही. हे लक्षात घेऊनच ही मुलाखत आयोजित केली गेली होती. श्री. माधव वझ्यांनी काही वर्षांपूर्वी 'सा. सकाळ'च्या दिवाळी अंकासाठी विजयाबाईंची दीर्घ मुलाखत घेतली होती. राजहंस प्रकाशनानं ती नंतर पुस्तकरूपानं प्रसिद्धही केली. तन्वीर सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केली गेलेली ही मुलाखत मात्र त्यापेक्षा जरा वेगळी होती.

Intro Tanveer.JPG

एका फार मोठ्या स्थित्यंतरात विजयाबाईंच्या सहभाग आहे. स्थितिशील मराठी रंगभूमी परंपरांना कवटाळून बसली होती. नवं काही स्वीकारण्याची कोणाचीच तयारी नव्हती, आणि म्हणून प्रेक्षकही या रंगभूमीपासून दुरावले होते. अशावेळी रंगभूमीला पुन्हा जिवंत करण्याचं काम काही प्रतिभावंतांनी केलं. यांत श्री. पु. भागवत, विजय तेंडुलकर, आरती प्रभू होते, दीनानाथ दलाल आणि हेब्बर यांसारखे चित्रकार होते, गुरुवर्य रोहिणी भाटे होत्या, अरविंद - सुलभा देशपांडे, अरुण काकडे, आदि मर्झबान, श्रीराम लागू होते आणि विजयाबाई होत्या. विजयाबाईंना हे प्रचंड बुद्धिमान सहकारी तर लाभलेच, पण एब्राहम अल्काझी, दुर्गाबाई खोटे, गणपतराव बोडस अशा थोर ज्येष्ठांचं मार्गदर्शनही लाभलं. ही मंडळी एकत्र आली 'रंगायन'ची स्थापना झाली. आज व्यावसायिक व प्रायोगिक मराठी रंगभूमीचं जे स्वरूप आहे, त्याला आकार देण्याचं काम 'रंगायन'ने केलं, असं म्हटलं तरी हरकत नाही. 'गृहस्थ', 'मादी', 'चिमणीचं घर होतं मेणाचं', 'गिधाडे', 'शितू', 'बॅरिस्टर', 'हमीदाबाईची कोठी' अशी अनेक नाटकं विजयाबाईंनी रंगभूमीवर आणली. 'रंगायन'ने मराठी रंगभूमीला एक नवा चेहरा तर दिलाच, शिवाय नीना कुलकर्णी, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी, नाना पाटेकर, भारती आचरेकर, विक्रम गोखले अशी मतब्बर नटमंडळीही दिली.

तन्वीर सन्मानसोहळ्याच्या पूर्वसंध्येला विजयाबाई आपल्या ज्येष्ठांबद्दल, प्रभावित करणार्‍या पूर्वसूरींबद्दल, सहकार्‍यांबद्दल बोलल्या. श्री. माधव वझे आणि श्रीमती ज्योती सुभाष यांनी ही मुलाखत घेतली.


*

*

*

*

त्या वर्षीचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार डॉ. राजेंद्र चव्हाण यांना दिला गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरगाव या गावी गेली वीस वर्षं सातत्यानं ते लहान मुलांसाठी नाटकं बसवत आहेत. या नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन ते स्वत: करतात. ’मुलांना मी नाटक नव्हे, जगणं शिकवतो’, ही भूमिकाच डॉ. चव्हाणांच्या कामाची बैठक आहे. मुलांच्या या नाटकांत भाषा मुलांची असते, मांडणीही मुलांच्या दृष्टिकोनातून केलेली असते. तबलापेटीच्या साथीनं ही मुलं नाटकांत उत्तम गातात, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा यांचा गांभीर्यानं विचार केलेला असतो. पर्यावरण, निसर्ग, सणवार, अंधश्रद्धा असे विषय या नाटकांत हाताळले जातात. साधेपणा आणि सच्चेपणा ही या नाटकांची वैशिष्ट्यं. अनेक स्पर्धांमध्ये डॉ. चव्हाणांच्या नाटकांनी आणि त्यांच्या नाटकवेड्या मुलांनी बक्षिसं मिळवली आहेत. गावातले समस्त पालक, शिक्षक यांच्या सहभागही डॉ. चव्हाणांच्या या कामात आहे.

natyadharmipuraskar.JPG

डॉ. चव्हाणांविषयी कार्यक्रमात बोलले श्री. वामन पंडित. कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानाचे श्री. पंडित नाट्यवर्तुळात सर्वांनाच परिचित आहेत. संस्थापक, कार्यवाह, कार्याध्यक्ष अशा निरनिराळ्या भूमिकांतून त्यांनी आजवर प्रतिष्ठानाचं काम सांभाळलं आहे. प्रेक्षकांना नाटक बघण्याची सवय लावण्यापासून नवीन नाटकांची निर्मिती करण्यापर्यंतच्या सांस्कृतिक घडामोडींत श्री. पंडित यांचा सहभाग असतो. डॉ. चव्हाणांचं काम श्री. पंडित यांनी जवळून पाहिलं आहे.

Waman Pandit.JPG

श्री. वामन पंडित यांचं भाषण...



***

Rajendra Chavan.JPG


डॉ. राजेंद्र चव्हाण यांचं तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार स्वीकारल्यानंतरचं भाषण...


***


Vikram Gokhale.JPG


श्रीमती विजया मेहता यांची नाट्यकारकीर्द श्री. विक्रम गोखले यांनी फार जवळून पाहिली. बाईंच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी भूमिका केल्या, त्यांच्यासह अभिनयही केला. एक रंगकर्मी व माणूस म्हणून विजयाबाई किती मोठ्या आहेत, हे सांगितलं श्री. विक्रम गोखले यांनी...



***


Pushpa Bhave.JPG


ज्येष्ठ समीक्षिका व कार्यकर्त्या श्रीमती पुष्पा भावे यांनी महाराष्ट्रातल्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा फार गांभीर्यानं अभ्यास केला आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीशीही त्यांचा फार जवळून संबंध आला.
विजयाबाईंच्या नाटकांबद्दल त्यांनी केलेलं हे भाष्य...



भाग २




***


Tanveer2009.JPG


Vijaya Mehta.JPG


पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रीमती विजया मेहता यांनी केलेलं भाषण...



***


Ramdas Bhatkal.JPG


कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रामदास भटकळ यांचं भाषण...



***


ही ध्वनिमुद्रणं उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती दीपा लागू व 'रुपवेध प्रतिष्ठान'च्या सर्व विश्वस्तांचे मनःपूर्वक आभार.

***


पुरस्कारसोहळ्यातली प्रकाशचित्रं - श्री. प्रकाश कान्हेरे, कान्हेरे फोटो स्टुडियो, पुणे
***


या लेखातील सर्व ध्वनिमुद्रणांवर आणि पुरस्कारसोहळ्यातील प्रकाशचित्रांवर रूपवेध प्रतिष्ठान, पुणे, यांचा प्रताधिकार आहे. ही ध्वनिमुद्रणं आणि प्रकाशचित्रं इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यास वा कुठल्याही प्रकारे वापरण्यास परवानगी नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

GHD is one of the world’s leading monster headphones engineering, architecture and environmental consulting companies.bose oe Wholly-owned by its people, GHD is focused exclusively on client success.GHD is recognised for its chi nano commitment to sustainable development chi hair dryer, safety and innovation. We care for chi flat iron the wellbeing of our people, babyliss pro straightener communities and the environments in which dr dre headphones we operate. www.newelectroniclife.com .

Marilyn Monroe spoke for women designer shoes all over the world when she said, "I don't know who invented yves saint laurent shoes high heels, but all women owe ysl pumps him a lot!" And, really, ysl booties what's not to love? A pair of high heel pumps can do wonders for your posture, give you that ysl sandals extra boost of confidence, and lengthen your legs like no other shoe.