हे बेट..

ह्या चिनी बेटाची
आकृतीबंध रचना,
कमनीय वृक्ष-वल्लरी,
आखीव्-रेखीव रस्ते,
मिनी-मिडीतील पोरी,
गगनचुंबी ह्या इमारती,
विलायती डोक्यांची
सतत भरती ओहोटी,
हे व्यावसायिक चेहरे,
बारोमास धारा कोसळती;

जीव विटला ह्या सर्वांना
नविन काहीतरी शोधावयास
फुलपाखरासारखा चहुकडे
भिरभिरतो हा डोळा..