अवघी विठाई माझी (२१) गोटु कोला
गोटू कोला, नाव जरा विचित्रच वाटतेय ना ? हा शब्द आहे सिंहली भाषेतला. गोटू म्हणजे गोल
आणि कोला म्हणजे पाने.
पण फोटोवरुन अनेकजणांनी ओळखले असेल, की हि आहे ब्रम्ही. पुर्वी ब्रम्ही, माका सारख्या
वनस्पती जागोजाग दिसायच्या. आता त्या तितक्या सहजी दिसत नाहीत.
ब्रम्ही म्हंटले कि आपल्याला, भारतातले प्रसिद्ध, ब्रम्ही आवला हेअर ऑईलच आठवणार.
ब्रम्हीचा आपण खाण्यासाठी उपयोग करत नाही. (दक्षिणेकडे करत असावेत. खात्री नाही.)
डॉ. डहाणुकरांच्या लेखनात याचा खाण्यासाठी उपयोग होतो, हे पहिल्यांदा वाचले.
आणि त्यांच्याप्रमाणेच मी त्याची चव बघितली, एका श्रीलंकन मैत्रिणीकडे. आपल्याकडे
दिसणार्या ब्रम्हीची पाने अगदी छोटी असतात. आणि पातळही असतात. त्यांच्याकडे
ती आकाराने बरीच मोठी असतात. साधारण ३ सेमी व्यासाची आणि जरा जाडही
असतात. (माझ्या मैत्रिणीने ऑकलंड मधल्या घरी, त्याची लागवड केली आहे. आणि
माझ्यासाठी एक खास शाकाहारी प्रकार म्हणून तिने तो केला होता.)
खोबरेल तेलावर मोहरी आणि हिरव्या मिरच्यांची फ़ोडणी करुन त्यात ब्रम्हीची पाने
परतायची. त्यात थोडे मीठ घालायचे. आणि मग थंड झाल्यावर त्यात भरपूर ओले
खोबरे घालायचे. हा प्रकार पाने तेलात न परतताही करता येते. चवीला वेगळा
आणि मस्त लागतो. चपातीबरोबर, आमटीभाताबरोबर खाता येतो. एरवीही जेवणात
कोशिंबीरीप्रमाणे घेता येतो. त्याला ते मलुंग असे म्हणतात.
(या वरच्या फोटोत खोबर्याचे प्रमाण जास्त आहे, पण खोबरे कमी वापरुन वा अजिबात न वापरता पण हा प्रकार करता येईल. अर्थात हि पाने जास्त घ्यायला हवीत.)
लाल रंगाचा तांदुळ, नारळाच्या दुधात शिजवून त्यात गूळ आणि ब्रम्हीची
पाने घालून पण ते लोक एक प्रकार करतात.
मस्कतमधे श्रीलंकन लोकांची वस्ती असल्याने, तिथल्या सुपरमार्केटमधे ब्रम्हीची
जूडि विकायला असायची (हो ती पाने खुप मोठे व देठही मोठे असल्याने, त्यांची
जूडी होऊ शकते.)
आपल्याकडे ती जमिनीवर शोधावी लागेल. धावत्या मूळांची हि वनस्पती, पाणथळ
जागी सहज वाढते. तिला क्वचित फ़ूले आलेली दिसतात. (फूले जांभळट गुलाबी रंगांची
पण अगदी छोटी असतात.)
ब्रम्हीचे शास्त्रीय नाव Centella asiatica आहे. नावावरून ती आशियातली
आहे हे सरळच आहे. पण सध्या ती जगात अनेक ठिकाणी लावली जाते.
आपल्याकडे तिला मंडुकपर्णी, उंदीरकानी अशीही नावे आहेत. (उंदीरकानी हे नाव मी डॉ. डहाणुकरांच्या लेखात वाचले. पण याच नावाने आणखी एक लालसर पानांची वनस्पती ओळखली जाते ) तेलगू भाषेत तर तिला सरस्वतीचेच नाव दिले आहे.
या वनस्पतीवर बरेच संशोधन झालेले आहे, आणि तिचे अनेक उपयोग लक्षात आले
आहेत. पायात रक्त साचल्याने पायाला आलेल्या सुजेवर हिचा उपयोग होतो. जखमांवर
पोटीस म्हणून देखील हि वापरता येते. मानसिक ताणतणाव, निद्रानाश यावर तर आपण
याचे तेल वापरतोच. बुद्धी चांगली होण्यासाठी पण हिचा उपयोग होतो, तरीही अगदी लहान
मुलांना ही देऊ नये, असे एक मत आहे.
सहसा हिचे दुष्परिंणाम होत नाहीत, पण अतिसेवनाने लिव्हरवर ताण पडू शकतो. आपल्याकडे
हि बहुदा सांडपाण्याच्या संगतीने वाढलेली दिसते, त्यामूळे ती पाने वापरताना काळजी घेणे
आवश्यक आहे.
पण जर स्वच्छ जागी हिची लागवड केली असेल, तर ही पाने चटणी, कोशिंबीरीत वापरता
येतील. या पानांना स्वत:चा असा फारसा स्वाद नसतो. चव पण फारशी तीव्र नसते, त्यामूळे
मूळ पदार्थाच्या चवीवर फारसा परिणाम होत नाही.
वरच्या फोटोत खोबरं आहे? आधी
वरच्या फोटोत खोबरं आहे? आधी वाटलं बीन स्प्राऊट्स आहेत (जॅपनीजमध्ये 'मोयाशी" ) आणि मग कोबी वाटला.
वरच्या फोटोत खोबरं आहे? आधी
वरच्या फोटोत खोबरं आहे? आधी वाटलं बीन स्प्राऊट्स आहेत (जॅपनीजमध्ये 'मोयाशी" ) आणि मग कोबी वाटला. >>>>> मला पन कोबीच वाट्ला.
दिनेशदा, वेगळ्याच प्रकाराची
दिनेशदा, वेगळ्याच प्रकाराची ओळख करुन दिलीत. धन्यवाद!
>>दक्षिणेकडे करत असावेत. हो
>>दक्षिणेकडे करत असावेत.
हो दिनेशदा, कारवारी लोकांत याची तंबळी करतात.
त्याची लिन्क!!
http://www.aayisrecipes.com/2005/07/11/vandelaga-tambali-ankre-tambali/
वा एक वेगळीच ओळख झाली
वा एक वेगळीच ओळख झाली ब्रह्मीची. कोणी ब्रह्मी खात असतील असं वाटलचं नव्हतं.
लहानपणी आमच्या घराच्या आजूबाजूला चिकार असायची. आई ती कुस्करून आणि मग तेलात उकळून घरच्या घरी ब्रह्मीचं तेल करायची. आता मुंबईत आणि उपनगरांतून ही जमिनच दिसत नाही तर या वनस्पती काय दिसणार?
सायो, ज्योति, खरेच बीन
सायो, ज्योति, खरेच बीन स्प्राऊट्स आणि कोबीही वापरता येईल. पण श्रीलंकेत, नारळाचा अमाप वापर असल्याने, सगळ्यात खोबरे असतेच.
रोचीन हे तंबळी प्रकरण मला माहित होते . विड्याची पाने, पेरुची पाने, आंब्याची पाने वगैरे वापरतात ते माहित होते. पण ब्रम्ही बद्दल माहीत नव्हते.
वत्सला, मामी मलापण असेच वाटते, लहानपणी ब्रम्ही खाल्ली असती, तर जरा अक्कल आली असती !!
दिनेशदा ब्राम्हि कशि लावतात
दिनेशदा ब्राम्हि कशि लावतात त्याचे बि मिळते का?
आर्या, ब्रम्ही चा वेल कुठे
आर्या, ब्रम्ही चा वेल कुठे दिसला, तर त्याचा काही भाग मूळासकट उपटून लावता येतो. हि धावत्या खोडाची वनस्पती आहे. जमिनीवर पसरत जाते.
माझ्या माहेरी ब्राम्हीचा मी
माझ्या माहेरी ब्राम्हीचा मी वेल लावला होता. खुप पसरला होता तो. आता दिसत नाही.
मी ही वाचले होते की श्रिलंकेत ब्राम्हीचा जेवणामध्ये वापर करतात. कोशिंबीरही करतात त्याची.
माहेरी लग्ना आधी मी ब्राम्ही, जास्वंद, माका, आवळा एकत्र करुन तेल बनवायचे.
माझ्याघरी आता माका आहे. उद्या फोटो टाकते.
तंबळीची कृती टाकाल का? दादरला
तंबळीची कृती टाकाल का?
दादरला तुळस, वगैरे पत्री विकतात... तिथे ब्राम्ही मिळत असावी. पण ती कुठे उगवली असेल सांगू शकत नाही.
मस्त लेख व रेसिपी
मस्त लेख व रेसिपी दिनेशदा..... किती समृध्द आहे आपलं वनस्पती भांडार!!
अमी, त्या तंबळीची कृती रोचीनने वरच्या दिलेल्या लिंकमध्ये आहे ना?
दिनेशदा ! ब्रम्हीचा आपण
दिनेशदा !

ब्रम्हीचा आपण खाण्यासाठी उपयोग करत नाही. (दक्षिणेकडे करत असावेत. खात्री नाही.)
आणखी एक छान माहीती दिलीत !
माझ्या एका मंगलोरच्या सहकार्याने ही वनस्पती तिकडुन आणुन दिली,२ रोपं लाऊन पाहिली पण जगली नाहीत, आपल्याकडे मात्र मला तरी कुठे दिसली नाही ...
नवीन प्रकार! पहिल्यांदा
नवीन प्रकार! पहिल्यांदा ब्राह्मी खायची म्हणजे जरा हे वातलं. पण इतर पालेभाज्यांसारखी लागत असेल चांगली असं आता वाटतंय. त्या भाजीला सुवासही असणार. ना?
सुरेख माहिती.
सुरेख माहिती.
माझ्या कडे पण आहे ब्रम्ही, मी
माझ्या कडे पण आहे ब्रम्ही, मी तर कोशिंबीरी मधे कोथिंबीरीसारखी वापरते. आता असा प्रकारपण करुन बघते.
कोंकण, गोवा, कारवारकडे काराणा
कोंकण, गोवा, कारवारकडे काराणा म्हणून एक वनस्पती असते. अशीच किड्नीशेप्ड पाने आणि शेवंती सारखी धावती लवचिक खोडे. त्याचेही केसांचे तेल करतात. हा ब्राह्मीचाच प्रकार असावा का?
बहुतेक हिच असेल, वरचा फोटो पण
बहुतेक हिच असेल, वरचा फोटो पण गोव्यातलाच आहे.