काळी आई : सांगलीच्या 'गावभागाची' आरोग्यदूत'
आपल्या देशात कितीही तंत्रज्ञानाची प्रगती झाली, तरी जुन्या पण अर्थपूर्ण (आणि कालबाह्य) प्रथा काही पिच्छा सोडत नाहीत, अगदी २१व्या शतकातही !! काही आपल्या निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात, तर काही स्वतःच्या, घरातल्या 'गोकुळां'ची आर्थिक शारिरीक भरभराट व्हावी, म्हणून रचल्या असतात. महाराष्ट्रातल्या एका जिल्हयाच्या गावात अशीच एक प्रथा आहे, 'काळी आई' म्हणून!!
काळी आई
पश्चिम(की दक्षिण!?) महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्याच्या गावांत तसा फारसा गावरानपणा उरला नसला, तरी काही जुन्या पण हटके प्रथा आहेत. 'काळी आई' त्यापैकीच! याबद्दल हा लघुलेख.
मी गावभागातल्या खाडिलकर गल्लीत राहायचो. साधारण १-२ जुलैची दुपार ! नुकतीच पावसाने Opening केलेली! नेहमीच ढगाळ रातावरण ! अशात मुलांचा एक लोंढा गलका करत गल्लीची शांतता भंग करु लागला. मी कसला आवाज, म्हणून बघतोय तर बघता-बघता १ ते १५ वर्षाच्या पोरापोरींनी सगळा रस्ता व्यापला. काही त्याहून जास्त वर्षांची बाया-बाप्ये घराच्या पायरीवरून, खिडकीतून, मिळेल त्या घराच्या भागातून हसून पाहणारे! 'काळी आई आली बघ…भूताची आई, तडकडताई" असा नुस्ता गलका ! "एकमेकांना 'ती बघ, आली तिकडून काळी आई"असं भिववणं सुरुच !! मीही उत्सुकतेने या प्रकरणाला शोधू लागलो, सोबत कॅमेरा होताच!
इतक्यात मुलांची गर्दी फोडत एका अपार्टमेंटमधुन 'काळी आई' बाहेर आली. हातात सूप, काळी साडी नेसलेली, तोंडावर राक्षसासारमा काळा-पिवळा-लाल मुखवटा ! हातात सूप !! धान्य पाखडायचे सूप ! त्या सुपाने ती पोरांना खोटे खोटे मारत होती. मुलं पण आपली मार चुकवत, मित्राला तिच्यासमोर ढकलत या गोष्टीचा मनापासून आनंद घेत होती.
अगदी किरकोळ शरीरयष्टीची ही 'काळी आई' प्रत्येक अपार्टमेंट- मध्ये जाऊन आल्याची 'वर्दी' देत होती. ही प्रथा सांगलीतल्या नदीकाठच्या जुन्या गावभागामध्येच फक्त दिसते. हा भाग म्हणजे सहा गावांची जुनी कसबा सांगली. त्यामुळे ही प्रथा फक्त या ६ गल्ल्यांमध्ये कैद असावी. प्रथेचा मिथक उद्देश हाच की, 'ज्या पोरा-पोरीना त्या सुपाचा काळी आईकडून प्रसाद मिळतो, ते पोर पुढचं वर्षभर सहसा रोगा-तापाला बळी पडत नाही. त्यांचं आरोग्य कुठल्याही रोगाविना सुदृढ राहत ! मी सांगलीला राहायला आल्यापासून ४-५ वर्षे ही प्रथा बघतोय.
मुळात ही वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर की चूक किंवा खरंच असं होते का, यापलीकडे जाऊन मुलांचा तो दुपारचा ३-४ तासांचा मजेचा वेळ आणि एका विविध स्थानिक प्रथांची ती संस्कृती आधिक महत्त्वाची !!
ब्लू तुम्ही सांगलीकर काय?
ब्लू तुम्ही सांगलीकर काय?
भेटू एकदा.
तडाकड्ताई
तडाकड्ताई
तडकडताई म्हणतात ना
तडकडताई म्हणतात ना
हो तदकडताई
हो तदकडताई
होय. काळी आई व तडकडताई ही
होय. काळी आई व तडकडताई ही दोन्ही नावे आहेत तिला. @मी अमि.
@ Sharadg मी राहायचो तिथे. सध्या नाहीये.