"मी म्हणतो कशाला द्यायची ती वर्गणी?" हातात पर्स घेऊन बाहेर दारावर आलेल्या मुलांना वर्गणी द्यायला चाललेल्या मालतीबाईंवर मनोहरपंत करवादले.
"अहो असं कसं? यावेळेस पहिल्यांदाच ठेवतोय आपण सोसायटीचा गणपती! आपला थोडा हातभार नको का लागायला?"
"कशाला अजून एक गणपती म्हणतो मी? इथे मंडळं काय कमी आहेत? घाला म्हणावं धुडगूस आता दहा दिवस."
मनोहरपंतांच्या कुरकुरीकडे जरासा कानाडोळा करून मालतीबाई दार उघडायला गेल्या.
***
सकाळची वेळ. कामतसाहेब आपल्या केबिन मधे आठ वाजताच येऊन बसले होते. कडक इस्त्रीच्या गणवेशावरची काल्पनिक धूळ झटकून टाकत त्यांनी टेबलावरच्या फ़ाईल्स पुढे ओढल्या. 'सुधीर कामत. आय. पी. एस.' लिहिलेली धातूची छोटीशी पाटी नीट सरकवून ठेवली. चपराश्याने आणून दिलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावून एक घोट घेतला. अन समोरची फ़ाईल ते चाळू लागले.
तोच बाहेर कसल्याशा गडबडीने त्यांचे कान टवकारले गेले. थोडीशी धक्काबुक्की, चढ्या आवाजातली बोलणी या सार्यानं ते सावध झाले.
'कसला गोंधळ आहे रे तिथे? मोरे? ....काय चाललंय?
धारदार स्वरात त्यांनी ओरडून विचारलं.
कोण म्हणते? जुन ते सोन नसते?
...
हव तर यात धारा काढा
आन्घोळिला उनउन पाणी घ्या
पन्क्तित वाढा मठ्ठा यातुन
एरवी ठेवा शोकेस मधे घासुन
...
प्रत्येक घरचा मराठी बाणा
तुमच्याकडे नाही?????
मग आजच आणा......
...
माफक दाम, दर्जाची हमी
एल्टी छापाची पितळी बालटी
घरोघरी हवीच ही सखी
एल्टी छापाची पितळी बालटी
...
ढिन्ग टाडा डिन्ग........!
समिती
१. अज्जुका
२. ट्युलिप
३. वाटसरु
नियमावली:
१. कवितारूपातूनच कथा पुढे न्यायची आहे.
२. कवितेचा फॉर्म ओवी, अभंग, आर्या, गझल, हायकू, छंदोबद्ध वा मुक्तछंद इत्यादीपैकी काहीही असू शकतो. याबाहेरचा फॉर्म असायलाही हरकत नाही पण ते गद्य असता कामा नये. वर्णनासाठी किंवा घटना सांगण्यासाठीही पद्याचाच वापर करणे बंधनकारक आहे.
३. स्वप्नातून जागे झालो किंवा तत्सम क्लुप्त्या वापरून कथा जागेवर आणण्याचा अतिरेक होऊ नये. याबाबतीत गद्य STY चेच नियम लागू पडतील.