धडधड... धडधड... धडधड... भाषा प्रेमाची
Submitted by सत्यजित on 14 February, 2012 - 13:40
माझा अबोला आणि
तुझी अखंड बडबड
मी बोलावं म्हंटल तर
नुसती धडधड... धडधड... धडधड...
म्हंटलं लिहावी एक कविता
यमका वृत्तात जुळवून धड
आणि पान भरुन उतरवली
धडकत्या हृदयाची धडधड... धडधड... धडधड...
कवितेतून बोलावं तर
तिथेही तिच गडबड
पानभर लिहीलं होतं
नुसतं धडधड... धडधड... धडधड..
असा कसा गं मी? न लिहीता येतं
न बोलता येतं धड
तू नसलीस की तडफड
तू असलीस की धडधड... धडधड... धडधड..
माझी धडधड कविता
तू धडाधड वाचलीस
मला वाटलं तू हसशील
पण तू तर चक्क लाजलीस... धडधड.. धडधड.. धडधड
वाटलं बुक्का मारुन छातीत
बंद करवी ही धडधड
तू हसुन लाजलीस ?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा