उंदरीण आणि उंदीरशेठ...
Submitted by ग्लोरी on 22 December, 2011 - 01:44
उंदरीण आणि
उंदीरशेठ
पिंजर्यात झाली
दोघांची भेट
उंदीरशेठ
बाताडे भारी
उंदरीणिला म्हणाले
"हे सुंदरी"
सांग सांग करशील का
माझ्याशी लगीन
तुझ्यासाठी नभीचे
तारे मी कतरीन
उंदरीण म्हणाली
दावीत नखरा
आधी या पिंजर्याचा
एक तार कतरा...
- ग्लोरी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा