कॅब्रे-डान्सर फिओना
Submitted by आशयगुणे on 23 October, 2011 - 06:05
सामान्यांची अमेरिका बघायची असेल तर विद्यापीठाबाहेरचे जग पाहणे अत्यंत गरजेचे आहे. ही अमेरिका सिनेमातील कृत्रिम अमेरिकेपेक्षा खूप वेगळी आणि अर्थात वस्तुस्थिती दर्शवणारी असते. उदाहरण द्यायचे झाले तर डॉलर्सचे देईन. अमेरिकन माणूस हा डॉलर्स उडवीत जगत असतो असे आपण सिनेमात बघतो. पण वस्तुस्थिती काय आहे हे इथला सामान्य माणूस दाखवून जातो. ह्याच डॉलरच्या मागे अमेरिकन माणसाला कसे झगडायला लागते व एकदा ते मिळाले की ते टिकवणे ही कसरत तो कसा करतो हेच त्यातून दिसून येते! एकदा हे समजू लागले की मग अमेरिकन अर्थव्यवस्था सामान्यांना कशी लुबाडते हे कळायला लागते. आणि मग दिसू लागते अमेरिकन गरीबी!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा