५० वर्षांचा प्रलय

५० वर्षांचा प्रलय - पानशेत

Submitted by विना हसुरकर on 13 July, 2011 - 23:00

१२ जुलै २०११ ला पानशेतच्या पुराला ५० वर्षे पूर्ण झली खरी पण अजूनही तो १२ जुलैचा दिवस डोळ्यांसमोर दिसतो. पूर आला म्हणले की मला तो दिवस आठवतो आणि मी परत त्या पूरात वाहून जाते. आता माझी मुलेच म्हणतात, थांब आई मी पुढचे सांगतो... असो.
तर तेव्हा मी सहावीत शिकत होते. शाळाही जवळ होती. आमचे घर तसे नदीपासून फार जवळ नाही पण फार लांबही नाही. पावसाळ्यात पाण्याचा पूर बघायला जायला पुणेकर मंडळी धावत असत.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - ५० वर्षांचा प्रलय