होऊ शकेल कधी निचरा सार्या वाईट गोष्टींचा ???
Submitted by Diet Consultant on 29 May, 2011 - 13:31
हे जीवन सुंदर आहे ....... ! हे स्मिता तळवलकरच किती सुंदर गाणे ! कधीतरी याच नाण्याची दुसरी बाजूपण दिसते. माणूस मोठा होतो ; घरापासून शाळेपासून ऑफिसातल्या कामात गुंततो. आजुबाजूच वातावरण बदलत , आजूबाजूचे लोक बदलतात. मित्र -मित्र म्हणणारा कधी पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याच गुपित आई ला सांगतो, कधी ऑफिसात चुगल्या करतो. कटकटी असतात ; सगळीकडेच. पण वयाबरोबर , आपल्या यशाबरोबर हि कटकटीनची तीव्रता वाढत जाते.
गम्मत आहे ! आपले आई बाबा , आप्तजन, आपल्या शाळेतल्या बी सारे जण असताना आपल्याला जपले जाते हळुवार तळहाताच्या फोडासारखे. आणि नाण्याच्या दुसर्या बाजूची सुरुवात होते ; so called " मोठ झाल्यावर " .. !
गुलमोहर:
शेअर करा